शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

इंग्रजी भाषेच्या संपर्कामुळे मराठीमध्ये हा उच्चार आलेला आहे. याचा उच्चार ऑफ, ऑर्डर इ. शब्दांमध्ये मिळतो. आ-या स्वरावर अर्धचंद्र स्वरूपात हा उच्चार दाखवला जातो. उच्चार स्थानाचा विचार करून ‘ओ’नंतर हा स्वर घेतला आहे. वर्णमालेतील स्थान चौदावे. काही भाषाशास्त्

ऑतॉ

पु.

भात शिजताना येणारा कड, ऊत. (गो.)

ऑपेरा

पु.

संगीताच्या माध्यमातून सादर केलेले नाट्य, संगीतिका :‘त्याचा संगीत नाट्याचा, संगीतकाचा म्हणजे ऑपेराचा अभ्यास चांगला झालेला’ - नटश्रेष्ठ ११. [इं.]

ऑर्डर

स्त्री.

१. व्यवस्था; क्रम; परंपरा. २. बंदोबस्त; जम. ३. आज्ञा. ४. (व्यापारी) मागणी; माल मागणीची नोंद : ‘कित्येक व्यापाऱ्यांनीं विलायती मालाच्या दिलेल्या आर्डरी रद्द केल्या.’ - के. ३१·५·३०. [इं.]

ऑर्डर्ली

पु.

लष्करी अमलदारास लष्करखात्यातून तैनातीकरिता दिलेला फौजी नोकर; हुजऱ्या. (अप.) अडली. [इं.]

ऑलिव्ह

पु.

एक फळझाड. भूमध्यसमुद्राच्या आजुबाजूला याची लागवड होते. याच्या बियांचे तेल काढतात. काही ठिकाणी फळांचे लोणचे घालतात. फळांपासून रंग तयार होतो. आलिव्हचे पान, फांदी, माळ ख्रिस्ती लोकांत शांततेचे निदर्शक मानतात. [इं.]