शब्द समानार्थी व्याख्या
पु. १. मराठी वर्णमालेतील अठरावे अक्षर आणि तिसरे व्यंजन. २. गर्व; अहंमन्यता; वृथाभिमान. गर्व शब्दाचा संक्षेप. (वा.) ‘ग’ ची बाधा, पीडा होणे - गर्वाचा ताठा; गर्व : ‘श्रीची प्राप्ति झाली म्हणजे ‘ग’ ची बाधा व्हावयाचीच.’ - गुप्तमंजूष.
वि. (समासात) १. गमन करणारा, जाणारा. जसे :- उरग- उराने, पोटाने जाणारा, सरपटणारा. २. पोचला आहे, दाखल झाला आहे असा; समाविष्ट; अंतर्वर्ती. जसे :- भूमिग, बुद्धिग, खग, जलग. [सं. गम्]
  स्त्रीला उद्देशून वापरले जाणारे संबोधन. (अगे, गे याचे संक्षिप्त रूप.)
गइ वि. १. दुर्बळ. २. अनास्था.
गइमेढके न. गईचा खांब.
गइसर पु. गइमेढक्यावरील आडवा लांब वासा.
गइसरा पु. गइमेढक्यावरील आडवा लांब वासा.
गईसर पु. गइमेढक्यावरील आडवा लांब वासा.
गईसरा पु. गइमेढक्यावरील आडवा लांब वासा.
गई स्त्री. १. (अपराधाबद्दल) गय; दयाबुद्धीने केलेला कानाडोळा; माफी; क्षमा. २. उपेक्षा; दुर्लक्ष; हयगय : ‘नका गई करूं आईकाल ज्या कानीं ।’ - तुगा २९२. [सं. गत], ३. खालचा इंद्रकट; गईसरा; घराच्या पायथ्याच्या शेवटी आश्रयार्थ उभारलेल्या मेढीवर घालतात ते आडवे लाकूड; आढ्याला जोडलेले फाटे घराच्या चारी भिंतीवरील ज्या तुळईवर ठेवण्यात येतात ती तुळई. ४. तुळईजवळची छपराची जागा. (ना.), ५. गाय : ‘जनाई दासी गरिब बिचारीगई ।’ - नामना ८८. (मावळी)
गईक वि. दंश करणारा.
गईगुदर स्त्री. दिरंगाई; वेळ मारून नेणे; अळंटळं; टाळाटाळ : ‘वजीर पैका द्यावयाची गईगुदर करितात.’ - मइसा ६·६·३२.
गईगोळा पु. पावसाळ्यात गईसऱ्यास चिकटवून वाळवलेली गोवरी, शेणगोळा. (को.)
गईब वि. १. अदृश्य; हरवलेला; नाहीसा झालेला; गहाळ; मागमूस नसलेले. २. मृत; मेलेला : ‘राजा गईब जाहला ...’ - सभासद ४२. (क्रि. होणे.) [फा. गाइब]
गईप वि. १. अदृश्य; हरवलेला; नाहीसा झालेला; गहाळ; मागमूस नसलेले. २. मृत; मेलेला : ‘राजा गईब जाहला ...’ - सभासद ४२. (क्रि. होणे.) [फा. गाइब]
गयब वि. १. अदृश्य; हरवलेला; नाहीसा झालेला; गहाळ; मागमूस नसलेले. २. मृत; मेलेला : ‘राजा गईब जाहला ...’ - सभासद ४२. (क्रि. होणे.) [फा. गाइब]
गईबत   १. ईर्षा २. पराक्रम.
गउ स्त्री. गाय : ‘दहा छिद्राचे एक चिटके । कचकोल ते पात्र ओमण निके । अंगावरी घेतले हरिखे । चर्म कवतुके गउचे ।’ - नाली. [सं. गो]
गऊपोत स्त्री. गव्हाच्या दाण्यासारख्या मण्यांची पोत.
गगन न. आकाश; अंतरीक्ष; नभ; आभाळ : ‘गगन मुठीं सुवावें । मशकें केविं ॥’ - ज्ञा १·७४. [सं.] (वा.) गगन कापणे, थरारणे - आकाश दणाणणे; भयंकर कृत्य करणे. गगनबावडा दाखविणे - ताणणे; दमवणे (कोल्हापूर भागात गगनबावडा हे गाव आहे यावरून). (कर) गगनात भरणे - आकाशात भरारी मारणे; ‘दुसरा गरुड उपजता भरला गगनीं न मंदिरीं राहे ।’ - मोआदि ४·३४. गगनाशी गाठ बांधणे, लावणे - (उंच उडणे) महत्कृत्य करणे; अचाट पराक्रम करणे. गगनाशी दिवस भांडणे - १. उन्हाळ्यात दिवस मोठा होणे. २. दिवस कमी कमी व्हायला प्रारंभ होणे. गगनाशी भांडणे - आकाशाशी बरोबरी करणे (उंच वृक्ष किवा गर्विष्ठ माणूस यासंबंधी योजतात.) गगनीची वीज कोसळणे - आकाशाची कुऱ्हाड पडणे; भयंकर संकट येणे : ‘गगनींची वीज जाणो कोसळली त्यावर ।’ - विक २०. गगनी दिवा लावणे - प्रख्यात होणे, पुष्कळ प्रसिद्धीस येणे.
गगनकाळी स्त्री. आकाशरूपी कालिकादेवी : ‘कीं भूगोळकांचां देऊळीं : रती अनंगे पूजिली गगनकाळी’ - रुस्व ४७५.
गगनगज पु. ऐरावत; दिग्गज : ‘गगनगजाचे शुंडादंड । तैसे सरळ बाहुदंड ।’ - एरुस्व १·४४.
गगनगतवाणी स्त्री. आकाशवाणी : ‘ऐशी गगनगतवाणी ब्रह्मेनि आइकिली’ - श्रीकृष्णच २.
गगनगर्ती वि. आकाशाला पोचेल अशी (राक्षसी). (गो.)
गगनगर्भ पु. आकाशाची पोकळी; अंतराळ. [सं.]