शब्द समानार्थी व्याख्या
घोटीर पु. पक्ष्याचे घरटे.
घोटेर पु. पक्ष्याचे घरटे.
घोटीव वि. १. घोटलेले; घोटून घोटून, घासून गुळगुळीत केलेले. २. उजाळा दिलेले; चकचकीत केलेले : ‘पंधरेयाची चोखडी । घोंटीव जैशी ॥’ – ज्ञा ६·२२४. ३. चांगले वळवलेले, मेहनत घेऊन काढलेले (अक्षर). ४. ठरावीक; ठरीव; विवक्षित; नेहमीच्या प्रचारातील : ‘इतर लोक नव्या–जुन्या पद्धतीच्या घोटीव शिव्या देऊन वेळ मारून नेत असतील.’ – विक्षिप्त १·५६.
घोटू पु. घोटून केलेला पदार्थ; घोटा : ‘स्वानंद रसाळ फळ घोटु ।’ – भारा बाल १·१७.
घोटे न. गुरांना औषध इ. पाजण्याचे नळकांडे, नळी. (राजा.).
घोटेस्नान न. १. फक्त घोटे, पाय धुणे. २. (ल.) थोडक्यात आवरणारे स्नान.
घोट्या पु. १. जड्याचे, दागिने इ. घोटण्याचे उपकरण. पहा : घोटणी. २. गवंड्याचे गिलावा गुळगुळीत करण्याचे हत्यार, साधन.
घोट्या वि. १. अभ्यास घोटणारा, पाठ करणारा; नुसताच पाठांतरावर भर देणारा; मंदबुद्धी; ढोर मेहनती. २. एकसारखे घोकणे; पाठ करणे; मोठ्याने वारंवार म्हणणे.
घोडकट न. (घोड्याला तिरस्काराने लावायचा हा शब्द) रोडके, अशक्त मरतुकडे घोडे.
घोडके न. (घोड्याला तिरस्काराने लावायचा हा शब्द) रोडके, अशक्त मरतुकडे घोडे.
घोडका पु. मोतद्दार; घोड्याची काळजी घेणारा; सैस.
घोडकुदळ पु. (उप.) मुंजीचे वय झालेले असून मुंज न झालेला मुलगा; घोडमुंजा.
घोडकुदळ स्त्री. (उप.) उपवर असून लग्न न झालेली दांडगट, नाचरी मुलगी.
घोडकूल न. १. लहान घोडे; तट्टू. (गो.) २. ओट्याच्या खांबावर तिरपा टेकू (करण) देऊन त्यावर कोरलेली घोड्याची आकृती. (खा.)
घोडके न. १. पु. ज्याच्या भरीला करळ्या व तरसे घालून गाड्याची तक्तपेशी, बैठक तयार करतात अशी चौकटीतील दोन बाजूंची दोन उभी लांब लाकडे. २. तेल्याच्या घाण्याच्या कातरीला खिळलेले व जुवाचा दोर बांधायचे लाकूड.
घोडका न. १. पु. ज्याच्या भरीला करळ्या व तरसे घालून गाड्याची तक्तपेशी, बैठक तयार करतात अशी चौकटीतील दोन बाजूंची दोन उभी लांब लाकडे. २. तेल्याच्या घाण्याच्या कातरीला खिळलेले व जुवाचा दोर बांधायचे लाकूड.
घोडके पु. ढोर जमातीचा गुरू.
घोडकेळ न. हलक्या जातीचे एक भसाडे केळ.
घोडकोस पु. तीन मैलांचा कोस.
घोडक्या पु. १. घोड्याचा खिदमतगार; घोड्याची देखभाल करणारा; मोतद्दार : ‘घोड्यास शिपाई काय करील घोडका ।’ – ऐपो ३७२. २. चाबूकस्वार; अश्वशिक्षक.
घोडका पु. १. घोड्याचा खिदमतगार; घोड्याची देखभाल करणारा; मोतद्दार : ‘घोड्यास शिपाई काय करील घोडका ।’ – ऐपो ३७२. २. चाबूकस्वार; अश्वशिक्षक.
घोडगा पु. स्त्री. (उप.) वयाने प्रौढ पण पोरकटपणा, नाचरेपणा अंगी असलेला मुलगा, मुलगी; मूर्ख व ठेंब्या असा वयस्क मुलगा.
घोडगी पु. स्त्री. (उप.) वयाने प्रौढ पण पोरकटपणा, नाचरेपणा अंगी असलेला मुलगा, मुलगी; मूर्ख व ठेंब्या असा वयस्क मुलगा.
घोडगाठ स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ) एकमेकांच्या रक्षणासाठी खडी असलेली घोड्याची दुक्कल.
घोडेगाठ स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ) एकमेकांच्या रक्षणासाठी खडी असलेली घोड्याची दुक्कल.