शब्द समानार्थी व्याख्या
की अ. उभ. १. एक उभयान्वयी अव्यय (स्वरूपबोधक, विकल्पबोधक, परिणामबोधक किंवा संकेतबोधक; जे; असे. २. म्हणून : ‘स्वामींचाच प्रताप होता की (म्हणून) काम नाश न पावले.’ – मइसा ८·२०५. ३. काय : ‘पुढे आपले कुमकेस येऊं कीं?’ – इएम्‌पी १६३. ४. कारण : ‘मारगिरी होत नाही की (कारण) किल्ल्याचा मार जबरदस्त होतो.’ – ऐकोपुर.
की उभ. अ. १. अथवा; किंवा; संशयबोधक अव्यय : ‘कीं प्रेम पीयुष मयंकु । परीपूर्ण जे ।’ – ऋ २७. २. प्रश्नावर जोर देण्याकरिता प्रश्नाच्या शेवटी पुष्कळदा योजतात. निश्चय दाखवण्यासाठी किंवा आश्चर्य दाखवण्यासाठी योजतात : ‘म्हणे अधिक द्याच कीं अखिल याचकीं हावरा ।’ – केका १२. याला पुष्कळदा रे जोडतात. जसे :— आलो की रे, जातो की रे, बसतो की रे. ३. काय : ‘पाठ वृतबंध कीजे । हे कीं वैराग्य देवाचें ।’ – शिव ७००. ४. खरोखर : ‘तो वेढितेयाचिया दिठी । कापड जाला कीं’ – ज्ञा ९·७५. [सं. किल]
की न. पिंगळ्या (पक्षी) च्या कू, की, किलबिल, किचीबिची या चार स्वरांपैकी दुसरा स्वर. [ध्व.]
कीक पु. वीट; शिसारी : ‘मेली मेंढरे सुरवातीसुरवातीला महारापोरांनी नेली, पण मग त्यांनासुद्धा कीक आला.’ – बनगर १६१.
कीकस पु. वीट; शिसारी : ‘मेली मेंढरे सुरवातीसुरवातीला महारापोरांनी नेली, पण मग त्यांनासुद्धा कीक आला.’ – बनगर १६१.
कीकट पु. आवाज; ओरडणे; चीत्कार : ‘आणि कीकाट गजांचे ।’ – वेसीस्व ४·२३. [ध्व.]
कीकाट पु. आवाज; ओरडणे; चीत्कार : ‘आणि कीकाट गजांचे ।’ – वेसीस्व ४·२३. [ध्व.]
कीकस पु. चुरा; भुगा; कीस : ‘हातिएरांचेनि खडाडें : खांडां कीकसु पडे’ – शिव ९५४.
कीकस न. हाड : ‘त्वत्तोयी जरि स्वल्प कीकस पडे पापी कृती तो घडे । तो देवेंद्रपदा चढे सुरवधूसंभोग त्यातें घडे ।’ – निमा (भागीरथीस्तोत्र) १·१७.
कीकस पु. ठिणगी; स्फुल्लिंग : ‘लोहित देश मंडळाचा । सेनाधिपु दीव्य प्रशस्तिचा । जयातें कीकसू पडे हातिएराचा । मिषें प्रळयाग्निचेनि ॥’ – नरुस्व २२०.
कीकळी स्त्री. किंकाळी : ‘कोल्हाळी तेथ : कीकळी बळि बळी हाकाहुका बोंबटा’ – गरा २१३.
कीच स्त्री. दुःखाची आरडाओरड. [ध्व.]
कीचक पु. वेळू; बांबू. [सं.]
कीच् स्त्री. किळस; घृणा. (झाडी) [सं. किलीश.]
कीट न. १. घाणीचा थर; किटण (गुडगुडीच्या नळीतील, शरीरावरील, वस्त्रावरील)चिकटा; खळ. पहा : किटण. २. हिणकस सोने : ‘आत्मानात्मकिटा । पुटें देउनी ॥’ – ज्ञा १३·१०२७. ३. जळलेला धातू; जळके लोखंड. [सं. किट्ट]
कीट न. १. मातीचे मोठे आणि कठीण ढेकूळ (जमीन नांगरताना निघालेले). २. ठिणगी; किटाळ. (राजा.)
कीट क्रिवि. काळा या शब्दाचे आधिक्य दाखवण्यासाठी त्याच्या पुढे किंवा मागे योजतात. जसे :— काळाकीट : ‘वरी अंतराळें नभीं कीट काळे ।’ – दावि २५४.
कीट पु. कृपण; कंजूष मनुष्य. (व.)
कीट न. सुपारी शिजवलेले पाणी; पुटी. (गो.) पहा : कट
कीट न. लहान मूल. (कु.)
कीट पु. कीटक; किडा : ‘वाढौं वाढौं होति । कोशकीट’ – ज्ञा १६·३३६.
कीटक पु. किडा.
कीटकाज न. रेशीम.
कीटकपरागण न. कीटकांद्वारे घडून येणारे परागण.
कीटकयोनि स्त्री. किड्यांचा वर्ग, जात; जीवजंतू. [सं.]