शब्द समानार्थी व्याख्या
घरकज्जा पु. घरातील तंटा; कौटुंबिक भांडण; गृहकलह.
घरकरी पु. पत्नीने नवऱ्याला उद्देशून वापरायचा शब्द; घरधनी; कारभारी; यजमान; घरमालक.
घरकसबी पु. आपल्या अक्कलहुशारीने घरगुती जरुरीचे जिन्नस घरच्या घरी तयार करणारा व घरची मोडतोड दुरुस्त करणारा मनुष्य; घरचा कारागीर; बाहेर काम करून उपजीविका न करणारा मनुष्य..
घरकंद पु. एक प्रकारचा कंद. (सामा.) कोनफळ; गोराडू.
घरका पु. १. काटा इत्यादिकांनी कातडीत, पायात केलेले घर. (कु.) २. वस्त्र, लाकडाची फळी इत्यादिकांना पाडलेले छिद्र, भोक.
घरकान्न स्त्री. घरधनीण; बायको; घरकरीण. (गो.)
घरकार पु. १. नवरा; पती. २. घरचा यजमान; घरधनी; मालक. (गो.कु.)
घरकारी पु. १. नवरा; पती. २. घरचा यजमान; घरधनी; मालक. (गो.कु.)
घरकारणी पु. घरचे सर्व काम पाहणारा; दिवाणजी; खाजगी कारभारी.
घरकी वि. घरातला; घरासंबंधीचा : ‘गावकी व घरकी कामे करणाऱ्या……’ – गांगा २७.
घरकुबडा   पहा : घरकोंबडा
घरकुबा   पहा : घरकोंबडा
घरकोंबा   पहा : घरकोंबडा
घरकोंग्या   पहा : घरकोंबडा
घरकोंडा   पहा : घरकोंबडा
घरकुंडा   पहा : घरकोंबडा
घरकोंधा   पहा : घरकोंबडा
घरघुबडा   पहा : घरकोंबडा
घरकुरती   पहा : घरगुती
घरकुल न. १. लहान घर; भातुकलीच्या खेळातील मुलींनी केलेले लहानसे घर : ‘तिया खेळतां करिती घरकुलीं ।’ – ज्ञा ९¿३७४. २. लहानसे झोपडीवजा घऱ : ‘वस्तीकरितां झावळ्याचे घरकूल करीन.’ – पाव्ह २८.३. घरटे; खोप. (वा). घराचे घरकूल होणे – वाताहत होणे.
घरकूल न. १. लहान घर; भातुकलीच्या खेळातील मुलींनी केलेले लहानसे घर : ‘तिया खेळतां करिती घरकुलीं ।’ – ज्ञा ९¿३७४. २. लहानसे झोपडीवजा घऱ : ‘वस्तीकरितां झावळ्याचे घरकूल करीन.’ – पाव्ह २८.३. घरटे; खोप. (वा). घराचे घरकूल होणे – वाताहत होणे.
घरकुली स्त्री. लहान घर; खेळातील घर : ‘करूनि ब्रह्मांडाची घरकुली । माजी बैसविली ब्रह्मांडादिक बाहुली ।’ – जै २९¿४५.
घरकुल्ली वि. बहुश : घराबाहेर न पडणारी (स्त्री); घरकोंबडी. (गो.)
घरकुंडा पु. १. पक्ष्याचे घरटे. भुंग्याचे घर; वाळवीचा निवारा. २. (ल.) आश्रयस्थान (को.) : ‘आम्हीं तुझ्या विश्रांतीचा घरकुंडा सोडतांच हे आमचे अद्वैतज्ञानाचे पांख आम्हांस तोलत नाहींसे होऊन आम्ही खालीं पडों लागलों.’ – यशोदा पांडुरंगी.
घरकुंडी वि. घरातला : ‘पोरीतला घरकुंडी खेळ …….’ – जोफु ९७.