शब्द समानार्थी व्याख्या
घोगा वि. मोठा; प्रसिद्ध : ‘तुका म्हणे आम्हाजोगें । विठ्ठल घोगे खरे माप ।’ – तुगा १७९८.
घोगार   पहा : घोंगाड, घोंगाडणे
घोगारणे   पहा : घोंगाड, घोंगाडणे
घोगी पु. नरडे. (अहि.)
घोगे क्रिवि. १. घों घों आवाज करीत. २. (ल.) जलदीने; सत्वर : ‘पैं सरितेचेनि ओघें । सिंधुजळा मीनलें घोघें ।’ – ज्ञा. ८·८४.
घोंगे क्रिवि. १. घों घों आवाज करीत. २. (ल.) जलदीने; सत्वर : ‘पैं सरितेचेनि ओघें । सिंधुजळा मीनलें घोघें ।’ – ज्ञा. ८·८४.
घोघे क्रिवि. १. घों घों आवाज करीत. २. (ल.) जलदीने; सत्वर : ‘पैं सरितेचेनि ओघें । सिंधुजळा मीनलें घोघें ।’ – ज्ञा. ८·८४.
घोंघे क्रिवि. १. घों घों आवाज करीत. २. (ल.) जलदीने; सत्वर : ‘पैं सरितेचेनि ओघें । सिंधुजळा मीनलें घोघें ।’ – ज्ञा. ८·८४.
घोघा क्रिवि. १. घों घों आवाज करीत. २. (ल.) जलदीने; सत्वर : ‘पैं सरितेचेनि ओघें । सिंधुजळा मीनलें घोघें ।’ – ज्ञा. ८·८४.
घोवे क्रिवि. १. घों घों आवाज करीत. २. (ल.) जलदीने; सत्वर : ‘पैं सरितेचेनि ओघें । सिंधुजळा मीनलें घोघें ।’ – ज्ञा. ८·८४.
घोगोला पु. एक जलचर; कासव. (झाडी) [हिं.]
घोग्या वि. वेडगळ; साधा; सरळ; बावळट; कोणाकडूनही सहज फसविला जाणारा. (व.) [हिं. घोंगा = मूर्ख मनुष्य]
घोघाट पु. १. समुद्र, नदी, वारा इत्यादिकांचा घों घों असा आवाज. पहा : घोंगाट (क्रि. घालणे.) २. भुंगे, माशा इत्यादिकांचा गुणगुणाट. ३. गलबला; गिल्ला; हुल्लड; हाकाटी; कलकलाट. (क्रि. करणे, मांडणे, घालणे.) ४. (ल.) गाजावाजा; गवगवा; परिस्फोट; डंका वाजणे. (क्रि. करणे.)
घोंघाट पु. १. समुद्र, नदी, वारा इत्यादिकांचा घों घों असा आवाज. पहा : घोंगाट. (क्रि. घालणे.) २. भुंगे, माशा इत्यादिकांचा गुणगुणाट. ३. गलबला; गिल्ला; हुल्लड; हाकाटी; कलकलाट. (क्रि. करणे, मांडणे, घालणे.) ४. (ल.) गाजावाजा; गवगवा; परिस्फोट; डंका वाजणे. (क्रि. करणे.)
घोघाण पु. १. समुद्र, नदी, वारा इत्यादिकांचा घों घों असा आवाज. पहा : घोंगाट.(क्रि. घालणे.) २. भुंगे, माशा इत्यादिकांचा गुणगुणाट. ३. गलबला; गिल्ला; हुल्लड; हाकाटी; कलकलाट. (क्रि. करणे, मांडणे, घालणे.) ४. (ल.) गाजावाजा; गवगवा; परिस्फोट; डंका वाजणे. (क्रि. करणे.)
घोंघाण पु. १. समुद्र, नदी, वारा इत्यादिकांचा घों घों असा आवाज. पहा : घोंगाट. (क्रि. घालणे.) २. भुंगे, माशा इत्यादिकांचा गुणगुणाट. ३. गलबला; गिल्ला; हुल्लड; हाकाटी; कलकलाट. (क्रि. करणे, मांडणे, घालणे.) ४. (ल.) गाजावाजा; गवगवा; परिस्फोट; डंका वाजणे. (क्रि. करणे.)
घोघावणे अक्रि. (समुद्र, वारा इ. कांनी) घों घों असा आवाज करणे, गर्जणे. (राजा.) [ध्व.]
घोघेणे अक्रि. (समुद्र, वारा इ. कांनी) घों घों असा आवाज करणे, गर्जणे. (राजा.) [ध्व.]
घोघे न. १. घबाड; डबोले; आकस्मिक सापडलेला ठेवा, झालेला लाभ : ‘तें एक मोठें घोघें सांपडलें.’ – विवि १०·५·१२४.
घोघे वि. मोठे.
घो घो   १. समुद्र, वारा, नदीचा प्रवाह, पूर इत्यादिकांचा आवाज, गर्जना : ‘घो घो शब्दें पूर चालला ।’ – नगंर (नवनीत ४२५). २. एखाद्या पदार्थाभोवती जमणाऱ्या माशांच्या थव्याचा आवाज. ३. धबधबा. (गो.)
घो घो क्रिवि १. प्रचंड लाटा, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस यांच्या गर्जनेप्रमाणे आवाज करीत, होत. २. (मनुष्यांच्या घोळक्याच्या) गोंगाटाच्या, गलबल्याच्या, गलक्याच्या आवाजाप्रमाणे; खूप खेचाखेचीने; (माणसे इ. कांनी) गजबजत; पेव फुटल्याप्रमाणे घोंगावत. पहा : घवघवा, घवघव [ध्व.]
घोघ्या वि. घो घो करणारा; घोघावणारा.
घोट पु. (पाणी इ. द्रव पदार्थ) गिळण्याचे एक वेळेचे परिमाण; घुटका; चूळ : ‘बहु उग्र गमे घेतां गरळाचा जेंवि घोट कामारी ।’ – मोभीष्म ८·४१ (क्रि. घेणे.) (वा.) नरडीचा घोट घेणे, करणे, भरणे, काढणे – (एखाद्याचा घोट करणे, गिळणे) अतिशय छळून, गांजून हैराण करणे; प्राण घेणे; ठार मारणे : ‘तें घोंट भरूं धांवसी । देखतांचि घेसी जिवें त्यातें ।’ – एभा ५·२.
घोट पुन. १. घोडा, अश्व : ‘निजकरें तव स्पंदन घोटकां । धरिन मी करिं शत्रू सघोट कां ।’ – वामन विराट ६·१११. २. (बुद्धिबळात) घोडा या नावाचे मोहरे. [सं.]