शब्द समानार्थी व्याख्या
प्र. १. पुष्कळ नामांना ती दुसऱ्या शब्दाशी संयुक्त होताना (समासात) हा स्वार्थी प्रत्यय लागतो. उदा. आत्म– आत्मक, पंचभूतात्मक, निंदात्मक; बालक, पुत्रक, दंडक इ. २. मूल– मूलक : ज्यापासून उत्पन्न होतो तो या अर्थी : पुष्पमूलक सुख, स्त्रीमूलक कलह इ. ३. पुरस्सर, अनुसरून, मुद्दाम या अर्थी. उदा. बुद्धिपूर्वक, हेतुपूर्वक, आदरपूर्वक, शपथपूर्वक. ४. अल्पार्थी प्रत्यय.
  १. देवनागरी लिपीतील १६ वे अक्षर. मराठी वर्णमालेतील पहिले व्यंजन. मराठीत साधारणतः प्रश्नवाचक शब्दातला प्रारंभिक नित्य घटक. जसे :– की, काय, कोण, कुठे, कधी, कसा, केव्हा, केवढा, किती इ. २. यम; विष्णू; अग्नी इ. देवता. ३. मन, अंतःकरण, आत्मा. ४. पक्षिविशेष; पक्षी; पक्ष्यांचा राजा. ५. पाणी; पिण्याचा पातळ पदार्थ. ६. एक जीवनसत्त्व.
कई पु. कही; सैन्यासाठी लागणाऱ्या धान्यवैरणीची व लाकडांची आसपासच्या खेड्यांतून लूट करून आणणारी टोळी : ‘पेंढारी व लुटारू कईने स्वारांचें न ऐकतां गांव अगदी लुटलें.’ – ऐलेसं ४०८१.
कई क्रिवि. १. केव्हा; कधी : ‘जळों आतां संसारू वो कई शेवट पुरे।’ – तुगा १२०. २. कोठे : ‘एथेंही सलगी करूं बिहो । तरी निवो कई पां ।’ – ज्ञा ९·५ ३. किती.
कई कईई क्रिवि. १. केव्हा; कधी : ‘जळों आतां संसारू वो कई शेवट पुरे।’ – तुगा १२०. २. कोठे : ‘एथेंही सलगी करूं बिहो । तरी निवो कई पां ।’ – ज्ञा ९·५ ३. किती.
कउल पु. कोळी : ‘पंढरीचा हाट कउलांची पेठ ।’ – चोखा २८.
कऊबऊ वि. ओंगळ; तिरस्कार वाटण्याजोगी; कुरूप (वस्तू).
ककरी स्त्री. पहा : कंकर; बारीक खडे; दगडाच्या बारीक चिपा.
ककार स्त्री. १. ‘क’ सारखा आकार असलेली वस्तू. २. (ल.) सुषुम्ना नाडी. पहा : काकीमुख ३. ‘क’ हा ध्वनी, अक्षर. ३. ब्रम्हा.
ककार वि. क हे अक्षर ज्याच्या शेवटी आहे असे. उदा. मस्तक. [सं.]
ककास   शोक; विलाप.
ककुद पु. मधला, फुगीर, उचललेला भाग; गाठ; वाढ; टेंगूळ; बैलाच्या मानेजवळ पाठीच्या कण्याचा उंचावलेला भाग; वशिंड. [सं.]
ककुदमान वि. ज्याच्या मानेवर वशिंड आहे असा (बैल).
ककू स्त्री. गळ्यातील घाटी; मानेचा पुढील भाग : ‘भविष्योत्तरें शोभे कंठ । बृहन्नारदीयें ककु बरवंट । ब्रह्मांड पुराणें ग्रीवा सुघंट । मनोहर शोभली ॥’ – स्वानु ७·३·८९. [सं. ककुद् = उंचवटा]
कक्रा पु. (सराफी) हिरकणीच्या जातीचा रेतीचा दगड.
कखाइ पु. वि. परदोष पाहणारा : ‘अपक्व कखाइया (पुरुष धर्मापासौनि) जाए ।’ – लीचउ ३८६.
कखाइया पु. वि. परदोष पाहणारा : ‘अपक्व कखाइया (पुरुष धर्मापासौनि) जाए ।’ – लीचउ ३८६.
कखाय पु. दुर्वर्तन : ‘तो कखाओ करी ।’ – श्रीकृच ३.
कखाय वि. दुर्वर्तनी; हीन आचरण करणारा : ‘कखायाचीये होमकुंडी : जीवजात पडले ब्रह्मांडी’ – मुप्र १३८१.
कच स्त्री. १. चोहोकडून आलेली अडचणीची स्थिती; घोटाळा; संकट. २. चेप; दाब; अटकाव; कोंडमारा. ३. रेव; रेतीचे बारीक कण; खड्याचा अंश (भाकरी, पीठ इत्यादीतील). ४. (गवंडी) बारीक अर्धा इंची खडी. ५. माघार घेणे; भीतीने शरण जाणे; पाय मागे काढणे. (क्रि. खाणे, खादणे) : ‘इंग्रजी सैन्यानें कच खाल्ली.’ – इंप १३९. ६. भांडाभांडी; तंटा; मारामारी. [ध्व.] [सं. कृत्या], ७. कचाट; ओझे; जबाबदारी : ‘सारी कच आपल्या अंगावर येऊन पडल्यावर मग आटपावयाचे कठीण पडेल.’ – ऐलेसं ३४१२.
कच पु. १. केस : ‘दुःशासनानें धरिले कच । – एभा १·२१०. [सं.], २. ठोकर; पोचा; खोक; खळगा; करकोचा; खाच; छिद्र. (क्रि. पाहणे.) : ‘झाडास कच पाडल्याने … तेलकट राळेसारखा रस वाहतो.’ – सेंपु १·९७. [क. कच्चा = खाच]
कचक स्त्री. १. हाणाहाणी; मारामारी; चकमक; तंटा (काठ्या, तरवारी इत्यादींनी – यात कचकच असा ध्वनी निघतो यावरून). (क्रि उडणे, झडणे.) २. (रोगाची) शिणक; शिळक; चमक; उसण. (क्रि. भरणे.) ३. आकस्मिक धक्का. ४. भीती; दहशत. (व.) पहा : कच (क्रि. खाणे.) वि. अवाढव्य; जंगी; अजस्त्र; प्रचंड (इमारत); मोठे; भरभक्कम (ओझे); सपाटून; यथास्थित (जेवण). ४. सुताराचे एक हत्यार. (झाडी), ५. लगाम, कंबरपट्टा वगैरेंना तरवार वगैरे लावायची कडी : ‘सोन्याचा कड्या ३ व कचक येक केली.’ – दुबारो ११.
कचकच स्त्री. १. पिंगळा, करकोचा यांचे ओरडणे. २. रेव किंवा रेवाळ पदार्थ दातांखाली सापडल्याने होणारा आवाज. ३. अशी रेव, रेती, खडे, कण. ४. (ल.) कटकट; वाद; तंटा; भांडण; त्रास; पिरपीर : ‘वृथा कचकच वाढविली ।’ – एभा २८·५८३. ५. बडबड; जल्पना; गप्पा : ‘शब्द कचकच वाढविती ।’ – एभा ९·४०८. ६. अस्ताव्यस्तपणा; गर्दी. (गो.) [सं. कच्, द्विरुक्ति]
कचकच क्रिवि. कचकच आवाज करीत (खाणे, चावणे); मोठ्याने आरडाओरड करून (भांडणे). [ध्व.]
कचकचा क्रिवि. कचकच आवाज करीत (खाणे, चावणे); मोठ्याने आरडाओरड करून (भांडणे). [ध्व.]