शब्द समानार्थी व्याख्या
किकरं न. १. (सुतारी) विंधणे; लाकडाला भोक पाडण्याचे सुताराचे एक हत्यार; उळी : ‘बाजूचा एकजण खरपावर किकऱ्याला घासून धार देत होता.’ – अगतिका १४८. २. एक खेळणे; किरकिरे; फिरकी. (बे.)
किकसा न. हळदीचे उटणे : ‘कौतिकनं आरतीं आणली. तीत किकसा होता.’ – धग ४१.
किकाट पु. हत्तीचा चित्कार.
किकिदिवी पु. एक पक्षी. [सं.]
किकी स्त्री. केतकी; केवडा : ‘किकीचं पान बाई कीकी । सांगड मासा सूं सूं ।’ – लोकशब्द. ६४
किक्क पु. कंटाळा; वीट : ‘रोज ही कोरव्याची पिऊन किक्क आलाय.’ – फगो ३८.
किक्रा पु. किंकरा; सुताराचे हत्यार. (झाडी)
किख वि. अतिशय थंड. (गो.)
किच अ. हिरवी कच्ची भाजी खाताना, बारीक हिरवी डहाळी मोडताना होणारा नाजूक आवाज. [ध्व.]
किच न. अल्प अंश; थोडेसे. (कु.) [सं. किचित्]
किचकट वि. १. बारीक; रोड; पातळ (शरीर, वासा, खांब वगैरे) : ‘हें स्थित्यंतर युद्धकलेत अलीकडे झाल्यामुळे…उंचापुरा जवान आणि किचकट पोरहि सारखेच.’ – निमा ९७१. २. किरटे; वाचायला कठीण; गिचमीड (अक्षर, लेख). ३. फार बारीक; चिरचिरे (लेखणीचे टोक). ४. (सामान्यतः) पहा : किचर, किचरट. ५. गुंतागुंतीचे; भानगडीचे : ‘श्री सिद्धारूढस्वामींच्या मिळकती संबंधाने असला किचरट वाद उपस्थित झाल्याचें प्रसिद्धच आहे.’ – सासं २·४१०. [सं. कृच्छ्]
किचकाड वि. १. बारीक; रोड; पातळ (शरीर, वासा, खांब वगैरे) : ‘हें स्थित्यंतर युद्धकलेत अलीकडे झाल्यामुळे…उंचापुरा जवान आणि किचकट पोरहि सारखेच.’ – निमा ९७१. २. किरटे; वाचायला कठीण; गिचमीड (अक्षर, लेख). ३. फार बारीक; चिरचिरे (लेखणीचे टोक). ४. (सामान्यतः) पहा : किचर, किचरट. ५. गुंतागुंतीचे; भानगडीचे : ‘श्री सिद्धारूढस्वामींच्या मिळकती संबंधाने असला किचरट वाद उपस्थित झाल्याचें प्रसिद्धच आहे.’ – सासं २·४१०. [सं. कृच्छ्]
किचकाट न. गर्दी; गचडी. (कु.)
किचकिच स्त्री. चिकटण; चिकटाई; चिकचिकाट. [ध्व. चिकचिक वर्णव्यत्यास]
किचकिच स्त्री. कुरकुर; हलक्या आवाजात एकसारखी चालू असलेली तक्रार.
किचकिच क्रिवि. रेव, बारीक खडा इ. पदार्थ दाताखाली सापडले असताना होणाऱ्या आवाजाप्रमाणे. (क्रि. लागणे.) [ध्व.]
किचकिचा क्रिवि. रेव, बारीक खडा इ. पदार्थ दाताखाली सापडले असताना होणाऱ्या आवाजाप्रमाणे. (क्रि. लागणे.) [ध्व.]
किचकिचणे अक्रि. १. वानराने दात चावून शब्द करणे. २. (पिंगळ्याने) शब्द काढणे.
किचकिचावणे अक्रि. सक्रि. १. हिणवणे; टाकून बोलणे. (गो.) २. दात चावणे. (कु.)
किचकिचीत वि. १. किचकिच आवाज करणारा. (कच्चा माल, रेवाळ वस्तू.) २. चिकट.
किचकिचो वि. १. अपक्व; अर्धवट शिजलेला (भात वगैरे). (चि.) २. कटकट करणारा; किरकिरा. [ध्व.]
किचड न. पु. चिखल; रेंदा; राड; गारा. [हिं.]
किचडा   पहा : खिचडा : ‘मी सगळ्या ढोरास्नी बचकभर किचडा चारला.’ – गोता ८५.
किचणे अक्रि. कुरकुरणे : ‘मग किचायला काय झालं तुला?’ – जाण ३२१.
किचबिड   पहा : किजबिड, किजबिडीत