शब्द समानार्थी व्याख्या
इ.   १. मराठी वर्णमालेतील तिसरा वर्ण व स्वरमालेतील तिसरा स्वर. स्थानपरत्वे हस्व किंवा दीर्घ : उशिरा, विजा, तिला इ. मध्ये ऱ्हस्व; उशीर, वीज, ती − यात दीर्घ.
पु. (तत्त्व.) कामदेवाचे नाव. [सं.]
पु. (तत्त्व.) कामदेवाचे नाव. [सं.]
  उपसर्ग. स्थानाचा नजिकपणा दाखवण्याकडे उपयोग. उदा. इ−कडे, इ−थे, इ− तका इ.
प्र. चा, ची, चे षष्ठीचा फारसी प्रत्यय : ‘श्री कारवे व कोडिवले व वडिगाऊं राजमुद्रा मुख्य समस्त इ असिर्वादु’− शके १४२९ मधील एक पत्र. यातील समस्त इ = चे समस्त’ − भाद्विसंवृ १५. [फा.]
इउती वि. क्रिवि. या बाजूला ‘यासि एकु सेवटु इउती’− लीचपू ३०८.
इउलाला वि. एवढासा; लहान : ‘भगतुजनीं इउलालीं तोंडें केलीं असेति.’− गोप्र ५८.
इउलाली वि. एवढासा; लहान : ‘भगतुजनीं इउलालीं तोंडें केलीं असेति.’− गोप्र ५८.
इउलाले वि. एवढासा; लहान : ‘भगतुजनीं इउलालीं तोंडें केलीं असेति.’− गोप्र ५८.
इकटीक करणे सक्रि. (जिन्नस वगैरे) विकणे : ‘मी काही इकटीक करीन. पैसे ठेवणार नाही.’− गांधारी ८२.
इकडचा वि. या ठिकाणचा, बाजूचा, दिशेचा, रस्त्याचा, इकडे असणारा. (वा.)इकडचा डोंगर तिकडे करणे, इकडला गड तिकडे नेऊन ठेवणे– मोठे अचाट, अवघड काम करणे.इकडला लुच्चा तिकडला चोर– दोन्हींकडून थपडा खाणारा. (व.)
इकडला वि. या ठिकाणचा, बाजूचा, दिशेचा, रस्त्याचा, इकडे असणारा. (वा.)इकडचा डोंगर तिकडे करणे, इकडला गड तिकडे नेऊन ठेवणे– मोठे अचाट, अवघड काम करणे.इकडला लुच्चा तिकडला चोर– दोन्हींकडून थपडा खाणारा. (व.)
इकडील वि. या ठिकाणचा, बाजूचा, दिशेचा, रस्त्याचा, इकडे असणारा. (वा.)इकडचा डोंगर तिकडे करणे, इकडला गड तिकडे नेऊन ठेवणे– मोठे अचाट, अवघड काम करणे.इकडला लुच्चा तिकडला चोर– दोन्हींकडून थपडा खाणारा. (व.)
इकडचातिकडचा वि. या बाजूचा आणि त्या बाजूचा; विषयांचा; कोठला तरी; चार (अनेक) ठिकाणचा.
इकडून क्रिवि. येथून; या दिशेहून−ठिकाणाहून−बाजूकडून (ग्रा. रूप) इकडने. पहा :इकडे
इकडूनतिकडून क्रिवि. येथूनतेथून; आजूबाजूंनी; कोठूनतरी; कसेतरी.
इकडे पु. (स्त्रियांचा शब्द) पती; नवरा; जुन्या काळात नवऱ्याचे नाव न घेण्याच्या पद्धतीमुळे वापरात सर्वनामासारखा शब्द : ‘काय मेल्यांची छाती लागली आहे इकडच्या पुढें उभें राहण्याची’− पृच १३७.
इकडे क्रिवि. १. या बाजूस, दिशेस. २. येथे; या जागी. ३. स्थानी, कडे या अर्थी. पहा :एथे [हा + कडे; का. ईकडे; ते. इक्कड.]
इकडेस क्रिवि. १. या बाजूस, दिशेस. २. येथे; या जागी. ३. स्थानी, कडे या अर्थी. पहा :एथे [हा + कडे; का. ईकडे; ते. इक्कड.]
इकडेतिकडे क्रिवि. येथे तेथे; या बाजूस त्या बाजूस; आसपास; सगळीकडे.
इकडेतिकडे  स्त्री. (ल.) टंगळमंगळ; कुचराई; लपंडाव (क्रि. करणे, मांडणे).
इकरम पु. देणगी; दया; कृपा. [अर. अक्रम]
इकरा वि. अकरा. अकरा चा अप. (गो.)
इकराम पु. कृपा; मेहरबानी; मानसन्मान : ‘पथकी पण हकदक मानपान इक्राम कानू कायदेसुद्धां सुदामत चालत आल्याप्रमाणे.’— बाबारो २·६४. [फा. इक्राम]
इकरार पु. १. कबुली; करार; ठराव. २. लेखी किंवा तोंडी जबानी : ‘पर जिल्ह्यांतील साक्षीचा इकरार घेऊन पाठविणेंविषयीं जडजानें जडजास लिहावें’− न्यासे ३४. [अर. इक्रार]