शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

अकलकडा

पहा : अक्कलकारा

अगडदगड

न.

१. क्षुल्लक वस्तू; अडगळ; सटरफटर. २. अमर्याद, शुष्क, निरर्थक बडबड; वेडेवाकडे वागणे, बोलणे वगैरे. ३. शिळेपाके, जाडेभरडे अन्न; निःसत्त्व खाणे; गरिबीचे खाणे; भिकार खाणे.

अडिश्री

पहा : अडशेरी : ‘एका वाण्याच्या दुकानात एक अडीशिरी चिरमुरं उधार घेतलं’ – ऊन ३९.

अढणी

स्त्री.

१. दिवा, भांडी वगैरे ठेवण्याकरता तिवई, चौरंग : ‘अडणीवरि सोन्याचे ताट ॥’ – सुदा ३४; बैठक; स्थान. २. शंखाची बैठक; तिवई. ३. अडसर. ४. लाकडी पाटास खालून लावलेल्या दोन लाकडी कातीव पट्ट्या. ५. दाराची लाकडी कडी. (कों.) ६. टेका; आधार : ‘घायाळा घालोनि वोडणी । धनुष्

अनळ

पु.

१. अग्नी; विस्तव; आग. सामा. शब्द – कामानल, तृषानल इ. : ‘जैसा उद्यानामाजीं अनळु ॥’ – ज्ञा १·२३०. [सं.]

१. देवनागरी लिपीतील आणि मराठी वर्णमालेतील पहिला वर्ण. २. मराठी स्वरमालेतील पहिला स्वर, स्थानपरत्वे ऱ्हस्व, लांबट किंवा निभृत : ‘गवत’ या शब्दातील ‘ग’ मधील ‘अ’ हा ऱ्हस्व, ‘व’ मधील ‘अ’ हा लांबट, ‘त’ मधील ‘अ’ हा तोटका किंवा निभृत होय. ३. ॐ या अक्षराच्या ‘अ’,

वि.

इयत्ता अथवा गुणवत्ता दाखवण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह : ‘अ’ तुकडी, ‘अ’ वर्ग इत्यादी. [सं.]

अ आ :

प्रारंभिक ज्ञान; ओ का ठो.

अँहं

उद्गा.

नापसंती, असंमती, नकारदर्शक उद्गार.

अं

याचा अंतर्भाव स्वरमालेत करण्यात येत असला तरी तो स्वतंत्र स्वर नसून ते एक ध्वनिचिन्ह आहे. हे (∸) या प्रकारे दाखवले जाते. त्याचा उच्चार (अ+शीर्षबिंदूला) वेगवेगळ्या संदर्भात असणारे वेगवेगळे ध्वनिमूल्य असा आहे. शीर्षबिंदूचे हे ध्वनिमूल्य अऐवजी इतर कोणता स्वर

अं

उद्गा.

१. नाखुषीचा उद्गार. २. प्रश्नवाचक उद्गार. ३. विचार करून सांगण्यापूर्वीची अवस्था दाखणारा उद्गार.

अं:

उद्गा. उं; तिरस्कार, बेपर्वाई, अविश्वास दाखवणारे उद्गारवाचक अव्यय; तुच्छतादर्शक उद्गार.

अं:

उद्गा. एखाद्या गोष्टीविषयीचा तिटकारा; औदासीन्य; अविश्वास; संशय, असंभाव्यता व्यक्त करताना निघणारा उद्‌गार.

अंक

पु.

१. संख्या, आकडा (१, २, ३ इ.); आख (अंकगणितातील): ‘अंकें जैसीं शून्यें सद्यःकार्यक्षमें, न तीं अन्यें ।’ – मोवन ६·३५. २. खूण; चिन्ह; छाप; शिक्का : ‘अंक तो पडिला हरिचा मी दास’ – तुगा १३३८. ३. नाटकाचा एक भाग. ४. नियतकालिकाचा (वर्तमानपत्र, मासिक इ.) एक भाग, अन

अंकगणित

न.

अंक किंवा व्यक्त संख्या यांचा विचार ज्यात केलेला असतो ते शास्त्र. आकड्यांचा उपयोग करणारे शास्त्र. भास्कराचार्यांनी याला ‘पाटीगणित’ असे म्हटले आहे.

अंकगति

स्त्री.

(हिशेबाचे) आकडे मांडण्याची किंवा मोजण्याची पद्धत. [सं.]

अंकगती

स्त्री.

(हिशेबाचे) आकडे मांडण्याची किंवा मोजण्याची पद्धत. [सं.]

अंकचक्र

न.

(ज्यो.) कालगणना चक्र. हे चक्र ५९ वर्षांचे असते. या कालगणनेत वर्षारंभ भाद्रपद शु. १२ ला समजतात. ६ किंवा ० (शून्य) शेवटी असलेले वर्ष गणनेत धरत नाहीत. [सं.]

अंकचालन

न.

(ज्यो.) अंकांची किंवा गणिती कोष्टके, सारण्या; निरनिराळ्या काळांना जुळेल असा अंकांचा फरक. [सं.]

अंकजाल

न.

(पंचांगाचे गणित सोपे करण्यासाठी तयार केलेले) आकड्याचे कोष्टक, सारणी [सं.]