शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

पु.

(तत्त्व.) कामदेवाचे नाव. [सं.], उपसर्ग. स्थानाचा नजिकपणा दाखवण्याकडे उपयोग. उदा. इ−कडे, इ−थे, इ− तका इ.

प्र.

चा, ची, चे षष्ठीचा फारसी प्रत्यय : ‘श्री कारवे व कोडिवले व वडिगाऊं राजमुद्रा मुख्य समस्त इ असिर्वादु’− शके १४२९ मधील एक पत्र. यातील समस्त इ = चे समस्त’ − भाद्विसंवृ १५. [फा.]

इ.

१. मराठी वर्णमालेतील तिसरा वर्ण व स्वरमालेतील तिसरा स्वर. स्थानपरत्वे हस्व किंवा दीर्घ : उशिरा, विजा, तिला इ. मध्ये ऱ्हस्व; उशीर, वीज, ती − यात दीर्घ.

इंगणे

अक्रि.

काळजीने, श्रमाने, आजाराने किंवा इतर कारणाने भारावून जाणे; गळून जाणे; दमणे; टेकीला येणे.

इंगरेज

पु.

इंग्रज; इंग्लिश; ब्रिटिश माणूस; साहेब; गोरा.

इंगरेजी

स्त्री.

१. इंग्रजी भाषा. २. इंग्रजांचा अम्मल; ब्रिटिश अमदानी.

इंगरेजी

वि.

इंग्लिश; इंग्रजांचा; इंग्रजी भाषेसंबंधी; इंग्रजी; ब्रिटिश.

इंगरेजी दारू

स्त्री.

(इंग्रजी दारू लवकर पेट घेते यावरून) (ल.) १. तापट, चिडका, संतापी माणूस. २. हुषार, चलाख माणूस; तडफदार माणूस.

इंगळ

पु.

जिवंत निखारा; विस्तव; अंगार (व. गो.) : ‘कैंची सुखनिद्रा आंथरुणीं । इंगळांच्या ।’ −ज्ञा ९·५०१. [सं. अंगार] (वा.) इंगळास वळंबे लागणे– असलेल्या संकटात अधिक भर पडणे; एकादशीच्या घरी शिवरात्र. इंगळासारखा लाल होणे– रागाने चेहरा तांबडा होणे; अतिशय संतापणे; इंगळास

इंगळा

पु.

जिवंत निखारा; विस्तव; अंगार (व. गो.) : ‘कैंची सुखनिद्रा आंथरुणीं । इंगळांच्या ।’ −ज्ञा ९·५०१. [सं. अंगार] (वा.) इंगळास वळंबे लागणे– असलेल्या संकटात अधिक भर पडणे; एकादशीच्या घरी शिवरात्र. इंगळासारखा लाल होणे– रागाने चेहरा तांबडा होणे; अतिशय संतापणे; इंगळास

इंगळा

पु.

एका जातीचा तांबडा मुंगळा.

इंगळी

स्त्री.

१. विंचवाची एक जात; ही आकाराने विंचवापेक्षा मोठी असून काळी व अतिशय विषारी असते. २. ठिणगी; निखारा; विस्तव : ‘घालावी ईंगळी ब्रह्मशापाची’−उगी १४·६१. पहा : इंगळ : ‘जेवीं वेळु वाढवी वेळुजाळी । वेळुवेळवां कांचणीमेळीं । स्वयें पाडूनि इंगळी । समूळ जाळी आपण्यातें

इंगा

पु.

१. (चर्मकार व्यव.) चामडे ओढून घोटून ताणण्याचे व मऊ करण्याचे (उलथण्यासारखे) हत्यार. २. नांगरलेल्या जमिनीतील ढेकळे फोडण्याचे लाकूड. ३. (ल.) हाल. [सं. इंग्] (वा.) इंगा दाखविणे− खोड मोडणे; आपले सामर्थ्य दाखविणे. इंगा फिरणे–गर्वपरिहार होण्याजोग्या अडचणीत सापडण

इंगाळ

पु.

पहा : इंगळ : ‘काशी माझी काळूबाई । तुझं इंगाळ चालायचं ।’ − जसा ८२.

इंगित

न.

१. खूण; सूचक मुद्रा. २. अभिप्राय. ३. अंतस्थ हेतू; रहस्य. ४. (व्यंगितचा अप.) औपरोधिक भाषण; व्यंगोक्ती. [सं.]

इंगित सिद्धांत

पु.

(भाषा.) मनातील आशय, भावना इ. हावभावांनी व्यक्त केल्या जातात असे मानणारा सिद्धांत.

इंगितज्ञ

वि.

इंगित जाणणारा; हावभावावरून अभिप्राय, उद्देश जाणणारा. [सं.]

इंगिताग्र

न.

इंगितज्ञ : ‘पंतप्रधान इंगिताग्र आहेत.’− ऐलेसं ११८३.

इंगुदी

स्त्री.

(आयु.) हिंगणबेट. [सं.]

इंगुळ

पु.

निखारा, पहा : इंगळ : ‘रुसले भरतारा । नाहीं म्हणावा आपला । शेजीच्या लावणीनं । लाल इंगुळ तापला ।’ − वलो ९१. (व.)