शब्द समानार्थी व्याख्या
  मराठी वर्णमालेतील पाचवा वर्ण व स्वरमालेतील पाचवा स्वर. स्थानपरत्वे ऱ्हस्व किंवा दीर्घ जसे −मुळा, शुल्क इ. मध्ये ऱ्हस्व; किंतु, परंतु इ. मध्ये दीर्घ.
  उपसर्ग उलट क्रिया, विरोध, अभाव, अपकर्ष इ. अर्थी क्रियापदांना लागणारा एक उपसर्ग. उदा. उसवणे, उवळणे, उलगडणे इ.
पु. शिव; विष्णू (ओम्‌मधील दुसरा घटक उ म्हणजे विष्णू) : ‘उकार विष्णुरव्यक्त.’ − गुच २·१३०.
उं उद्गा. अँ:; ‘काय’ या अर्थी आश्चर्यार्थक किंवा प्रश्नार्थक उद्गार; बेपर्वाई, नाखुशी इ. व्यक्त करणारा शब्द. उच्चार अतिऱ्हस्व आणि अनुनासिक.
उइला वि. उवांनी भरलेला.
उक स्त्री. १. झळ : ‘माझिया विरहाग्नीची उक तूं कैसेनि साहसी.’ − भाए ७०. २. उकळी; उठावा. [का. उक्कु = ऊत येणे, कढ येणे.]
उकट   पहा :उकड
उकटणे उक्रि. १. जात्याला टाका देणे. २. (ल.) तोंडावर देवीचे वण उठणे−पडणे. [सं. उत् + कृत् = फाडणे, तुकडे करणे.]
उकटणे उक्रि. १. उलथणे (तव्यावरील पोळी वगैरे.) २. पहा :उचकटणे (राजा) [सं. उत्कथन]
उकटाई स्त्री. १. जात्याला टाकी देण्याची मजुरी. २. टाकी देण्याचे काम.
उकटी स्त्री. १. जात्याला टाकी दिल्यावर (जात्याची रेव जावी म्हणून) दळण्यात येणारे मूठभर धान्य २. टाकी देण्याचे हत्यार; टाकी. ३. नवीन टाकी दिलेल्या जात्यावर दळलेल्या धान्याच्या रस्त्यावर घातलेल्या फुल्या, वर्तुळे : ‘कल्पतरू तळवटीं असें सूर्यकरांची उकटी.’ − उगी ६१३. ४. टाकी दिल्यावर दळलेल्या रेवेच्या पिठाच्या फुल्या ओलांडल्यामुळे टाचेस अगर तळव्यास येणारे फोड, गळवे.
उकटी पु. दाह, उष्णता : ‘कल्पतरू तळवटीं । असें सूर्यकरांची उकटी’ − उगी ६१३.
उकटीव वि. टाकी दिलेले; नवे केलेले; दुरुस्त केलेले (जाते).
उकड स्त्री. १. मोदक वगैरे करण्याकरिता शिजवून केलेले तांदूळ वगैरेचे पीठ. (क्रि. तिंबणे.)
  वि. उकडलेला; शिजवलेला. [सं. उत्क्वथ्]
उकड क्रिवि. उकिडवा; चवड्यावर, मांडी न घालता (बसणे.) : ‘म्हणोनि उकड बैसोनि.’ − पंच १·११.
उकडआंबा पु. पाडाचा आंबा उकडून तोंडी लावण्यासाठी करतात तो. तो बरेच दिवस टिकावा म्हणून पाणखारात घालून ठेवतात.
उकडांबा पु. पाडाचा आंबा उकडून तोंडी लावण्यासाठी करतात तो. तो बरेच दिवस टिकावा म्हणून पाणखारात घालून ठेवतात.
उकडगरे पु. गरे शिजवून उकडून केलेली भाजी. फणस जून असला म्हणजे त्याची अशी भाजी करतात.
उकडणे उक्रि. १. शिजवणे; उष्णता लावून पदार्थ मऊ करणे : ‘तेणें सर्वही उकडती । अस्तिमांस ॥’ − दास ३·१·३०. २. हवेत उष्णता भासणे; गुदमरणे. ३. (सोनारी.) (कढवलेल्या तेलाने) मळ किंवा घाण काढून टाकणे. [सं. उत्+क्वथ्]
उकडपीठ न. तांदळाचे वगैरे उकडलेले पीठ.
उकडपेंडी स्त्री. रव्याला फोडणी देऊन तयार केलेले एक रुचकर खाद्य.
उकडपोळी स्त्री. उकडीत गव्हाच्या सांजाचे पुरण घालून केलेली पोळी.
उकडरस्सा पु. मांस, हाडे यांपासून केलेला रस्सा.
उकडलोणचे न. उकडलेल्या लिंबांचे किंवा मिरच्यांचे लोणचे.