शब्द समानार्थी व्याख्या
घोंप पु. झुपका; गुच्छ; फुले; शेंगा, बी इत्यादींना असणारा देठ; घड; घोस. (को.)
घॉघॉ पु. पाणलोट; उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह. (गो.) [ध्व.]
घॉल वि. दाट झाडी. (गो.)
घॉळकांवचे सक्रि. हेलपाटे, खेपा घालायला लावणे; नाचविणे. (गो.)
घाँगा पु. (मुलांच्या भाषेत) बागुलबोवा. (गो.)
घाँटॉ पु. दाणे, तंबाखू इत्यादिकांत आढळणारा किडा. (गो.)
घाँशॅ पु. लहान मुलांच्या पोटात होणारा एक विकार. (गो.)
घौघा पु. दंगा; दंगल.
घौस वि. १. खणखणीत, टणटणीत; डोर; पहाडी (आवाज, वाद्य). (को.) २. (रूढ) मोठा व देखणा; ठसठशीत; ठसकेबाज; घवघवीत (दागिना इ.).
घ्न वि. १. (समासात उत्तरपदी) ठार मारणारा; नाश करणारा. उदा. रोगघ्न = रोग नाहीसा करणारे, वातघ्न = वात नाहीसा करणारे, कफघ्न, दोषघ्न, जंतुघ्न इ. २. न मानणारा. विसरणारा. उदा. कृतघ्न.
घ्या उद्गा. पहा ! ऐका ! ‘हे घे’ या अर्थी.
घ्येरूंसा वि. १. गेरूसारखा. २. (ल.) कस्पटासमान; केराप्रमाणे : ‘धन ग संपदा तुझ्या सांदीचा घ्येरूसा ।’ – लोले १८०.
घ्रष्टी स्त्री. घसट; दाट मैत्री : ‘हळुहळु घ्रष्टी पडलीं ।’ – लीचउ ४८१. [सं. घृष्टि]
घ्राण न. १. नाक; नासिकाज्याने वास कळतो ते इंद्रिय; घ्राणेंद्रिय : ‘घ्राणीं लाविजती मुक्ताफळें । तरी तयांचें काय कळे । मोल मान ॥’ ज्ञा १५·३९५. [सं.]
घ्राणगर्त स्त्री. (वै.) वास ग्रहण करणाऱ्या पेशी ज्या खोलगट भागात असतात तो भाग.
घ्राणस्थाली स्त्री. (वै.) ज्या पेशीसमूहापासून घ्राणेंद्रिय विकसित होते अशा पेशींचा समूह.
घ्राणक्षेत्र न. (वै.) वासाची संवेदना जाणणारा मेंदूतील भाग.
घ्रात वि. वास घेतलेले; हुंगलेले. उदा. अनाघ्रात. [सं.]
घ्राता वि. वास घेणारा; हुंगणारा : ‘वास सुवास सुमन । घ्रेय घ्राता आणि घ्राण । कृष्णमकरंदें जाण । विश्रांति संपूर्ण, स्वयें येती ॥’ – एभा १·२५३. [सं.]
  मराठी वर्णमालेतील विसावे अक्षर आणि पाचवे व्यंजन. ‘वाङ्मय’, ‘पराङ्मुख’, ‘वाङ्‌निश्चय’ यासारखे मोजके शब्द सोडून एरवी फक्त कंठ्य व्यंजनापूर्वी येणारे. अशा ठिकाणी त्याचे लेखन त्यापूर्वी येणाऱ्या स्वरावर शिरोबिंदू देऊन होते. ‘अंक’, ‘असंख्य’, ‘रंग’, ‘उल्लंघन’. हा वर्ण शब्दारंभी येत नाही.