शब्द समानार्थी व्याख्या
  मराठी वर्णमालेमधील एकोणिसावे अक्षर आणि चौथे व्यंजन.
घई   पहा : गई :‘योग्य जाहला संग म्हणावा काय घई या कैवारासी ।’-राला ४३.
घई स्त्री. (घराच्या दालनाची) गर्भी; विस्तार; रुंदी; (समासात) दुघई; चौघई इ.
घऊस वि. लठ्ठ; धष्टपुष्ट.
घऊस स्त्री. घुशीसारखा लठ्ठ माणूस : ‘शरिरानें बनली घऊस । तुला निजाया बसायची हौस ।’ –पला ७७.
घघाची विद्या   (घच्या बाराखडीतील) घेणे या कियापदापासून झालेला विशिष्ट वाक्प्रचार, घेऊ जाणे पण देऊ न जाणे अशी वृत्ती; दुसऱ्याचे घेण्याचे, लाटण्याचे ज्ञान, स्वभाव; लोभ; हावरेपणा; स्वार्थी वृत्ती; अप्पलपोटेपणा.
घघाची बाराखडी   (घच्या बाराखडीतील) घेणे या कियापदापासून झालेला विशिष्ट वाक्प्रचार, घेऊ जाणे पण देऊ न जाणे अशी वृत्ती; दुसऱ्याचे घेण्याचे, लाटण्याचे ज्ञान, स्वभाव; लोभ; हावरेपणा; स्वार्थी वृत्ती; अप्पलपोटेपणा.
घच्च पु. ‘रुतनेचा अवाजा.’ –(तंजा.)
घजन्फर पु. १. सिंह. २. (ल.) वीर; योद्धा. [फा.]
घजन्फरजंग पु. एक बहुमानाची, युद्धनैपुण्यदर्शक पदवी; युद्धात सिंहाप्रमाणे शूर; रणसिंह. [फा.]
घट पु. १. (भौ.) रासायनिक क्रियेने विद्युतप्रवाह निर्माण करू शकणारे साधन. २. पाणी इ. ठेवण्याचे भांडे; घडा; घागर (मातीची किंवा धातूची) : ‘जैसीं भांडघटशरावीं । तदाकारें असे पृथ्वी ।’-ज्ञा १३¿८७३. ३. नवरात्रात उपास्य देवतेजवळ पाण्याने भरून ठेवलेली मातीची घागर; घडा; कलश; नवरात्र बसणे; विशेष प्रकारची देवीची पूजा. (क्रि. बसणे.) ४. (ल.) विश्व; ईश्वराने निर्माण केलेले यच्चयावत जगत; शरीर इ. सृष्ट जीव, पदार्थ : ‘म्हणौनि प्राणिजातांच्या घटीं । करूनि कंदावरी आगिठीं ।’ –ज्ञा १५¿४०७. प्राणी, त्याचे शरीर : ‘घटघटाभिमानीए अनुस्युत’ –लीच १३३. ५. वाद्यविशेष. दक्षिण हिंदुस्थानात मातीचा माठ पालथा घालून त्याच्या पाठीवर दोन्ही हातांनी तबल्यासारखे वाजवून गायनाची साथ करतात. ६. नवरात्राकरिता कुंभाराकडून मातीची घागर घेण्याचा हक्क. (वा.) घट उठणे – नवरात्र संपणे; घट घटी बसणे – १. नवरात्र सुरू होणे; (नवरात्री मध्ये) आराध्य देवता घटावर अधिष्ठित होणे; देवतेची स्थापना होणे. २. घटस्थापना करणारा यजमान अथवा उपाध्याय यांनी घट असेपर्यंत व्रतनियमाने असणे इ. विधी प्रचलित आहेत. ३. (ल.) (आजारामुळे, आळसामुळे किंवा इतर काही कारणामुळे) घरात बसून असणे. ४. (ल.) (स्त्रीने) विटाळशी होणे; अस्पर्शपणामुळे निरुद्योगी बसून असणे. [सं.]
घट न. सोंगट्या वगैरेच्या पटावरील घर. (गो.)
घट स्त्री. १. दागिने तयार करताना, घासताना, कानसताना त्यांचे गोळा न करता येण्यासारखे परमाणू उडाल्याने मूळ वजनात येणारी तूट : ‘गाळणींत, घाट करण्यात अगर वहिवाटींत लागलेली घट खर्च घालण्याची मंजूरी देणे.’ –(बडोदे) खाजगी खात्यांतील अंमलदारांचे अधिकार १७८. २. धान्य मापताना, तूप इ. पदार्थ तोलताना मूळ मापात-वजनात होणारी तूट, घस : ‘आमचा माल निर्मळ असून त्यांत घट फार निघाली अशा प्रकारे पुष्कळ बोभाटे नेहमीं पत्रांतून येतात.’ –मुंव्या प्रस्तावना ५. ३. नुकसान (गळती, नास, आटणी इ. मुळे झालेले); तूट (क्रि. येणे, लागणे.) ४. (सामा.) ऱ्हास; उतार; कमी होणे; बटाव. (क्रि.येणे, लागणे.) ५. (मातकाम) घोटकाम करताना किंवा कोरीव काम करताना खाली पडलेली माती.
घटती स्त्री. १. दागिने तयार करताना, घासताना, कानसताना त्यांचे गोळा न करता येण्यासारखे परमाणू उडाल्याने मूळ वजनात येणारी तूट : ‘गाळणींत, घाट करण्यात अगर वहिवाटींत लागलेली घट खर्च घालण्याची मंजूरी देणे.’ –(बडोदे) खाजगी खात्यांतील अंमलदारांचे अधिकार १७८. २. धान्य मापताना, तूप इ. पदार्थ तोलताना मूळ मापात-वजनात होणारी तूट, घस : ‘आमचा माल निर्मळ असून त्यांत घट फार निघाली अशा प्रकारे पुष्कळ बोभाटे नेहमीं पत्रांतून येतात.’ –मुंव्या प्रस्तावना ५. ३. नुकसान (गळती, नास, आटणी इ. मुळे झालेले); तूट (क्रि. येणे, लागणे.) ४. (सामा.) ऱ्हास; उतार; कमी होणे; बटाव. (क्रि.येणे, लागणे.) ५. (मातकाम) घोटकाम करताना किंवा कोरीव काम करताना खाली पडलेली माती.
घट   (प्र.) घट्ट.
घटइल वि. वाळलेले; शुष्क: ‘म्हाइंभटासि…घटइलें ऐसें (अन्न) भीक्षेसि घालिती ।’ –गोप्रच २५०.
घटक पु. १. पूर्णाचा एक भाग; अंगभूत अवयव. २. मूलमान; एकक: ‘यानतंर गांव सुटून घराणें हा सामाजिक घटक झाला.’ –सासं २¿४१९. ३. एखादी वस्तू, पदार्थ ज्या ज्या द्रव्यांनी बनलेला असतो त्या त्या द्रव्यांपैकी प्रत्येक; (रसा.) मिश्रणातील कोणतेही स्वतंत्र द्रव्य. ४. (ग.) गुणाकाराच्या गुणकांपैकी एक गुणक. ५. (संख्या.) संशोधनात विचारासाठी घेतलेला एखादा चल अथवा विशेषक. ६. (संख्या.) चलांच्या गटातील सहसंबंधाचे स्पष्टीकरण करण्यासाठी उपयोगात आणला जाणारा फक्त एकाच चलात दिसून येणारा किंवा अनेक चलात सर्वसामान्य असणारा निर्धारक अथवा कारक. (शिक्षण) ७. पाठ्यवस्तूंच्या संदर्भात वापरला जाणारा शब्द; अध्ययन, अध्यापनाचा भाग, अंश; दैनंदिन अध्यापनाच्या दृष्टिकोनातून केलेले पाठ्यवस्तूचे विभाजन. ८. चाचणीच्या रचनेतील सर्वात लहान घटक. उदा. खरे खोटे चाचणीतील प्रत्येक विधान. ९. मध्यस्थ; मध्यस्थी करणारा; दोन पक्षात तडजोड करणारा (विशेषतः लग्ने जुळविताना.). १०. (सामा.) व्यवस्थापक. ११. घडविणारा; कार्यसाधक : ‘क्रोधन नामा यत्नें आला नृपकार्यसिद्धिचा घटक ।’ –मोरा १¿७२. १२. ज्योतिषी. १३. कर्ताकरविता (पर्यायाने ईश्वर). [सं.]
घटककण पु. अंशभूत, अवयवभूत अणू : ‘मांसाच्या घटक – कणास चलनवलनाचे…इत्यादी कामें नेमलेलीं असतात’ –आरोशा १¿४.
घटकद्रव्य न. (मिश्र पदार्थातील, धातूंतील) अवयवभूत पदार्थ.
घटकधातू पु. मिश्रधातूंतील अवयवभूत मूल धातू : ‘पण कांहीं गुणांनीं मिश्रधातू घटक – धातूंहून भिन्न असतो.’ – मपु ६¿१६८.
घटक पृथक्करण   (शिक्षण) प्रमाणित चाचणी तयार करताना त्यातील घटकांचे केलेले शास्त्रशुद्ध पृथक्करण.
घटकप्रेरणा स्त्री. फलित प्रेरणा ज्या भिन्न भिन्न प्रेरणांपासून उत्पन्न झालेली असते त्या प्रेरणांपैकी एक; अवयवभूत प्रेरणा : ‘फलित प्रेरणेच्या संबंधाने प्रत्येक प्रेरणेस घटकप्रेरणा म्हणतात.’ –यंस्थि ६.
घटक बाजार   (अर्थ.) भूमी, श्रम, भांडवल ही उत्पादनाची साधने किंवा उत्पादन घटक होत. उद्योजकाला हे घटक त्या साधनांच्या मालकाकडून खरेदी करावे लागतात. उद्योगाचे संयोजन करणारा उद्योजक आणि साधनांचे मालक यांच्यामधला विनिमय व्यवहार हीच घटकांची बाजारपेठ.
घटकभाग पु. फलाचा अंश; रचनेतील मूळ निरनिराळे भाग : ‘जेव्हां घटकप्रेरणा एकमेकांशी काटकोन करतात तेव्हां त्यांपैकीं प्रत्येक घटकास मूळ प्रेरणेच्या त्या दिशेतील घटकभाग असें म्हणतात.’ –यंस्थि १५.
घटकभार पु. (शिक्षण) १. घटक संरचित साच्यांमधील नोंदी. २. घटक काढीत असताना झालेली चाचणीची संपृक्तता. ३. काढण्यात येणाऱ्या घटकाचा विशिष्ट चाचणीशी असणारा सहसंबंध.