शब्द समानार्थी व्याख्या
घरभऱ्या वि. दुसऱ्याचे पैसे, मालमत्ता लुबाडून स्वतःचा फायदा करून घेणारा: ‘तरी आपले लोक अजून समजतात की साधूंना किंवा त्यांच्या घरभऱ्या चेल्यांना पुष्कळ कळते.’ –गांगा ९५.
घरभंग पु. १. घराचा नाश, विध्वंस: ‘जिवलगांचा सोडिला संग । अवचिता जाला घरभंग ।’ –दास ३¿२¿६०. २. (ल.) कुळाचा, कुटुंबाचा नाश.
घरभाऊ पु. कुटुंबातील मनुष्य; नातलग; कुटुंबाच्या मालमत्तेचा, वतनवाडीचा वाटेकरी; हिस्सेदार; दायाद.
घरभाट पु. १. घऱाच्या आजूबाजूची आपल्या मालकीची जागा, जमीन; घरवाडी; विसवाट. (कु.) २. घराजवळचा नारळीचा बाग. (गो.)
घरभारी पु. १. पहा: घरबारी. २. ब्रह्मचारी, संन्यासी.
घरभांडवल न. १. कुटुंबातील मालमत्ता, जिंदगी, इस्टेट. २. एखाद्याचा खाजगी द्रव्यनिधी, ठेव; उसना काढलेला, कर्जाऊ काढलेला पैसा.
घरभांडवली वि. घरच्या, स्वतःच्या भांडवलावर व्यापार करणारा.
घरभेद पु. कुटुंबातील माणसांचे आपसांतील भांडण, तंटा; फाटाफूट; घरफूट.
घरभेदी वि. १. स्वार्थाने, दुष्टपणाने परक्याला, शत्रूला घरात घेणारा; फितूर; देशद्रोही. २. घरचा, राज्याचा, पक्का माहीतगार; घरची सर्व बिंगे ज्याला अवगत आहेत असा. ३. घरातील, राज्यातील कृत्ये, गुप्त बातम्या बाहेर फोडणारा; घर फोडणारा: ‘घरभेद्या होऊनि जेव्हां ।’ –संग्रामगीते १४०. ४. घरात, कुटुंबात, राज्यात, तंटे किंवा कलह लावणारा.
घरभेद्या वि. १. स्वार्थाने, दुष्टपणाने परक्याला, शत्रूला घरात घेणारा; फितूर; देशद्रोही. २. घरचा, राज्याचा, पक्का माहीतगार; घरची सर्व बिंगे ज्याला अवगत आहेत असा. ३. घरातील, राज्यातील कृत्ये, गुप्त बातम्या बाहेर फोडणारा; घर फोडणारा: ‘घरभेद्या होऊनि जेव्हां ।’ –संग्रामगीते १४०. ४. घरात, कुटुंबात, राज्यात, तंटे किंवा कलह लावणारा.
घरभोंदू वि. १. लोकांची घरे (त्यांना फसवून) धुळीस मिळवणारा २. (सामा) ठक; बिलंदर; लफंगा (मनुष्य).
घरमहार पु. राबता महार.
घरमारू वि. शेजाऱ्याला उपद्रव देणारा; त्याच्या नाशाविषयी खटपट करणारा.
घरमाऱ्या वि. शेजाऱ्याला उपद्रव देणारा; त्याच्या नाशाविषयी खटपट करणारा.
घरमेढा पु. घरातील कर्ता, मुख्य मनुष्य; कुटुंबाचा आधारस्तंभ.
घरमेढ्या पु. घरातील कर्ता, मुख्य मनुष्य; कुटुंबाचा आधारस्तंभ.
घरमेळावा पु. घरातील माणसे, सेवक इ.: ‘आणि तियेतेंचि आघवा । आथि घरमेळावा ।’ –ज्ञा १३¿३७.
घरमेळी क्रिवि. आपसांत; घरी; खाजगी रीतीने; आप्तेष्ट मंडळींमध्ये (तंट्याचा निवाडा, तडजोड करणे).
घरमोड न. चांभाराने तयार करून दिलेले आभूषण.
घरमोड स्त्री. घर मोडून ते विकणे: ‘कांहीं दिवसपर्यंत येथें घरमोडीचा व्यापार उत्तम समजला जात होता.’ –लोटिकेले १¿१६९. २. क्रि. घुरणे; मोडणे. –(तंजा.)
घरमोड्या पु. घरमोडीचा व्यापार करणारा : ‘त्यास जेव्हा घरमोड्याने घर घेतल्यामुळे घर सोडावे लागले…’ –मस्थि ३०१.
घररहाटी स्त्री. प्रापंचिक कामकाज: ‘मग चालवी घररहाटी ।’ –नाम २८३.
घरराखण स्त्री. १. (प्रां.) घराची पाळत; रक्षण; पहारा. २. घर राखणारा; घरावर पहारा ठेवणारा.
घररिघणी स्त्री. १. नवीन बांधलेल्या घरात प्रवेश करतेवेळी करायचा धार्मिक विधी. २. घरचा कारभार; घरकाम: ‘रचून विविध देहकुटी । तो घररिघवणी परिपाठी ।’ –विपू ७¿१२८.
घररिघवणी स्त्री. १. नवीन बांधलेल्या घरात प्रवेश करतेवेळी करायचा धार्मिक विधी. २. घरचा कारभार; घरकाम: ‘रचून विविध देहकुटी । तो घररिघवणी परिपाठी ।’ –विपू ७¿१२८.