शब्द समानार्थी व्याख्या
घवस वि. घवघवीत; ठळक; ठसठशीत : ‘लेकाच्या परीस सून करावी घवस ।’ –राके २५.
घवसुचे अक्रि. (गवसणे) मर्म समजणे; खुबी लक्षात येणे. (गो.)
घवा पु. खोल खळगा; तळखडकाला मिळणारा खड्‌डा. (मावळी) [सं. गव्हर]
घवाळा पु. चांगला नाग, साप. –तंजा.
घव्य वि. तेजस्वी: ‘नाना उदास घव्य मूर्ति ।’ –सप्र ७·३३. ‘तंव समर्थमूर्ति घव्यवाणी देखिली ।’ –सप्र २·२२. [सं. गह्]
घव्यवाणी वि. तेजस्वी: ‘नाना उदास घव्य मूर्ति ।’ –सप्र ७·३३. ‘तंव समर्थमूर्ति घव्यवाणी देखिली ।’ –सप्र २·२२. [सं. गह्]
घशा पु. चुन्यासारखी पांढरी असलेली एक प्रकारची माती. (को.)
घशिटा स्त्री. न. (खोगिराला) तंग घासटू नये म्हणून खोगिराच्या प्रत्येक भागाला लावलेले चामड्याचे अस्तर.
घशिटे स्त्री. न. (खोगिराला) तंग घासटू नये म्हणून खोगिराच्या प्रत्येक भागाला लावलेले चामड्याचे अस्तर.
घशीट स्त्री. न. (खोगिराला) तंग घासटू नये म्हणून खोगिराच्या प्रत्येक भागाला लावलेले चामड्याचे अस्तर.
घशेट स्त्री. न. (खोगिराला) तंग घासटू नये म्हणून खोगिराच्या प्रत्येक भागाला लावलेले चामड्याचे अस्तर.
घशिटा स्त्री. न. (खोगिराला) तंग घासटू नये म्हणून खोगिराच्या प्रत्येक भागाला लावलेले चामड्याचे अस्तर.
घष्टणी स्त्री. १. घासाघाशी: ‘घष्टणी घिसणी घस्मरपणे । घसर घसरूं घसारवाणें ।’ –दास १४·४·४. २. भांडी घासण्याची नोकरी; काबाडकष्टाची नोकरी; दास्य. (गो.) [सं. घृष्]
घष्टनी स्त्री. १. घासाघाशी: ‘घष्टणी घिसणी घस्मरपणे । घसर घसरूं घसारवाणें ।’ –दास १४·४·४. २. भांडी घासण्याची नोकरी; काबाडकष्टाची नोकरी; दास्य. (गो.) [सं. घृष्]
घष्टणे सक्रि. १. घासणे: ‘जो सांपडला काळचपेटीं । पडपडों । पुनरपि होईल कष्टी । थाक न लागे घष्टिला च घष्टी ।’ –दावि २२८. २. कष्टाने काढणे, व्यतीत करणे, कंठणे (वेळ, काळ): ‘मनीं राम वेष्टी बळें काळ घष्टी ।’ –दावि २१६. [सं. घृष्ट]
घस्टणे सक्रि. १. घासणे: ‘जो सांपडला काळचपेटीं । पडपडों । पुनरपि होईल कष्टी । थाक न लागे घष्टिला च घष्टी ।’ –दावि २२८. २. कष्टाने काढणे, व्यतीत करणे, कंठणे (वेळ, काळ): ‘मनीं राम वेष्टी बळें काळ घष्टी ।’ –दावि २१६. [सं. घृष्ट]
घष्टा पु. १. पदार्थ घासताना त्याला दिलेला जोराचा घसडा; पदार्थ घासण्याकरिता त्यावरून हात फिरविण्याची क्रिया. (क्रि. मारणे.) २. एखाद्याच्या शेजारून जाताना जोराने लागलेला धक्का, घसरा. [सं. घृष्ट]
घष्टे न. तूप; कढविलेले लोणी. (ग्राम्य)
घस स्त्री. १. झुपका; गुच्छ; घड. पहा: घोस, २. व्यापाराला आलेली तूट; तोटा; नुकसान; बूड; खोट. (क्रि. सोसणे, बसणे, लागणे, येणे). ३. (गळल्या, झिरपण्याने, सुकल्याने, घासले गेल्याने) पदार्थाच्या मूळच्या मापात, वजनात येणारी तूट, न्यूनता, झीज, घट. ४. सोने पारखताना कसावर उमटलेली सोन्याची रेघ; सोन्याचा कस. [सं. घृष्], ५. भांडे, कढई, किटली, मडके इ. सतत चुलीवर ठेवल्याने त्याच्या बुडाला जमणारा मशेरीचा थर; खरप; खरपी; मस; जळ. (कु.) ६. लोणी कढविल्यानंतर भांड्याच्या तळाला बसणारी बेरी. ७. भांडे, कढई, किटली, मडके इ. सतत चुलीवर ठेवल्याने त्याच्या बुडाला जमणारा मशेरीचा थर; खरप; खरपी; मस; जळ. (कु.) ८. लोणी कढविल्यानंतर भांड्याच्या तळाला बसणारी बेरी. ९. मुसंडी; जोराने घुसणे : ‘मिठ्‌ठूनं वर्तुळात घस मारली.’ –बाविबु २१०.
घस वि. एकदम उतरते; उभ्या उतरणीचे (छप्पर इ.). (राजा.)
घसळ वि. चिवट; चिकट. (व.)
घसकन क्रिवि. १. धान्य इ. एकदम पुष्कळ ओतताना होणाऱ्या घस् घस् अशा आवाजाने. २. (ल.) एकदम; एखाद्या कामाचा तडकाफडकी झटपट निकाल दाखवणारा शब्द.
घसकर क्रिवि. १. धान्य इ. एकदम पुष्कळ ओतताना होणाऱ्या घस् घस् अशा आवाजाने. २. (ल.) एकदम; एखाद्या कामाचा तडकाफडकी झटपट निकाल दाखवणारा शब्द.
घसदिशी क्रिवि. १. धान्य इ. एकदम पुष्कळ ओतताना होणाऱ्या घस् घस् अशा आवाजाने. २. (ल.) एकदम; एखाद्या कामाचा तडकाफडकी झटपट निकाल दाखवणारा शब्द.
घसकरणे   क्रि. पायात बळ नसल्यामुळे भिंत बसणे. –(तंजा.)