शब्द समानार्थी व्याख्या
घोडेखोत पु. घोडे भाड्याने देण्याचा धंदा करणारा; भाड्याच्या घोड्यांचा नाईक.
घोडेघाटी स्त्री. एक प्रकारचे रेशमी कापड.
घोडेघास न. विलायती गवत; लसूण घास.
घोडेपाऊल न. एक वनस्पतिविशेष.
घोडेबाज्या पु. घोडेबाजी; घड्यात फटाके घालून उडविण्याचा एक आतषबाजीचा प्रकार : ‘आज दिपवाळीचे सायंकाळी घोडेबाज्या वगैरे आतसबाजी झाली.’ – ऐलेसं ४७१४.
घोडेला पु. नाकतोड्या. (झाडी) [सं. घोटक]
घोडेस्वार पु. मुलांचा स्काऊटचा एक खेळ.
घोडोंडी स्त्री. पागा : ‘तया रायाचे घोडोंडी येंकु देडिका बांधला होता.’ – पंचो १६० – १५.
घोड्यागोवर पु. एक प्रकारचा गोवर. याच्या पुटकुळ्या मोठ्या असतात.
घोड्याचा दाणा   १. (उप.) हरभरा. २. (ल.) बुंदीच्या लाडवाला तुच्छतेने म्हणतात.
घोड्याचा पूत   (उप.) मूर्ख; गाढव; गद्धा.
घोड्याचा लेक   (उप.) मूर्ख; गाढव; गद्धा.
घोड्याची जीभ   (रा.) एक वनस्पतिविशेष.
घोड्याची मुंज   एखादा कोठे जायला निघाला असता, फाजील चौकशी करणाऱ्या माणसाने त्याला ‘का, कुठे जाता’ असे विचारले असताना हा शब्दप्रयोग वापरतात.
घोड्याचे बारसे   एखादा कोठे जायला निघाला असता, फाजील चौकशी करणाऱ्या माणसाने त्याला ‘का, कुठे जाता’ असे विचारले असताना हा शब्दप्रयोग वापरतात.
घोड्याचे मूत   १. कुत्र्याचे मूत; अळंबे; भुईछत्री. २. कुजलेल्या लाकडातून फुटलेले आळंबे.
घोड्याच्या पाठीवर   भरधाव; झर्‌कन; त्वरेने. (क्रि. जाणे, करणे.)
घोड्याच्या पाठीवरचा कोस   कंटाळवाणा व लांबणीचा कोस; घोड्यावरून गेल्यासच कोसाएवढे व कंटाळवाणे न वाटणारे अंतर.
घोड्यावर स्वार   चढेल, मग्रूर : ‘आता जाफरखान आले ते घोड्यावर स्वार ! रूपये मागू लागले.’ – हिंगणे दभा २·३५.
घोड्यांचे नाटक   सर्कस. (ना.)
घोण स्त्री. १. पुष्कळ पाय असलेला, सरपटणारा एक प्राणी; गोम. २. घराची काटकोनात असणारी पाखी जेथे मिळतात तो सांधा; या सांध्यावरील वासा; कोनवासा. याला घोणवासा असेही म्हणतात. (को.), ३. दुःखाने, खिन्न मनाने गुडघ्यात मान घालून बसण्याची अवस्था; खिन्नावस्था : ‘ते भीमकी हें मग घोण घाली ।’ – सारुह २·६९. (को.) घोण घालून बसणे – दुःखाने, खिन्न मनाने गुडघ्यात मान घालून बसणे; खिन्न असणे. (क्रि. घालणे) घोण घालणे – लांबणीवर टाकणे; लांबविणे. (व.), ४. घार. (गो.)
घोणवासा स्त्री. घराची काटकोनात असणारी पाखी जेथे मिळतात तो सांधा; या सांध्यावरील वासा; कोनवासा. याला घोणवासा असेही म्हणतात. (को.)
घोणशा वि. सुस्त; मंद; लठ्ठ व आळशी. (को.)
घोणस पु. सर्पाची एक विषारी जात. हा सर्प जाड असून चारपाच फूट लांब असतो. याचा रंग पिवळसर असून पाठीवर मध्यभागी काळ्या मोठ्या ठिपक्यांची उभी रांग असते. पहा : घणस : ‘जसा नकुळ घोणसां गमला ।’ – मोउद्योग ११·१२०. (को.) [सं. घोनस]
घोणसकांडे न. एक विशिष्ट प्रकारची वनस्पती. ही दिसण्यात घोणसासारखी दिसते. हिची वेटोळीही घोणसाच्या वेटोळ्यासारखी दिसतात. गुरांना घोणस सर्प चावला तर ती गुरे ही वनस्पती जेथे असेल तेथे जातात व ती खातात.