शब्द समानार्थी व्याख्या
घुसपणी स्त्री. गुंतागुंत; गोंधळ; घोटाळा. (गो.)
घुसपागोंधळ पु. गुंतागुंत; घोटाळा.
घुसपाल पु. (कान इ.) पिळण्याची, पिरगळण्याची क्रिया; कानाला खडा लावणे; पुन्हा न करण्याचा निश्चय. (गो.)
घुसपूचे अक्रि. गुंतणे; गोंधळणे. (गो.)
घुसमट स्त्री. १. श्वासनिरोध; जीव कोंडणे. २. पहा : घुसमड. ३. धांदल; कोंडमार; उलघाल; कुचंबणा : ‘तेच पेलताना नाकी नऊ येत होते, घुसमट घडत होती ।’ – गाणे ४.
घुसमटणी स्त्री. गुदमरणी; श्वासाचा कोंडमारा. (गो.)
घुसमटणे अक्रि. १. दम कोंडल्यासारखे होणे; गुदमरणे; श्वासावरोध होणे. २. (ल.) कोंडमारा झाल्याने, तोंड दाबून बुक्कीचा मार अशी अवस्था झाल्याने अगदी जेरीला येणे; कोंडमारा होणे; अडचणीत सापडणे. ३. घुसडले जाणे; अस्ताव्यस्त होणे; चोळवटून जाणे; चुथडा होणे.
घुसमटमार पु. गुदमरणे; कोंडमारा; दम कोंडणे. (गो.)
घुसमड स्त्री. १. तुडवणी; गुधडा पाडणे; मर्दन, चोळामोळा. २. धुडगूस; धिंगाणा; धिंगामस्ती; धांगडधिंगा.
घुसमडणे अक्रि. घुसणे; शिरणे : ‘आईच्या कुशीत घुसमडून त्यांच्या गोजिरवाण्या पिलांनी त्याचे अनुकरण केले.’ – व्यंमाक २.
घुसमडणे   पहा : घुसमाटणे १
घुसमाटणे सक्रि. १. (एखाद्याची) रग जिरवणे; (एखाद्याला) जमिनीवर लोळवून त्याची गात्रे शिथिल करणे. (ना.) २. रगडणे; दडपणे : ‘मुरगाळीतां कान घुसंमडीत सावधान ।’ – तुगा ३२०६. ३. कोंडमारा करणे.
घुसमाडणे सक्रि. १. (एखाद्याची) रग जिरवणे; (एखाद्याला) जमिनीवर लोळवून त्याची गात्रे शिथिल करणे. (ना.) २. रगडणे; दडपणे : ‘मुरगाळीतां कान घुसंमडीत सावधान ।’ – तुगा ३२०६. ३. कोंडमारा करणे.
घुसमारा पु. फेकाफेक.
घुसमांडणे सक्रि. कोंडमारा करणे.
घुसलखाना पु. १. स्नानगृह; न्हाणीघर. २. खलबतखाना; एकांताची खोली. [अर. घुस्ल = स्नान + फा. खाना = घर.]
घुसळखांब पु. (ताक, दही इ.) घुसळण्याची रवी दोरीने ज्या खांबाला अडकवलेली असते तो खांब; घुसळ्यासाठी उपयोगी खांब.
घुसळण न. घुसळण्यासाठी भांड्यात घातलेली दही, विरजण इ. घुसळण्याची क्रिया : ‘उठुनी प्रातकाळीं गौळणी घुसळण घुसळीती ।’ – भज १०.
घुसळणे सक्रि. १. (दही इ. भांड्यात घालून) रवीने जोरात फिरवणे; मंथन करणे; ढवळणे. २, गदगदा जोराने हलवणे; इकडून तिकडे ढकलणे. ३. (एखाद्याला) फार किंवा अवघड कामे सांगून दमवणे, राबवणे, बेजार करणे; जेरीला, जिकिरीला आणणे; घाम काढणे. याच अर्थी हाडे घुसळणे असाही प्रयोग आहे. [सं. घृष्]
घुसळप न. १. घुसळण्याची क्रिया. २. घुसळण्याचे विरजण. (कर.) पहा : घुसळण १.
घुसळा पु. १. घुसळून निघालेला पदार्थ. २. (घुसळून काढलेला) लोण्याचा गोळा, नवनीत.
घुसळीव वि. घुसळलेला; मंथन केलेला.
घुसा पु. १. राग; रागाची लहर : ‘मोठा घुसा येऊन…’ – मदरू १·१७. २. अढी; अवकृपा. [फा. घुस्सा], ३. ठोसा; गुद्दा; धपका; धक्का; तडाखा. [हिं. घूसा]
घुस्सा पु. १. राग; रागाची लहर : ‘मोठा घुसा येऊन…’ – मदरू १·१७. २. अढी; अवकृपा. [फा. घुस्सा], ३. ठोसा; गुद्दा; धपका; धक्का; तडाखा. [हिं. घूसा]
घुसाडणे   पहा : घुसमाटणे