शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

आगारी

पु.स्त्री.न.

शेंडा; अंकुर; शेंडी; डिरी. टोक;

आगिठा

न.

अग्निकुंड.

आगिठा

स्त्री.

आगटी; भट्टी; शेगडी; विस्तव; आग : ‘लोहाराची आगिठी जैसी ।’ − एभा २६•४४.

आगियेल

न.

आग; विस्तव; आगीचा डोंब. : ‘जे आगिएलाचां सरोवरीं । घालिजे पुढिला तें ॥’ − शिव ७५६. तापलेले तेल : ‘आगिएलावरि उजिती । आबुथिली जैसी ।’ − ज्ञा ११·३३७.

आगियेल

वि.

विस्तव किंवा अग्नी यासंबंधी.

आगोती

स्त्री.

जेवण्यासाठी उपयोगास येणारा केळीच्या किंवा चवेणीच्या पानाचा शेंड्याकडचा भाग : ‘केळीच्या लांब लांब आगोतल्या हींच त्यांचीं रुप्यांची ताटें.’ − पाव्ह १७. (कों.) [सं. अग्रदल]

आगोळा

पु.

मुडा; ज्यात धान्य अथवा पेरणीचे बी बांधून ठेवतात असा पेंढ्याचा अंडाकृती बोजा; मोटकुळे; गाठोडे; बिवळा; कोळे इ.

आडजून

वि.

अर्धवट जुना; उपयोगाने नवीनपणा नाहीसा झालेला; नादुरुस्ती, निरुपयोगी.

१. देवनागरी लिपीतील आणि मराठी वर्णमालेतील दुसरा वर्ण; मराठी वर्णमालेतील दुसरा स्वर. स्थानपरत्वे ऱ्हस्व किंवा दीर्घ. ‘गा’ मधील ‘आ’ दीर्घ व ‘गाडी’ या शब्दातील ‘आ’ ऱ्हस्व. आ अक्षर उच्चारताना होणारा ध्वनी व तोंडाचा होणारा आकार (स्थिती). वासलेले, उघडलेले तोंड

उपसर्ग.

व्यंजनादी शब्दापूर्वी सामान्यतः पुढील अर्थाने − (अ) लघुता; अल्पता; कमीपणा. उदा. ओष्णम् = कोंबट (उष्णम् = कढत, ओष्णम् = किंचित, उष्ण = कोंबट). (आ) व्याप्ती; प्रसार; वाढ. उदा. + आभोग = समृद्धी, पूर्णता. (भोग = सुख, आभोग = अधिक भोग, भोगाची वाढ). (इ.) उपक्रमा

उद्‌गा.

आश्चर्य व दुःख व्यक्त करणारे प्रश्नार्थक अव्यय.

आँकी

उअ.

ते की; असे की. [फा.]

आँगर

न.

१. वाटेच्या तोंडाला लावलेले दुबेळ्याचे लकूड. यातून माणसांना जाता येते, पण गुरांना जाता येत नाही. २. कुंप करण्यासाठी रांगेने पुरलेली दुबेळक्याची लाकड़े किंवा फांद्या यांपैकी प्रत्येक.

आँगोगडी

क्रिवि.

प्रतिव्यक्तीवर निरनिराळा अन्वय होईल असे (देणे, सांगणे). प्रत्येकी; निरनिराळ्या व्यक्तीला स्वतंत्रपणे.(कों.)

आँगोगड्या

क्रिवि.

प्रतिव्यक्तीवर निरनिराळा अन्वय होईल असे (देणे, सांगणे). प्रत्येकी; निरनिराळ्या व्यक्तीला स्वतंत्रपणे.(कों.)

आँथडा

पु.

हिसका, हासडा.

आं

उद्‌गा

१. सांगितलेली गोष्ट चांगली ऐकली नसता पुन्हा बोल असे म्हणण्याच्या अर्थाने केलेला उच्चार. २. आश्चर्यदर्शक शब्द : ‘आं! तुम्ही केव्हा आलात?’ ३. प्रश्नार्थी : ‘काय? आं?’ ४. षष्ठीचा विभक्तिप्रत्यय : ‘तंवं तो धारासिंपे तिखटें । डोळेआं उजूं ।’ − शिव ७११.

आंक

पहा : आंख डोळ्याजवळचा भाग; भुवई व कान यामधील जागा : ‘आंका बैसला भाला । सयाजी गायवाड पडला ।’ − ऐपो ८७. [सं. अक्षि; अक्षन् = डोळा] (वा.) आंक मोडणे − डोकेदुखी बरी होण्यासाठी आंकावर बिब्याच्या फुल्या घालणे.

आंकडकडवे

गाण्याचे पालुपद.

आंकण

पु. न.

१. पायात घालायचा तोडा; (पूर्वी शत्रूला जिंकल्यानंतर त्याचे नाव एका तोड्यावर खोदून तो पायात घालायची चाल होती त्यावरून) पराक्रमसूचक पादभूषण : ‘तो रणीं जितिला करूनिं नेम । तेणें संतोषोनि परम । आपलें नाम आंकणा घालीं ।’ एभा १९·१४३. २. (सामा.) ब्रीद; बिरुद; ब्र