शब्द समानार्थी व्याख्या
घराश्रम पु. गृहस्थाश्रम: ‘असे घराश्रमीं, भजे सर्वभूतीं ।’ –नाम ७६०.
घरीभरी वि. विपुल.
घरू न. १. कीड लागलेल्या लाकडाचे पीठ, भुसा. २. जळमटे; कोळिष्टके घरंव. (को.) पहा: घरवसा
घरू वि. घरचे; खाजगी; घरगुती: ‘चोरीच्या गुन्ह्याबद्दलचा विचार करतां रुपये २८ ॥ सरकारी नसून केशव नाथू याचे घरूं होते.’ –विक्षिप्त ३·८२.
घरैतेवरैते पु. अव.१. नवराबायको, स्त्रीपुरुष दांपत्य; जोडपे; दंपती. २. घरदार; गुणगोत. पहा: घरवरौत : ‘केवळ घरैतें वरैतें वर्तति तेथ नसावें ।’ –चक्रसूत्र २९.
घरौतेवरौते पु. अव.१. नवराबायको, स्त्रीपुरुष दांपत्य; जोडपे; दंपती. २. घरदार; गुणगोत. पहा: घरवरौत : ‘केवळ घरैतें वरैतें वर्तति तेथ नसावें ।’ –चक्रसूत्र २९.
घरोट पु. दळण्याचे लाकडी जाते: ‘कसा घरोट घरोट चाले माझा घरघर ।’ –लोसामा ५·२२९.
घरोटा पु. घरटे : ‘जशी रानपक्षीण बांधी घरोटा ।’ –अर्वाचीन ४९९.
घरोटी स्त्री. कुटुंबाची सामायिक मालमत्ता; वडिलोपार्जित मिळकत, इस्टेट. (को.) पहा : घरवट
घरोपाध्या पु. कुलोपाध्याय; कुलाचा पुरोहित, भटजी.
घरोबा पु. १. वस्तुतः एका घरचे नसता मित्रपणामुळे घरच्यासारखा झालेला स्नेहभाव; घरच्या माणसासारखा जिव्हाळ्याचा स्नेहसंबंध; ऐक्यभाव; बंधुभाव; एकमेकांकडे जाणे-येणे; घसट शेजारप्रेम: ‘तारुण्य रासभस्त्रियेपासीं । तिचा घरोबा वाहे शिशीं ।’ –भारा, बाल ९·६२. २. (बायकी) घरकाम; गृहकृत्य; घरातील कारभार: ‘त्वां आपला चालवितां घरोबा । धरूं नये किंचितमात्र लोभा ।’- सारुह ७·१२०. ३. प्रपंच; संसार; गृहस्थाश्रम: ‘घरोबा मांडिला दंडकाधारे; वाढली बाइको उपजलीं पोरें ।’ –दावि ४०. ४. (ल.) लग्न; विवाह; घरठाव (क्रि. मांडणे, करणे.) : ‘बायकोने दुसरा घरोबा सोनाराशीं केला.’ – थोमारो २·१५३. ५. ऋणानुबंध. –(तंजा.)
घरोर पु. घरजावई: ‘घरजावयास घरोर किंवा खंदाड म्हणतात व घरातील माणसे त्यास त्याच नावाने संबोधतात.’ –राके ५६१.
घरोरा खंदाड्या   लग्नामध्ये हुंडा न देता त्या बदल्यात मुलीच्या बापाकडे तीन ते पाच वर्षे काम करून राहणारा मुलगा.
घरोसा पु. १. जळमट. (को. बे. तंजा.) २. पावसाच्या ओलीमुळे भिंतीवर आलेला क्षार; लोणा.
घेरोसा पु. १. जळमट. (को. बे. तंजा.) २. पावसाच्या ओलीमुळे भिंतीवर आलेला क्षार; लोणा.
घरवसा पु. १. जळमट. (को. बे. तंजा.) २. पावसाच्या ओलीमुळे भिंतीवर आलेला क्षार; लोणा.
घरौते पु. अव.गृहस्थाश्रमी मनुष्य; पुरुष; गृहस्थ.
घर्कुले   लहान मुले भातुकली खेळताना आपल्या घरासाठी जे घालतात ते भिंताड, भिंत. –(तंजा.)
घर्ढिणे क्रि. १. ठेचणे २. दाढा खाणे.
घर्नळा   गळा, घसा. –(तंजा.)
घर्म पु. घाम; स्वेद; श्रमामुळे त्वचेला येणारा ओलावा. पहा: घाम [सं.]
घर्मबिंदु पु. घामाचा थेंब. [सं.]
घर्मबिंदू पु. घामाचा थेंब. [सं.]
घर्मरंध्र न. घाम ज्यातून बाहेर पडतो असे त्वचेवरील सूक्ष्म छिद्र. [सं.]
घर्मस्त्राव पु. घाम येणे. [सं.]