शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

मराठी वर्णमालेतील पाचवा वर्ण व स्वरमालेतील पाचवा स्वर. स्थानपरत्वे ऱ्हस्व किंवा दीर्घ जसे −मुळा, शुल्क इ. मध्ये ऱ्हस्व; किंतु, परंतु इ. मध्ये दीर्घ. उपसर्ग उलट क्रिया, विरोध, अभाव, अपकर्ष इ. अर्थी क्रियापदांना लागणारा एक उपसर्ग. उदा. उसवणे, उवळणे, उलगडणे

पु.

शिव; विष्णू (ओम्‌मधील दुसरा घटक उ म्हणजे विष्णू) : ‘उकार विष्णुरव्यक्त.’ − गुच २·१३०.

उं

उद्गा.

अँ:; ‘काय’ या अर्थी आश्चर्यार्थक किंवा प्रश्नार्थक उद्गार; बेपर्वाई, नाखुशी इ. व्यक्त करणारा शब्द. उच्चार अतिऱ्हस्व आणि अनुनासिक.

उं

स्त्री.

एककृमी (केसातील).

उंका

वि.

१. उघडा; नागडा; हीन. (को.) २. मोकळा; सुटा.

उंकी

स्त्री.

पाजणी; मागावर विणण्याकरिता खळ देऊन तयार केलेले उभे धागे. [क. उंकी, उंके]

उंगणे

अक्रि.

आंघोळ करणे : ‘आनें उंगीनें रामाभोक्ति केतली. आणि अंग धुवून रामाची सेवा करी.’ − भिल्ली भाषा २७. (भिल्ली) [सं. अवगाह]

उंगली

स्त्री.

(हाताचे किंवा पायाचे) बोट [हिं.] (वा.) उंगली चालवणे – (शरीरावरून) हात फिरवणे; अंगुली स्पर्शाने स्त्री वश होते का हे पाहणे : ‘उंगली चालवून पहायची. पोरगी फितली तर फितली’ − वासू ३२.

उंच

वि.

उच्च प्रतीचा : ‘ते वारू उचवडे । काइ वानूं I’ − शिव ९३३.

उंच

वि.

१. जमिनीपासून किंवा उभे राहण्याच्या स्थानापासून आकाशात पुष्कळ अंतरावर असणारा, पोचणारा; उन्नत; उत्तुंग; उच्च. २. श्रेष्ठ (गुण, पदवी, किंमत यामध्ये); वरिष्ठ पदवीचा, योग्यतेचा (चतुरस्रता, थोरपण वगैरे संबंधाने); सन्मान्य : चातुर्येवीण उंच पदवी ।’ − दास १४·६·७

उंच

क्रिवि.

फार वर; हवेत; उंचावर. [सं. उच्च]

उंच दरवाजा

पुढील मोठा दरवाजा : ‘उठल्या अवाई उंच दरवाजा लाविला ।’ − ऐपो ६८.

उंच नाक

न.

प्रतिष्ठा; मान्यता; प्रौढी : ‘उंच नाकेश्वशुरागारी । वागे न ऐसें करावें ॥’ − जै १७·६५. (वा.) उंच नाक करून – १. प्रतिष्ठेने; मान्यतेने. २. निर्लज्जपणाने; बेशरमपणाने.

उंचकपाळ्या

वि.

नशीबवान (उंच कपाळ भाग्याचे निदर्शक असते या कल्पनेवरून).

उंचखाल

क्रिवि.

उंचसखल; वरखाली; खाचखळग्यामध्ये; खाचखळग्याची.

उंचखाल

वि.

विषम; नतोन्नत; खालीवर असणारी (जमीन).

उंचट

वि.

१. उंच; चढावाची (जमीन); उभट; चढणीचा. २. किंचित उंच; वाढलेला. [सं. उच्च +वत्]

उंचदर्पण

पु.

सूर्यकांत; सूर्य : ‘उंच दर्पणीं अग्नी निघतो I’ − दास १६·५·१९.

उंचनीच

क्रिवि.

१. खालीवर असे; खडबडीत; उंचसखल. २. लहानथोर; श्रेष्ठकनिष्ठ; गरीब श्रीमंत : ‘उंच नीच काहीं नेणें भगवंत I’ − तुगा ३६९१.

उंचपट

न.

चढण असलेला रस्ता; चढणीवरील जागा.