शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

मराठी अक्षरमालेतील पंधरावे अक्षर. आघातयुक्त ‘आ’चा, नंतर येणाऱ्या आघातरहित ‘उ’शी संयोग होऊन झालेला संयुक्त स्वर. आघातरहित स्वर व्यंजनाकडे झुकत असल्यामुळे उच्चारदृष्ट्या ‘अव्’ असा. कित्येक शब्दांत तसे पर्यायी लेखनही जसे :− लौकर−लवकर, चौदा−चवदा, इ. ‘ओ’ वर एक

औंजार

पु.

उपद्व्याप. (गो.)

औंदा

क्रिवि.

यंदा; ह्या वर्षी; चालू साली : ‘औंदा सुटला पायजे सातवीतनं.’ − मिरास ५२. (कुण.) [फा. आयंदा]

औंदुबर

पु.

वानप्रस्थ विशेष. सकाळी उठल्या बरोबर ज्या दिशेला पाहिल, त्या दिशेकडील फळे इ. वर राहणारा.

औंध

स्त्री.

काळोखी; अंधारी. पहा : ओंध. [सं. अंध]

औंस

पु.

अडीच तोळे. १ औंस = २ जेवणाचे चमचे (टेबलस्पून). २. औंस = दारूचा एक पेला (वाइन ग्लास). [इं.] विभाग : ‘हे कठिण पांच औंस.’ − वह ६·२५. [सं. अंश]

औक

न.

आयुष्य : ‘औक चितीती पुरविता’ − जसा ७ [सं. आयुष]

औकत

स्त्री.

सामर्थ्य; शक्ती; पात्रता. [फा. औकात]

औकात

पु. स्त्री.

१. गुजारा; चरितार्थ : ‘एणेकरून आपला औकात चालत नाहीं.’ − मइसा १८·४८. २. निर्वाहसाधन : ‘त्यांचा योगक्षेम चालावयाची काही औकात नाही.’ − मइसा १७·३९. पहा : अवकाळ [फा.]

औकाद

पु. स्त्री.

१. गुजारा; चरितार्थ : ‘एणेकरून आपला औकात चालत नाहीं.’ − मइसा १८·४८. २. निर्वाहसाधन : ‘त्यांचा योगक्षेम चालावयाची काही औकात नाही.’ − मइसा १७·३९. पहा : अवकाळ [फा.]

औकाफ

पु. अव.

मुसलमानी धार्मिक संस्था; मुसलमानी धर्मादाय संपत्ती; मुसलमानी देवस्थानांची मालमत्ता. [फा. वक्फ]

औकाळ

पहा : औकात, औकाद

औकाळी

पहा : औकात, औकाद

औक्ष

न.

आयुष्य; जीवित; जीवनमर्यादा. [सं. आयुष्य]

औक्षण

न.

आरती ओवाळणे; आरती वगैरे ठेवलेले तबक किंवा लामणदिवा; लग्नकार्याच्या अथवा इतर शुभप्रसंगी देवाची मूर्ती किंवा ज्याचे मंगलकार्य असेल त्याला सुवासिनीने ओवाळण्यासाठी घेतलेले दीपादियुक्त ताम्हन. (सामा.) ओवाळणे. पहा : अक्षवाण : ‘त्यांचें सुवासिनी स्त्रियांकडून औक

औक्षवंत

वि.

चिरायू; चिरंजीव; आयुष्यमान; दीर्घायुषी; उदंड आयुष्याचा. (कुण. बायकी) [सं. आयुष्यवंत, आयुष्यवान्]

औक्षवण

औक्षवान

वि.

चिरायू; चिरंजीव; आयुष्यमान; दीर्घायुषी; उदंड आयुष्याचा. (कुण. बायकी) [सं. आयुष्यवंत, आयुष्यवान्]

औगत

स्त्री.

प्रसूतीनंतरच्या पहिल्या दहा दिवसांत मृत झालेली बाळंतीण. ही सामान्यतः पिशाच होते अशी समजूत आहे. [सं. अव किंवा आ+गत]

औगात

क्रिवि.

१. अकस्मात; एकाएकी. (क्रि. येणे, ओढवणे.) २. अल्लाद; न लागता. (ओलांडून जाणे, उडी मारणे). (कु.) [सं. अव + घात]