शब्द समानार्थी व्याख्या
का क्रिवि. १. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी तोच अर्थ दर्शविण्याकरता हे अव्यय योजतात. त्यामुळे वाक्यार्थ पूर्ण होतो. जसे :- ‘तू मग तिकडे जातोस कां?’ २. वाक्यातील क्रियापदानंतर येणारा प्रश्नवाचक शब्द. याचे उत्तर सामान्यतः हो किंवा नाही असे असू शकते जसे :- ‘तुझी परिक्षा संपली कां?’ ३. कारण विचारणारे प्रश्नार्थक अव्यय; कशासाठी; कोणत्या कारणाने; काय म्हणून : ‘मी पायां लागे कां । काईंसेया लागीं ।’ – शिव २२४.
का उअ. अथवा; किंवा; की : ‘कां नुदेलिया सुधाकर । आपणपें भरें सागर ।’ - अमृ ७. १५२.
कां क्रिवि. १. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी तोच अर्थ दर्शविण्याकरता हे अव्यय योजतात. त्यामुळे वाक्यार्थ पूर्ण होतो. जसे :- ‘तू मग तिकडे जातोस कां?’ २. वाक्यातील क्रियापदानंतर येणारा प्रश्नवाचक शब्द. याचे उत्तर सामान्यतः हो किंवा नाही असे असू शकते जसे :- ‘तुझी परिक्षा संपली कां?’ ३. कारण विचारणारे प्रश्नार्थक अव्यय; कशासाठी; कोणत्या कारणाने; काय म्हणून : ‘मी पायां लागे कां । काईंसेया लागीं ।’ – शिव २२४.
कां उअ. अथवा; किंवा; की : ‘कां नुदेलिया सुधाकर । आपणपें भरें सागर ।’ - अमृ ७. १५२.
का उद्गा. काव्, काव् असा कावळ्याचा ध्वनी : ‘का का शब्द करूनी भ्रमती त्यांच्या कुळात मी झालों ।’ - मोकर्ण २८·५९.
कॉ उद्गा. काव्, काव् असा कावळ्याचा ध्वनी : ‘का का शब्द करूनी भ्रमती त्यांच्या कुळात मी झालों ।’ - मोकर्ण २८·५९.
काइ वि. कच्चा. - (तंजा.)
काइ न. कच्चेफळ. [द्रा. क. काई = कच्चे फळ.]
काहणी स्त्री. (प्र.) १. कहाणी. २. ज्यामुळे लोंबी काळी पडते असा जोंधळ्यावरील, ज्वारीवरील रोग. पहा : कावी
काइमी स्त्री. कायमपणा; स्थिरपणा; पक्केपणा; शाश्वती; अढळपणाची स्थिती; ठरलेली परिस्थिती. [फा. काईम]
काइर न. १. खाणारा. २. हाडवैर : ‘म्हणुनु समर्थेसि वैर । जेया पडे हाडकाइर ।’ - राज्ञा १३·५४९.
काइरे मुबारक   दीनाला रक्षण द्यावे अशा हेतूने : ‘किल्ले व मुलूख दौलत कईरे मुबारक दाखल जाला.’ – पेद ३१·४३.
काई स्त्री. शेवाळ (झाडी) [हिं.]
काईट पु. काळ्यापाठीचा हरिण.
काईत   कायस्थजात; त्या जातीतील व्यक्ती; कारकून : ‘हल्ली सवाईजीकडून एक काईत व आमचे तरफेने मोरोपंत सैदाकडे रवाना झाले.’ - पेद ११·१०; कायत. [सं. कायस्थ]
काईम वि. १. कायम; उभा. २. स्थिर; मजबूत ठोकलेला; पक्का. ३. काबीज : ‘परंतु आठपंधरा दिवसात सारी स्थळे इंग्रजांनी काईम करितात.’ - ऐलेसं ११·६०७. ४. नित्य. [फा. काईम् = उभा, स्थिर]
काईमदाईम वि. निरंतरचा; कायमचा; फार पूर्वीपासूनचा; सतत चालणारा. [फा.]
काएमदाएम वि. निरंतरचा; कायमचा; फार पूर्वीपासूनचा; सतत चालणारा. [फा.]
काईल स्त्री. काहिली; उसाचा रस कढवण्याचे पसरट तोंडाचे भांडे; मोठी कढई. (वा.) काईलीतला खडा - तावून सुलाखून निघालेला, कसोटीला उतरलेला (माणूस.). [सं. काइल = विस्तृत]
काईल वि. १. दंडित; जित; पराजित केलेला : ‘दोहींकडून तुम्ही काईल व्हाल तेव्हा आम्हांवर शब्द’ - मइसा १. २२६. २. कुंठित; हैराण; निरुत्तर : ‘पत्र कोठें आहे तें काढावें म्हणजे आम्हीं त्यांस काईल करूं.’ - ऐलेसं ५·२४७३. [फा. काइल = जित]
कायल वि. १. दंडित; जित; पराजित केलेला : ‘दोहींकडून तुम्ही काईल व्हाल तेव्हा आम्हांवर शब्द’ - मइसा १. २२६. २. कुंठित; हैराण; निरुत्तर : ‘पत्र कोठें आहे तें काढावें म्हणजे आम्हीं त्यांस काईल करूं.’ - ऐलेसं ५·२४७३. [फा. काइल = जित]
कायर वि. १. दंडित; जित; पराजित केलेला : ‘दोहींकडून तुम्ही काईल व्हाल तेव्हा आम्हांवर शब्द’ - मइसा १. २२६. २. कुंठित; हैराण; निरुत्तर : ‘पत्र कोठें आहे तें काढावें म्हणजे आम्हीं त्यांस काईल करूं.’ - ऐलेसं ५·२४७३. [फा. काइल = जित]
काईस   अनमान.
काउ पु. (बालभाषा) कावळा.
काऊ पु. (बालभाषा) कावळा.