शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

मराठी अक्षरमालेतील दहावे अक्षर. मराठी स्वरमालेतील दहावा स्वर. परंपरेप्रमाणे अ नंतर इ किंवा ई तसेच आ नंतर इ किंवा ई आल्याने बनणारा संयुक्त स्वर. संस्कृतमध्ये पुढील स्वराशी संधी होताना अय् असे रूप होते. स्थानपरत्वे ऱ्हस्व किंवा दीर्घ. उदा. वे, हे, घे, वेष य

उद्गा.

परिचयातील माणसाला हाक मारण्यासाठी योजायचे एकवचनी, उभयलिंगी संबोधन. जसे :- अरे, अग. [सं.]

ए डी सी

पु.

उच्च पदस्थाच्या तैनातीला असणारा लष्करी अधिकारी. (हा अधिकारी त्याच्या सर्व सुखसोयींकडे लक्ष देऊन त्यांची बडदास्तठेवतो); शरीरसंरक्षक; अंगरक्षक. [इं.]

एंकोळ

पु. स्त्री.

एक सरळ वाढणारे मोठे झुडूप.

एंगरट

वि.

अक्कलशून्य. (व.)

एंडी

स्त्री.

एरंडीचीपानेखाऊनवाढणाऱ्याकिड्यापासूनमिळणारेरेशीम. त्या रेशमापासून केलेल्या वस्त्रांना एंडी म्हणतात : ‘फिकट पिवळ्या रंगाची एंडीची मेखला नेसून ..’-सीपो १२७.

एंडी

स्त्री.

मासे धरण्याचे पोत्यासारखे एक जाळे. (गो.)

एउता

क्रिवि.

इकडे; या बाजूला, दिशेने : ‘आणि पात्र : तेया एउते लोटीति ।’ − लीच ४·३५. [क. इत्त] [सं. अत्र]

एक

वि.

आद्यसंख्यावाचक; सर्व संख्यांमध्ये पहिली संख्या; अंकगणिताचा मूळ संख्याघटक. २. एकटा; अद्वितीय; कोणी बरोबरीचा नसणारा. ३. अपरिचित नामाबद्दल प्रारंभी वापरण्यात येणारा शब्द. जसे :- कोणी तरी, अमूक, एखादा. ४. विवक्षित एक; सर्वांत वरचढ. उदा. एक शहाणा, एक लबाड. ५.

एक करणे

क्रि.

मिसळणे; एकत्रित करणे.

एक नंबरचा

वि.

अव्वल दर्जाचा; पहिल्या प्रतीचा.

एक प्रकार

वि.

१. निराळ्या प्रकारचा; निराळ्या वर्गाचा; विलक्षण; विचित्र; अनन्यसाधारण : ‘लौकिक एकप्रकारें जालिया उत्तम नाहीं’ - मरि २·९५. २. एकाच तऱ्हेचा.

एक प्रकारचा

वि.

१. निराळ्या प्रकारचा; निराळ्या वर्गाचा; विलक्षण; विचित्र; अनन्यसाधारण : ‘लौकिक एकप्रकारें जालिया उत्तम नाहीं’ - मरि २·९५. २. एकाच तऱ्हेचा.

एक बीच हात

(कवाईत) सम अंक (२,४,६) म्हटलेल्यांनी आपला उजवा हात ताठ, जमिनीशी समांतर करून खांद्याच्या पातळीवर समोर, बोटे एकमेकांशी लागलेली, अंगठ्याचा अग्रभाग वर आणि करंगळी जमिनीकडे अशा स्थितीत नेणे.

एकंकार

पु.

१. जुळणी; जोडणी; मिसळणी. २. सर्व एक करणे; सरमिसळ; संकर : ‘याप्रमाणे धर्मासंबंधें एकंकार करणारा हुकूम कलकत्याहून सुटला आहे.’-माप्र १६. ३. गर्दी; गुंतागुंत; गोंधळ; गोलंकार. पहा : एकाकार

एकंकार

वि.

एकरूप; समान; एकसारखा; एकाकार : ‘रावरंक समसमान उंचनीच एकंकारी.’-पला ६५.

एकंग

पु.

काठीचा खेळ : ‘एकंग लकडी, फरीगदका, लाठीचेहात..(विद्यार्थ्यांकडून) करवून घ्यावी.’-संव्या ५२.

एकंदर

स्त्री. न.

१. एकत्र करणे; एकवट करणे; संमिश्र करणे; एके ठिकाणी आणणे; बेरीज; मिळवणी. २. स्नेह; सोबत; संगत; मैत्री.

एकंदर

वि. क्रिवि.

१. एकत्र; जुटीत; सहवासात; मिश्रणात : ‘तरी वैराग्याचेनि आधारें ।जिहीं विषय दवडूनि बाहिरें । शरीरीं एकंदरें । केलें मन ॥’-ज्ञा ५·१५१. २. एकरकमी सर्व; एकत्र करून; एखाद्या; एकूण. जसे : - एकंदर जमा- आकार, ताळा, पक्क, पट्टी; एकंदरीचा हिशोब-बेरीज-वही. ३. सर्व मि

एकंदर

न.

प्रत्यक्ष न होता परंपरेने झालेला, अप्रत्यक्ष संबंध, स्पर्श, विटाळ. [सं. एक+अंतर]