शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

मराठी वर्णमालेतील बारावे अक्षर. आघातयुक्त अ चा नंतर येणाऱ्या आघातरहित ‘इ’शी संयोग होऊन झालेला संयुक्त स्वर. आघातरहितस्वरव्यंजनाकडेझुकतअसल्यामुळेउच्चारदृष्ट्याअय्असा. कित्येकशब्दांत तसे पर्यायी लेखनही संभवते. जसे : - भैया, भय्या.

उद्गा.

अगबाई; दुःख, शोक याचा उद्गार. पहा : अइ : ‘मज हररिपुऐ जहर कहर करी लहर आलि बाई धराधरा ।’-राला.

ऐंचण

स्त्री.

१. पडझड; अडचण; अडगळ; सटरफटर वस्तू. २. खेचाखेच; गर्दी. ३. अडचणीची, गर्दीची अवस्था, जागा.४. गवत, रान, झाडझुडूप माजलेली जागा.

ऐंडा

पु.

भात झोडण्यासाठी हातात घेतलेली कवळी. पहा : आयंडा

ऐंडी

पु.

भात झोडण्यासाठी हातात घेतलेली कवळी. पहा : आयंडा

ऐंढा

पु.

भात झोडण्यासाठी हातात घेतलेली कवळी. पहा : आयंडा

ऐंद्र

वि.

१. (ज्यो.) सत्तावीस योगांपैकी सव्विसावा योग. हा अशुभ मानला जातो. २. इंद्रासंबंधी; इंद्रलोकातील. [सं.]

ऐंद्रजाल

न.

इंद्रजाल; जादुगिरी; गारुड. [सं.]

ऐंद्रजालिक

पु.

जादूचे खेळ करणारा; गारुडी.

ऐंद्रजालिक

वि.

जादूसंबंधी; इंद्रजालासंबंधी. [सं.]

ऐंद्रस्थान

न.

(नृत्य.) दोन्ही पाय वाकडे करून आडवे ठेवणे व यात अंतर चार ताल ठेवणे, कंबर गुडघ्यांच्या रेषेत येईल इतकी वाकविणे, हत्ती सारख्या प्राण्यावर चढणे वगैरे गोष्टी या स्थानात उभे राहण्याने सूचित केल्या जातात. [सं.]

ऐंद्राग्न

वि.

इंद्र व अग्नी − देवतांसंबंधी. (पुरोडाश, ऋचा इ.) [सं.]

ऐंद्रिय

वि.

इंद्रियासंबंधी (व्यापार); इंद्रियग्राह्य; इंद्रियसंवेद्य.

ऐंद्रिय साधन

ज्ञानवाहक संवेदनस्थानांना मदत करणारे उपकरण.

ऐंद्रियक

वि.

इंद्रियासंबंधी (व्यापार); इंद्रियग्राह्य; इंद्रियसंवेद्य.

ऐंद्री

स्त्री.

१. इंद्राधिष्ठित दिशा; पूर्वदिशा. २. इंद्रपत्नी. ३. (ज्यो.) ज्येष्ठा.

ऐंशी

वि.

दहाच्या आठपट; ८० ही संख्या. [सं. अशीति]

ऐकटपत्र

न.

दोघांच्या संमतीचा कागद; समेट पत्र: ‘आमच्या दोघांच्या सहीचें ऐकटपत्र लिहून मागीतलें.’ -मानृ २८८.[सं. एक+ पत्र]

ऐकणा

वि.

ऐकणारा; ज्याला चांगले ऐकू येते असा; कानाचा धड : ‘कान वचन मीचि श्रोता । मीचि जाण शब्दार्थता । ऐकणाहि मज परता । नाहीं तत्त्वतां श्रवणाचा ॥’-एभा १३·३४५.

ऐकणे

उक्रि.

१. कानांनी शब्द, ध्वनी जाणणे, समजणे; कान देणे;श्रवण करणे. २. लक्षपूर्वक ऐकणे; काळजीने श्रवण करणे; अवधान ठेवणे. ३. लक्ष देणे; मान्य करणे (एखादी सांगितलेली गोष्ट); ध्यान ठेवणे; नीट चित्त देणे; बरहुकूम वागणे; आज्ञा पाळणे; हुकूम मानणे. [सं. आकर्णन] (वा.) ऐकून