शब्द समानार्थी व्याख्या
घुम्मनघुसा वि. घुमा; आतल्या गाठीचा : ‘माणसानं सदा घुम्मनघुस्यागत असूने.’ – रैत ६७.
घुयऱ्या वि. घुम्या. (व.)
घुरकणी स्त्री. वाघाची डुरकावणी, डरकाळी. (गो.)
घुरकणे अक्रि. (वाघ इत्यादीने) ओरडणे; आरोळी ठोकणे. पहा : गुरकणे : ‘पदतळीं असती दोनी व्याघ्र । घुरकोनि पाहती रूप उग्र ।’ –दावि ३४४. [हिं. घुरकना] [सं. घुर]
घुरकी   पहा : घुमरी १
घुरकी स्त्री. चक्कर; फेरा; धक्का; भोवरा; हिसका; टोला : ‘ऐकिल्यास उत्तम नाहीं तर एके घुरकींत हातपाय गळून पडतील.’ – मइसा ५·७९. [ध्व.]
घुरकॉ वि. डुरकणारा; घुरकणारा; डुरक्या फोडणारा (वाघ इ.) (गो.)
घुरगडी स्त्री. एक प्रकारचा हुक्का. (हेट.)
घुरगुटणे   पहा : गुरगुटणे
घुरघुर स्त्री. पहा : गुरगुर; घरघर [सं. घुर्]
घुरघूर स्त्री. पहा : गुरगुर; घरघर [सं. घुर्]
घुरघुरणे अक्रि. १. पहा : गुरगुरणे. २. वाजणे : ‘तुरतुरिती काहाळां । घुरघुरितीं टिवाळा ।’ – शिव २. [सं. घुर्]
घुरघुर वात   ज्याच्या योगाने पोटात गुरगुरते व स्नायूंच्या शक्ती क्षीण होतात असा वाताचा विकार.
घुरघुरा पु. एक किडा; घोगेरा. [ध्व.]
घुरघूस पु. स्त्री. फकिराच्या हातातील एक हत्यार. पहा : गुरगुज
घुरघूस क्रिवि. गाढ; स्वस्थ घोरत. पहा : गुरघुस. (क्रि. निजणे.) (वा.) ॰ मारणे – पाय पोटाशी घेऊन निजणे; गुरगुटून निजणे.
घुरट वि. १. ज्याच्या अंगाला दूध, दही, ताक, लोणी इत्यादिकांचा कुजट व उग्रट वास येतो असा (बकरा, मांजर, वाघ इ.) : ‘तुझिये अंगीं घुरट घाणी । बहु खासी दूध तूप लोणी ।’ – तुगा १२९. २. घामट; घाणेरडी : ‘घाणेरी घुरटी तुला तरि कसी ते मानली नाकळे ।’ – निमा १·६६. ३. घुमा.
घुरटा वि. १. ज्याच्या अंगाला दूध, दही, ताक, लोणी इत्यादिकांचा कुजट व उग्रट वास येतो असा (बकरा, मांजर, वाघ इ.) : ‘तुझिये अंगीं घुरट घाणी । बहु खासी दूध तूप लोणी ।’ – तुगा १२९. २. घामट; घाणेरडी : ‘घाणेरी घुरटी तुला तरि कसी ते मानली नाकळे ।’ – निमा १·६६.
घुरटाण स्त्री. (मेंढा, मांजर इ. जनावराच्या अंगाची येणारी) उग्रट, कुजट घाण; घुरष्टाण.
घुरष्टाण स्त्री. (मेंढा, मांजर इ. जनावराच्या अंगाची येणारी) उग्रट, कुजट घाण; घुरष्टाण.
घुरणे अक्रि. १. घोरणे. २. घुरघुर आवाज करणे (मांजर इ. नी). [सं. घुर], ३. जमणे; गोळा होणे : ‘कितीतरी कावळे त्याच्याभोवती घुरले होते.’ – शेलूक १४७.
घुरदळणे अक्रि. जुगार खेळणे, इकडून तिकडे उड्या मारणे; धांगडधिंगा घालणे; धिंगामस्ती करणे; धुडगूस, धिंगाणा घालणे; खिदडणे; धिंगडणे. [सं. खुर्द]
घुरदळणे सक्रि. पहा : गुधडणे
घुरदळा पु. न. १. पहा : गुधडा. २. खिदडा; धिंगाणा; धांगडधिंगा; धिंगामस्ती. (क्रि. घालणे, मांडणे.)
घुरदके पु. न. १. पहा : गुधडा. २. खिदडा; धिंगाणा; धांगडधिंगा; धिंगामस्ती. (क्रि. घालणे, मांडणे.)