शब्द समानार्थी व्याख्या
  १. देवनागरी लिपीतील आणि मराठी वर्णमालेतील दुसरा वर्ण; मराठी वर्णमालेतील दुसरा स्वर. स्थानपरत्वे ऱ्हस्व किंवा दीर्घ. ‘गा’ मधील ‘आ’ दीर्घ व ‘गाडी’ या शब्दातील ‘आ’ ऱ्हस्व.
उपसर्ग. व्यंजनादी शब्दापूर्वी सामान्यतः पुढील अर्थाने − (अ) लघुता; अल्पता; कमीपणा. उदा. ओष्णम् = कोंबट (उष्णम् = कढत, ओष्णम् = किंचित, उष्ण = कोंबट). (आ) व्याप्ती; प्रसार; वाढ. उदा. + आभोग = समृद्धी, पूर्णता. (भोग = सुख, आभोग = अधिक भोग, भोगाची वाढ). (इ.) उपक्रमाची मर्यादी (अमुक पासून) उदा. आसमुद्रात् = समुद्रापासून, आजन्मतः = जन्मापासून. (ई) अवसान; मर्यादा; अंतीची मर्यादा. (अमुकपर्यंत, पावेतो). उदा. आजानु = गुडघ्यापर्यंत, आमरण = मृत्यूपर्यंत, आकर्ण = कानांपर्यंत. (उ) अंतर्भूत व समाविष्ट मर्यादा. उदा. आक्रमण = व्यापून टाकणे. (क्रम = जाणे, चालणे, पाऊल टाकणे). आसकलात् ब्रह्म = ब्रह्म वस्तुमात्र व्यापून आहे. (आ+सकल = सर्व). (ऊ) अतिरिक्त; अकारण, वाजवीपेक्षा अधिक; निरर्थक; द्विरुक्ती. उदा. आभास, आप्राण, आल्हाद, आघात (भास, प्राण, ल्हाद, घात याप्रमाणेच अर्थ). (ए) आ लावल्याने शब्दाचा अर्थ वाढतो, मर्यादित होतो, बदलतो किंवा फिरविला जातो. उदा. आग्रह (ग्रह = देणे, घेतल्यानंतर त्यालाच चिकटून राहणे). = हेका; आचार (चर् = घालणे) = शास्त्राप्रमाणे वागणूक ठेवणे; आगमन (गमन = जाणे) = जवळ येणे; येणे; आमोद (मोद = आनंद) = सुवास; आकृति (कृति = कृत्य) = मूर्ती; स्वरूप; आकार.
  आ अक्षर उच्चारताना होणारा ध्वनी व तोंडाचा होणारा आकार (स्थिती). वासलेले, उघडलेले तोंड : ‘तव सुप्रसाद मुदिरा इच्छितसे घातकी करीत ‘आ’ हे ।’ − मोआ ४·८३. (वा.) आ करणे − तोंड जास्तीत जास्त उघडणे (घसा तपासण्यासाठी). आ पसरणे − १. तोंड उघडणे; पदार्थ खाण्यासाठी आ करणे. २. मदतीसाठी, दयेची याचना करणे. ३. भोकाड पसरणे. आ वासणे − १. चकित होऊन निर्बुद्धपणे तोंड पसरणे, आ करणे; जांभई देणे. २. खाऊन टाकण्यासाठी तोंड उघडणे. ३. अधीनता, अंकितपणा कबूल करणे.
  आऽआऽ उद्‌गा. कबूतर, मोर इ. पक्ष्यांना बोलावण्याचा शब्द; घालावयाची साद.
उद्‌गा. आश्चर्य व दुःख व्यक्त करणारे प्रश्नार्थक अव्यय.
आइकट पु. तह. (गो.) [का. आयकट्टु = व्यवस्था]
आइकशी सक्रि. ऐकशील : ‘माजे आइकशी ता तू मुंबयच्या वाटे पडो नुकों.’ − मसाप. २·४·१११. (ग्रा.)
आइगेनफल न. (भौ.) भेददर्शक समीकरणातील विशिष्ट अटी पूर्ण करणारे उत्तर.
आइगेन मूल्य न. (ग.) योग्य मूल्य; दिलेले समीकरण सत्य करील असे अव्यक्त राशीचे मूल्य.
आइणी स्त्री. उत्कट इच्छा, आस : ‘अज्ञानाहि कवतिकें रूप केलें विकें । जव आइणी तुझी टिके । पुरे म्हणे ॥’ २. साम्यर्थ. ३. कौशल्य; नेपुण्य : ‘कमळास्वतुरांची आइणी पुरे : याचा गाइवा’ − रुस्व १५८.
आइणीपाइणी स्त्री. १. वासना; उत्कट इच्छा : ‘स्वेच्छा आइणी पाइणी । अर्जुनेसी रणांगिणी । द्वंद्वयुद्ध करावयामनीं । आवडी वसे अपार ॥’ − मुआदि ७०२. ३१·१११. २. सामर्थ्य.
आइत स्त्री. रचना : ‘सोळा खणांची आइत केली.’ − रुस्व ५४.
आइतवार   रविवार.
आइता वि. १. स्वतंत्र; स्वयंभू; आपोआप तयार झालेला; स्वतःसिद्ध; स्वयंपूर्ण : ‘तो तुझा तू आइता.’ − परमा ४·१६. २. श्रम, यत्न न करता प्राप्त झालेला, मिळालेला : ‘देव घ्या कुणी देव घ्या, आइता आला घर पुसुनि ॥’ − तुगा.
आइती वि. १. स्वतंत्र; स्वयंभू; आपोआप तयार झालेला; स्वतःसिद्ध; स्वयंपूर्ण : ‘तो तुझा तू आइता.’ − परमा ४·१६. २. श्रम, यत्न न करता प्राप्त झालेला, मिळालेला : ‘देव घ्या कुणी देव घ्या, आइता आला घर पुसुनि ॥’ − तुगा.
आइते वि. १. स्वतंत्र; स्वयंभू; आपोआप तयार झालेला; स्वतःसिद्ध; स्वयंपूर्ण : ‘तो तुझा तू आइता.’ − परमा ४·१६. २. श्रम, यत्न न करता प्राप्त झालेला, मिळालेला : ‘देव घ्या कुणी देव घ्या, आइता आला घर पुसुनि ॥’ − तुगा.
आइतिका स्त्री. सिद्धता; तयारी; सामग्री. पहा : आइती :‘भोजनाची आइतिका करविणें । तेयां कारणें ॥’ − क्रिपु १४५.
आइती स्त्री. १. सिद्धता; तयारी; सामग्री : ‘मग म्हाइंभटा ऋद्धिपुरा जावेयाचि आइती करुं आदरिली ।’ − ऋ १३३. २. विस्तार. [सं. आ+ यत् = प्रयत्न करणे]
आइतोजी वि. १. कष्टाच्यावेळी गैरहजर असणारा व फलोपभोगाच्या वेळी मात्र हजर असणारा (आइता, आइतोबा). २. काम न करता फुकट उपभोग घेणारा.
आइतोळा पु. पाटाच्या (पुनर्विवाहित) स्त्रीला तिच्या पूर्वीच्या नवऱ्यापासून झालेला मुलगा. (तिच्या दुसऱ्या नवऱ्यास मात्र हा मुलगा आयता मिळालेला असतो.).
आइनदान पु. १. कायदेबाज; कायदेपंडित. २. कायद्याच्या ज्ञानाचा फायदा घेऊन दुसऱ्यास फसविणारा (मनुष्य). [फा.]
आइनी स्त्री. उत्सुकता; खुमखुमी; युक्ती : ‘पुरैल भुजांची आइनी’ − उह ९०९.
आइसक्रीम न. दूध, दही, रस किंवा यासारख्या पातळ पदार्थात साखर (तसेच बदाम, केशर) घालून गोठवून केलेला खाण्याचा पदार्थ : ‘आइस्क्रीम तयार झाल्यावर प्रथम ते शीतकोठारात साठवीत असत.’ − माआ १७२. [इं.]
आइंद   (क्रिवि. १. येणारा; पुढे; पुढील वर्षी; आगामी : ‘सरकारचे वचनाची कायमी कशी तें आइन्दे जहुरात येईल.’ − मईसा १०·१६६. २. यंदा; या सालीं [फा. आयन्दा]