शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

मराठी वर्णमालेतील सातवा, वैदिक व संस्कृत भाषेत आढळणारा, नंतरच्या अवस्थांत नष्ट झालेला ‘र’ या व्यंजनाशी मिळता स्वर.

ऋक्

पु.

चार वेदांपैकी पहिला वेद; ऋग्वेद : ‘म्हणोनि ऋग्यजुःसामु । हे तीन्ही म्हणे मी आत्मारामु ।’ − ज्ञा ९·२७७. [सं.]

ऋक्

स्त्री.

ऋग्वेदातील ऋचा, मंत्र; सूक्तातील एक भाग; वेदातील छंदोबद्ध रचना. [स.]

ऋक्ष

पु.

अस्वल; रीस. [सं.]

ऋक्ष

न.

तारकापुंज; नक्षत्र. [सं.]

ऋख

न.

नक्षत्र : ‘चांदीं ऋखै जैसिं । दिनोदइं ॥’ − राज्ञा १५·२८२.

ऋखी

पु.

ऋषी : ‘ऋखीं पळो लागले.’ − श्रीकृच १६.

ऋग्वेद

पु.

चार वेदांपैकी पहिला वेद. ऋग्वेदाची एकंदर सूक्ते १०२८ असून एकंदर ऋचा १०५८० व अक्षरसंख्या ४३२००० आहे. चारी वेदात ऋग्वेद मोठा आहे. ऋग्वेद हा हौत्रवेद असून यज्ञातील होता नामक ऋत्विजाने यातील मंत्र म्हणायचे असतात. [सं.]

ऋग्वेदी

पु.

ऋग्वेदाला अनुसरणारी ब्राम्हण वर्गातील एक शाखा. [सं.]

ऋचा

स्त्री.

१. ऋग्वेदसूक्तातील एक मंत्र, श्लोक : ‘बोलती निषेधनियमे जिया ऋचा यजुःसामें ।’ − ज्ञा १५. १६६. २. वेदांतील मंत्र : ‘ऋचा श्रुति स्मृति । अधेय स्वर्ग स्तबक जाती।’ − दास १२·५·४. ३. (संगीत.) यज्ञसमारंभप्रसंगी निमंत्रित देवता − इंद्र, वरुण, अग्नी वगैरेंना यज्ञाच

ऋजु

वि.

१. सरळ; प्रत्यक्ष; उजू. २.(ल.) प्रामाणिक; निष्कपटी; साधा; अकृत्रिम; सच्चा. [सं.]

ऋजू

वि.

१. सरळ; प्रत्यक्ष; उजू. २.(ल.) प्रामाणिक; निष्कपटी; साधा; अकृत्रिम; सच्चा. [सं.]

ऋण

न.

१. कर्ज; देणे; रीण; परत द्यायच्या बोलीने (सव्याज किंवा तसेच) घेतलेले द्रव्य इ. २. (ल.) उपकार; अपरिहार्य कर्तव्य; पहा : ऋणत्रय : ‘ऋण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी I’ − तुगा १०.[सं.](वा.) ऋण करणे − कर्ज काढणे; कर्ज करणे. ऋण काढणे − पहा : कर्ज काढण

ऋण अग्र

न.

(विद्युत.) विद्युतघटामधील ऋण विद्युतभारित अग्र.

ऋणकरी

वि.

१. कर्ज देणारा; सावकार; उत्तमर्ण. २. कर्ज घेणारा; देणेदार; ऋणको; अधमर्ण. ३. ज्यापासून काही उपयोग नाही पण ज्याला उगीच पोसावे लागते असा, कुचकामाचा माणूस; आळशी, आइतखाऊ अशाला निंदेने म्हणतात. ४. ज्याच्याकडून आपल्याला नेहमी मदत होते व जो सारखा आपल्यावर कृपा कर

ऋणको

पु.

कर्ज असलेला; कूळ; अधमर्ण; रीणकरी. [सं. ऋण]

ऋणकोन

पु.

(भूमिती.) घड्याळाचा काटा फिरतो त्या दिशेच्या विरुद्ध बाजूला होणारा कोन.

ऋणग्रस्त

वि.

कर्जबाजारी, कर्जात बुडालेला. [सं.]

ऋणग्रस्तता

स्त्री.

कर्जात बुडणे, रुतणे; कर्जबाजारीपणा. [सं.]

ऋणघातकी

वि.

अवसानघातकी; ऐन वेळेवर माघार घेणारा. (ना.)