शब्द समानार्थी व्याख्या
घोसाळ वि. १. नाद निर्माण करणारा; घोष, आवाज करणारा : ‘चंद्रकांताचेया बाळानेयां वरी । घोंसाळेयां कांकणां चांकरीं ।’ – शिव ३४०. २. घोसांनी युक्त; घोसांनी, घडांनी लहडलेला. ३. (ल.) गुटगुटीत : ‘सुनीळु घोंसाळें । निऱ्हां शोभेंति डोळे ।’ – शिव ४१८.
घोसाळवेल स्त्री. तांदळाची एक जात. ह्या जातीचा तांदूळ जाडा असून लवकर तयार होतो.
घोसाळा पु. एक कर्णभूषण : ‘आकर्णपूर्ण घोसाळे’ – पूजा ५४.
घोसाळी स्त्री. न. १. एक प्रकारची वेल; गिलक्यांचा वेल. याची भाजी, भजी करतात. २. घोसाळीचे फळ; गिलके; पारोसे. ३. दोडके. (गो.) ४. (ल.) क्षुद्र पदार्थ; बहुधा शून्य; नास्तिवाचक.
घोसाळे स्त्री. न. १. एक प्रकारची वेल; गिलक्यांचा वेल. याची भाजी, भजी करतात. २. घोसाळीचे फळ; गिलके; पारोसे. ३. दोडके. (गो.) ४. (ल.) क्षुद्र पदार्थ; बहुधा शून्य; नास्तिवाचक.
घोसाळी स्त्री. एक प्रकारचा दृष्टिक्षेप : ‘घोसाळी करी उबारा : गजबजौनि पाडी’ – मूप्र २१६५.
घोसुले न. घोस; घड.
घोळ स्त्री. समुद्रातील तांबडसर पांढऱ्या रंगाचा मासा. (को. गो.)
घोळ पु. १. पुनः पुनः हलवणे; घोळणे; फिरवणे; छानणे. २. (ल.) चर्चा; वादविवाद; वाटाघाट; मंथन. ३. गोंधळ; घोटाळा; अडवणूक : ‘उगा लोळसा घोळ मोठा करी तो ।’ – राक १·३६. (क्रि. घालणे.) ४. (वस्तूंचा, सामानाचा, हिशोबाचा, कामांचा) गोंधळ; गळफाटा; घोटाळा; घप्पाघोळ; अस्ताव्यस्तपणा; गुंतागुंत. ५. गडबड; धांदल; तारांबळ; त्रेधा. ६. धामधूम; लगबगीची हालचाल; दौडदौड; धावाधाव : ‘दुजी तों मुलीचा म्हणे थांग नाहीं । असा मांडिला घोळ पौराजनांहीं ।’ – अर्वाचीन १३५. (क्रि. घालणे. मांडणे.) (वा.) घोळात पडणे – निकाल न लागणे. ७. धान्य इ. सुपात, चाळणीत घोळल्यानंतर मागे राहिलेला गाळसाळ, गदळ भाग. (राजा) ८. हरभऱ्याचा, तुरीचा कोंडा. (कर.), ९. तोरडी; पायात घालायचा स्त्रियांचा एक अलंकार. (व.), १०. (अंगरख्याचा) घेर; खालचा परीघ (लुगडे, परकर, धोतर इ. चा); ओचा, सोगा, पदर : ‘पीतांबराचा बहु घोळ लोळे ।’ – सारुह ५·३४. ११. मासे अडकण्यासाठी जाळ्याच्या टोकावर बांधलेली पिशवी. (गो.)
घोळ पु. स्त्री. १. काठीच्या टोकाला बसवलेल्या कोयंड्यात लोखंडाचे तुकडे घातलेली खुळखुळ असा आवाज करणारी कडी. रात्रीच्या वेळी चालताना सापांना भिवविण्यासाठी हिचा उपयोग करतात. २. (वाघ्या इ. लोकांचे) लोखंडाच्या कांबीला कड्या अडकवलेले वाद्य : ‘टाळ घोळ मृदंग कुसरीं । नाना चरित्रें गाती गजरीं ।’ – एभा ११·१२७४. ३. ढाल.
घोळकांठी पु. स्त्री. १. काठीच्या टोकाला बसवलेल्या कोयंड्यात लोखंडाचे तुकडे घातलेली खुळखुळ असा आवाज करणारी कडी. रात्रीच्या वेळी चालताना सापांना भिवविण्यासाठी हिचा उपयोग करतात. २. (वाघ्या इ. लोकांचे) लोखंडाच्या कांबीला कड्या अडकवलेले वाद्य : ‘टाळ घोळ मृदंग कुसरीं । नाना चरित्रें गाती गजरीं ।’ – एभा ११·१२७४. ३. ढाल.
घोळ स्त्री. १. डोंगरामधील दरी; कपार; खबदड; घळ. २. एक पालेभाजी. हिच्या दोन जाती आहेत.
घोळ   चुनत. – (तंजा.)
घोळका पु. १. (मनुष्यांचा, प्राण्यांचा) अव्यवस्थित समुदाय, जमाव, गर्दी. २. गोंगाट; गलबला; कलकलाट. (क्रि. चालणे, होणे, पडणे, मांडणे, करणे.) ३. (कामे, प्रकरणे इ. चा) घोटाळा, गोंधळ, खिचडी.
घोळकाकडी स्त्री. तोंडले. (व.)
घोळकांवचे अक्रि. घोटाळणे; घोटाळत राहणे. (गो.)
घोळकोटंबा पु. कापडाचा घोळ लावलेला खंडोबाच्या वाघ्याचा भिक्षा मागण्याचा चौकोनी लाकडी कोटांबा. खंडोबाचे भक्त याची पूजा करतात : ‘त्या खिरीपैकीं वाघ्या मुरळी यांस त्यांचा घोळकोटंबा भरून खीर द्यावी लागते.’ – ऐरा २०३.
घोळकोटमा पु. कापडाचा घोळ लावलेला खंडोबाच्या वाघ्याचा भिक्षा मागण्याचा चौकोनी लाकडी कोटांबा. खंडोबाचे भक्त याची पूजा करतात : ‘त्या खिरीपैकीं वाघ्या मुरळी यांस त्यांचा घोळकोटंबा भरून खीर द्यावी लागते.’ – ऐरा २०३.
घोळगुलाब पु. घोळीच्या वनस्पतीवर संस्कार करून तयार केलेली गुलाबाची एक जात.
घोळघोळून क्रिवि. १. आलटूनपालटून; बदल करून; आळीपाळीने; परतपरत; एकामागून एक. (क्रि. करणे, खाणे, घेणे, देणे.) २. वारंवार, पुनः पुनः घोळण्याची क्रिया करून; पुनः पुनः इकडून तिकडे हलवून, ढकलून, घोळसून, चर्चा करून, मनात आणून, उच्चारून, घोळणे याच्या त्या त्या अर्थी द्विरुक्तीने क्रिया करून : ‘हा मंत्र लोकांच्या तोंडीं आपोआप येतो व तोच घोळघोळून पाठ होऊन जातो.’ – सासं २४०१. [घोळणेचे द्वि.]
घोळूनघोळून क्रिवि. १. आलटूनपालटून; बदल करून; आळीपाळीने; परतपरत; एकामागून एक. (क्रि. करणे, खाणे, घेणे, देणे.) २. वारंवार, पुनः पुनः घोळण्याची क्रिया करून; पुनः पुनः इकडून तिकडे हलवून, ढकलून, घोळसून, चर्चा करून, मनात आणून, उच्चारून, घोळणे याच्या त्या त्या अर्थी द्विरुक्तीने क्रिया करून : ‘हा मंत्र लोकांच्या तोंडीं आपोआप येतो व तोच घोळघोळून पाठ होऊन जातो.’ – सासं २४०१. [घोळणेचे द्वि.]
घोळचे अक्रि. उपयोगी पडणे. (गो.)
घोळटीक स्त्री. सराव; ओळख; घरोबा; घसरट. (गो.)
घोळटीकाय स्त्री. सराव; ओळख; घरोबा; घसरट. (गो.)
घोळण न. १. सुपाने, चाळणीने (धान्य इ.) घोळण्याची क्रिया. २. सुपात, चाळणीत घोळायचा धान्याचा एक वेळचा हप्ता. ३. पोळी लाटताना तिला लावायचे पीठ, पिठी. (व.)