शब्द समानार्थी व्याख्या
घसराघसरी स्त्री. हिसकाहिसकी; धक्काबुक्की; ओढाओढी; झुंज; झोंबाझोंबी. [घसरणे चे द्वि.]
घसवट स्त्री. पु. १. (एखाद्या कामाचा, कलेचा) राबता; सराव. २. परिचय; घसरट; दाट ओळख. ३. वहिवाट. (वा.) घसटीस पडणे, घसटीखाली पडणे – १. एखाद्या कामाचा, कलेचा राबता, सराव होणे. २. दाट परिचय होणे; घसट, घसरट होणे.
घसवटा स्त्री. पु. १. (एखाद्या कामाचा, कलेचा) राबता; सराव. २. परिचय; घसरट; दाट ओळख. ३. वहिवाट. (वा.) घसटीस पडणे, घसटीखाली पडणे – १. एखाद्या कामाचा, कलेचा राबता, सराव होणे. २. दाट परिचय होणे; घसट, घसरट होणे.
घसाटा स्त्री. पु. १. (एखाद्या कामाचा, कलेचा) राबता; सराव. २. परिचय; घसरट; दाट ओळख. ३. वहिवाट. (वा.) घसटीस पडणे, घसटीखाली पडणे – १. एखाद्या कामाचा, कलेचा राबता, सराव होणे. २. दाट परिचय होणे; घसट, घसरट होणे.
घसवटणे उक्रि. १. घासले जाणे; झांजरणे; खरचटून जाणे; घासटणे, चाटले जाणे; घासल्याने झिजून जाणे: ‘अहो आत्मेपणीं न संटों । स्वसंवितीं न घसवटों ।’ –अमृ ८·४. २. घासणे; घासटणे: ‘वायोचा कातरा घसवटे । तेणें उष्णें वन्हि पेटे ।’ –दास १३·३·८. ३. सराव होणे; अंगी मुरणे, जडणे. ४. (मनुष्य, पशू, वस्तू) चांगली राबती असणे; सारखी उपयोगात आणली जाणे; अभ्यस्त होणे. [सं. घृष्+वट]
घसवटी स्त्री. १. पहा: घसवट. २. घसरा; खरचटून पडलेला ओरखडा; घष्टा: ‘पाषाणघाव घसवटी । अदृश्यपणें मिरवले ।’ –नव २४·१३०.
घसा पु. १. राब वाहून नेण्याची बिनचाकी गाडी. पहा: घसे, २. गळ्याच्या आतील भाग; नरडे; अन्ननलिका. ३. श्वासनलिका. ४. आवाज; कंठध्वनी. [सं. घस्] (वा.) घसा कोरडा पडणे, घसा कोरडा करणे – अतिशय तहानेने घसा सुकणे, घशाला शोष पडणे. फार वेळ बोलत राहणे; घसा कोरडा होईपर्यंत एखाद्याला उपदेश, एखाद्याशी डोकेफोड करणे. घसा खाणे – घशाशी घुरघुरणे; घशात घरघर आवाज होणे; घसा वाजणे: ‘घसर घसरूं घसा खाणें । घुमघुमोंचि घुमणें । योग्य नव्हें ॥’ –दास १४·४·४. घसा निवणे – शिरच्छेद करणे. घसा पसरणे – (एखादी वस्तू खाण्याकरिता, गिळण्याकरिता) आ करणे; तोंड उघडणे. आशाळभूतपणाने पाहणे. घसा फुटणे – (मुलगा)वयात आल्यामुळे त्याचा आवाज, स्वर बदलणे; आवाजाची कोमलता नष्ट होऊन तो मर्दानी बनणे; घाटी फुटणे. पहा: घाटी. घसा बसणे –(ओरडण्याने, तेलकट इ. पदार्थ खाल्ल्याने) आवाज घोगरा होणे; शब्दाचे उच्चार अस्पष्ट होणे. घसा वाजणे – घोरणे; (घसा) घरघर वाजणे. घसा येणे – घशाला सूज येऊन तो दुखणे. घशाखाली उतरणे – १. गिळला जाणे; गिळंकृत होणे. २. (ल.) लाच खाल्लेला, लबाडीने लाटलेला पैसा पचवला जाणे. ३. कबजात जाणे: ‘पण एतद्देशीय संस्थाने मात्र सरकारच्या घशाखालीं उतरविलीं.’ –नि. घशात घालणे, घशात टाकणे – बळकावणे; गिळंकृत करणे; (एखाद्या मालमत्तेवर) बळेच हक्क सांगून (ती) बळकावणे: ‘दुसऱ्याचे देश घशात घालण्याची असुरी लालसा टिकणार नाहीं.’ –के १४·६·३०. :‘सरकारचा विचार इंदूरची इस्टेट घशात टाकण्याचा होता.’ –विक्षिप्त ३·१६४. घशात पीक धरणे, घशात पीक अडकणे – पाऊस न पडल्यामुळे पिकांची, कणसांची वाढ खुंटणे. घशातून काढणे – खाल्लेला, गिळंकृत केलेला पैसा, चोरलेला माल इ. परत द्यायला भाग पाडणे. घशाबाहेर पडणे – १. गिळंकृत केलेली वस्तू, पैसा बाहेर ओकून पडणे. २. पीक पोटरीवर येणे; पीक निसवणे, पिकाचे कणीस, लोंगर बाहेर पडणे.
घसाघस क्रिवि. १. गवत कापताना, पदार्थ चावताना, चर्वण करताना होणाऱ्या घस् घस् अशा आवाजाप्रमाणे; खसाखस. २. उधळपट्टीने; मनसोक्तपणे; मनाला येईल तसे; बेसुमार (पैसा खर्च करणे, खाणे इ.). [ध्व.]
घसाघसा क्रिवि. १. गवत कापताना, पदार्थ चावताना, चर्वण करताना होणाऱ्या घस् घस् अशा आवाजाप्रमाणे; खसाखस. २. उधळपट्टीने; मनसोक्तपणे; मनाला येईल तसे; बेसुमार (पैसा खर्च करणे, खाणे इ.). [ध्व.]
घसासा क्रिवि. १. गवत कापताना, पदार्थ चावताना, चर्वण करताना होणाऱ्या घस् घस् अशा आवाजाप्रमाणे; खसाखस. २. उधळपट्टीने; मनसोक्तपणे; मनाला येईल तसे; बेसुमार (पैसा खर्च करणे, खाणे इ.). [ध्व.]
घसाघसी स्त्री. तक्रार; भांडण; घासाघीस. (व.)
घसाघीस   पहा: घासाघीस : ‘[ड्रायव्हरशी घसाघीस करीत वसंत म्हणाला…’ –अगतिका. ४८.
घसाटा   पहा: घसवट
घसाटी वि. न कळणारे अक्षर. (झाडी)
घसाड वि. (अशिष्ट भाषेत) विपुल; पुष्कळ; रगड.
घसाडणे उक्रि. १. चोळणे; घासणे; उजळा देणे. २. (धान्य इ.) भरडणे.
घसाडा पु. जोराचा धक्का. (व.)
घसाफोड स्त्री. मोठ्याने ओरडून बोलणे.
घसारणे अक्रि. अतिशय दिपविणे. [सं. घंष्]
घसारत स्त्री. झपाट्याचा उतार : ‘ती घसारत संपल्याच्या जागंला पूल’ –रैत १२.
घसारा पु. १. घोळका : ‘खंडोजी दाभाडे उभयता महाराजास घेऊन, गवतास पोरगे जात होते, त्यांचा वेष देऊन, घसाऱ्याबरोबर बाहिर निघोन गेले.’ –दासब २. २. अनेक औषधे उगाळून एकत्र केलेले सरबरीत मिश्रण. ३. (आसन्नमरण मनुष्याला लागलेली) घरघर; घरडा. ४. जोराने घासणे; (एखादा पदार्थ दुसऱ्या पदार्थाला लागून गेल्याने पडणारा) ओरखडा; रेघोट्या; घस; घसरा : ‘चामड्यास घसारा लागूं नये म्हणून त्यावर लांकडी चिपा बसवाव्या.’ –स्वारीनियम (बडोदे) ५५.
घसारा   पु. झीज; इमारत, यंत्रे, सामान वगैरे वापरल्यामुळे त्यांच्या किंमतीत पडणारी तूट, न्यून, उणेपणा; नैसर्गिक व व्यावहारिक कारणांमुळे एखाद्या इमारतीचे, वस्तूचे होणारे अवमूल्यन; [अर. खसार]
घसारा निधी   घसाऱ्यामुळे वापरण्यास अयोग्य झालेली मालमत्ता बदलून तिच्या जागी नवीन खरेदी करण्यासाठी राखून ठेवलेला निधी.
घसास   पहा: घसाघस : ‘वीर तोडिती घसास । सिर फोडिती ठसास । शुळ टोचिती भसास । आपशुद्धी नेणती ।’ –दावि ४९६.
घसासा   पहा: घसाघस : ‘वीर तोडिती घसास । सिर फोडिती ठसास । शुळ टोचिती भसास । आपशुद्धी नेणती ।’ –दावि ४९६.