शब्द समानार्थी व्याख्या
घुंघुरदा पु. घों घों असा आवाज करणारा भुंगा, भ्रमर, भोवरा. [ध्व.]
घुंघूर   पहा : घुंगुर, घुंगरु
घुंघूर पु. फुलाचा कांदा; घांगूड.
घुंची स्त्री. खोळ : ‘सिदूने मेणकापडाची घुंची अंगावर घातली.’ – जाण ३२.
घुंबड स्त्री. गर्दी; झुंबड. (बे.) [क. गुंपु.]
घुंबरडा पु. १. कबुतरांचा घूं घूं असा आवाज; कबुतरांचे घुमणे. २. (ल.) गोंगाट; कलकलाट (मुलांचा – खेळण्याच्या वेळेचा). (क्रि. घालणे, करणे.)
घुंवचे अक्रि. स्वतः भोवती फिरणे राहणे; गरगर फिरणे; झिंगणे. (गो.)
घुंवळ स्त्री. भोवळ; घेरी; चक्कर. (गो.)
घुंवळचे अक्रि. घेरी, चक्कर येणे; मस्तकात भ्रमण होणे. (गो.)
घूक पु. घुबड; दिवाभीत : ‘देते परघूकार्ते सुहृदब्जांचे प्रभाकर दरा जे ।’ – मोद्रोण १२·२५. [ध्व. सं. घूक]
घूकदृष्टि स्त्री. (घूक म्हणजे घुबड हे दिवसा डोळे पूर्ण उघडत नाही व किलकिले करून पाहते यावरून) डोळे अर्धवट मिटून पाहणे. [सं.]
घूकदृष्टी स्त्री. (घूक म्हणजे घुबड हे दिवसा डोळे पूर्ण उघडत नाही व किलकिले करून पाहते यावरून) डोळे अर्धवट मिटून पाहणे. [सं.]
घूट पु. घोट. (झाडी)
घूट वि. लठ्ठू व ठेंगू; धष्टपुष्ट आणि बुटका. (को.)
घूंट वि. लठ्ठू व ठेंगू; धष्टपुष्ट आणि बुटका. (को.)
घूड पु. १. घोस; पुंज; पुंजका; घड; गुच्छ. २. काप इ. दागिन्यांना लावतात तो मोत्यांचा घोस, झुबका. ३. घुमट; मनोरा; डेरा (गो.) [क. गुडु]
घूड न. १. कोंबड्या झाकून ठेवण्याची मातीची घुमटी; कोबड्यांचे खुराडे. (कर.) [क. गुडु], २. कणसासकट पेंढ्यांची टोके उभी करून लावलेली रास. (बे.) [क. गुडु]
घूण पु. लाकूड, धान्य वगैरे पोखरणारा किडा. [सं.]
घूत्कार पु. घुबडाचा आवाज. [ध्वं.]
घूम पु. १. डोळ्याच्या पापणीच्या आतील बाजूला होणारा रोग; (सामा.) खुपरी घुमड. (क्रि. येणे. फुटणे, होणे.), २. हरलेल्या गड्याच्या भोवऱ्याला पाडलेला खोचा. [क. गुम्मु = मारणे], ३. घूमपेंढीच्या खेळातील व आट्यापाट्यामधील एक पारिभाषिक शब्द. [क. गुम्मु = मारणे], ४. (कवायत) अर्धचक्कर मारणे. [सं. घूर्ण्]
घूमजाव पु. १. कवायतीतील एक हुकूम. हा हुकूम मिळाल्यास ज्या दिशेला आपले तोंड असेल तिच्या विरुद्ध दिशेला ते करणे. २. बदल.
घूय घालणे   मुलांचा एक खेळ. यात एखाद्या मुलाला कोंबळ्याखाली झाकून त्याला डहाळ्यांनी झोडपतात. त्यामुळे त्याला राग येऊन तो सवंगड्याला पकडायला धावतो. (कु.)
घूर पु. माशाची एक जात. (गो.)
घूर्ण वि. १. धुंद; मस्त; माजलेला : ‘अहंमहामदें उन्मत्त पूर्ण । देह तारुण्यें अति घूर्ण ।’ – एभा ३·५१७. २. भ्रमणारा; घुमणारा. [सं.]
घूर्णन न. गरगर फिरणे; परिभ्रमण करणे; फेर, गिरकी घेणे, भोवंडणे. [सं.]