शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

१. मराठी वर्णमालेतील तेरावे अक्षर. २. संस्कृतमधील मुळात अ + उ, ऊ असा बनलेला, स्वर आल्यास अव् होणारा संयुक्त स्वर. संदर्भानुसार ऱ्हस्व किंवा दीर्घ. जसे :− तो, कोट, नको यात दीर्घ; तोळा, घोडा, बडोदे यात ऱ्हस्व. प्राचीन मराठी वाङ्मयात ॐ, वो ही अक्षरे पर्यायान

पु.

१. प्राथमिक ज्ञान, प्रारंभ. २. प्रतिसाद. (वा.) ओ चं ठो –पहा : ओ का ठो न कळणे : ‘वाचायला येण्याच्या नावाने ओ चं ठो म्हटले तरी चालेल.’ − पलकोघे ७३. ओ का ठो न कळणे − काहीही न समजणे; मुळीच आकलनबुद्धी नसणे. ओ म्हटल्या ठो न कळणे − संपूर्ण अज्ञान असणे; काहीही न

सना.

ती; वो : ‘नाचत गेली ओ कांती वनाला ।’ − मसाप १·२·१९. (साष्टी, होळी)

अ. उद्गा.

हाक मारली असताना उच्चारायचा ध्वनी.

पु. स्त्री.

१. हाकेला द्यायचे उत्तर. (क्रि. देणे) २. ओकारी होत असताना होणारा आवाज; ओकारी; वांती. (क्रि. येणे). [ध्व.] (वा.) ओ देणे– १. − मदतीला जाणे. २. उपयोगी पडणे.

ओंऊळ

स्त्री. न.

बकुळ वृक्ष; त्याचे फूल.

ओंऊळदोडा

पु.

बकुळ वृक्षाचे फळ.

ओंकार

पु.

१. ओंकाराचे चिन्ह (ॐ) : ‘तेथ ओंकाराचीए पाठी । पाये देत उठाउठीं’ - राज्ञा ६·३०३. २. हुंकार; होकार : ‘विद्याधरी मदनओंकारा सारिखे कूजती.’ -शिव [सं.]

ओंकारध्वनि

पु.

अग्रेसर; सर्वश्रेष्ठ; प्रथम स्थान असलेले. हा पहिला ध्वनी त्यावरून : ‘हरिभाऊ हे मराठी साहित्यातील ओंकारध्वनि आहेत असे यथार्थपणे म्हणता येईल.’ - हरिव्यवा ५५. [सं.]

ओंकारध्वनी

पु.

अग्रेसर; सर्वश्रेष्ठ; प्रथम स्थान असलेले. हा पहिला ध्वनी त्यावरून : ‘हरिभाऊ हे मराठी साहित्यातील ओंकारध्वनि आहेत असे यथार्थपणे म्हणता येईल.’ - हरिव्यवा ५५. [सं.]

ओंकारेश्वर

पु.

१. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थान. हे मध्य प्रदेशात इंदूरनजिक नर्मदेवर आहे. २. पुण्यातील मुठानदीकाठचे ब्राम्हणांचे पूर्वीचे स्मशान (वा.) ओंकारेश्वरावर गोवऱ्या जाणे- स्मशान या शब्दावरून, मरणकाल जवळ येणे; अतिवृद्ध होणे :‘गोखले काय आणि टिळक काय दोघांच्याहि

ओंकीर

पु.

डोळ्यांतील मळ.पहा : उकीर ३. (गो.)

ओंगण

म.

गाडीच्या, रहाटाच्या कण्याला किंवा सांध्याच्या ठिकाणीफार घर्षण होऊ नये म्हणून लावण्यात येणारे तेल, बेरी, चरबी; वंगण: ‘ह्या व असल्याच समाधानाच्या गोष्टींचे तिच्या कष्टमय संसाराच्या गाड्याला ओंगण होते.’ - स्मृति १०. [सं. अंजन]

ओंगल

वि.

(सांकेतिक. गुन्हेगार जातीत रूढ) एक हजार ही संख्या (१०००).

ओंगळ

वि.

१. वाईट; घाणेरडे; किळसवाणे; अमंगळ; घाण खपणारा (पदार्थ, माणूस). २. (ल.) कडक; त्रासदायक; रागीट; अशुभकारी :‘बहिरोबा आहे ओंगळ । त्याचा नवस पाहिजे फेडला॥’ऐपो ४८.[सं. अमंगल]

ओंगळवाणा

वि.

अमंगल; अशुभ; वाईट;घाणेरडा; किळसवाणा.

ओंगळसोंगळ

वि.

वाईटसाईट; किळस उत्पन्न करणारा.[ओंगळचे द्वि.]

ओंजळ

स्त्री.

१. बोटे चिकटवून व करंगळीच्या टोकापासून मनगटापर्यंत हातांच्या कडा एकमेकांना जोडून होणारी पोकळी; जुळलेले दोन पसे २. पितरांना द्यायची तिलांजली : ‘पुत्र देईल पित्या ओंजळी ।’ वसा १७. [सं. अंजली] (वा.) दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे- दुसऱ्याच्या तंत्राने, कलाने,

ओंटळा

पु.

धोतराची अथवा लुगड्याची ओटी. (पुष्कळसे पदार्थ भरल्यामुळे मोठी दिसणारी.) (कों.)

ओंड

स्त्री.

एकझाड. १. सुरमाडाची पोय, लोंगर, फलसमुदाय २. (नाचणीवरील) टरफल; टरफलासह नाचणीचे दाणे.