शब्द समानार्थी व्याख्या
कूपकच्छप पु. १. (शब्दशः) विहिरीतील कासव किंवा बेडूक (यावरून) २. (ल.) घरकोंबडा; आपले घर हेच जग समजणारा; बाह्य जगाविषयी अज्ञानी; आकुंचित दृष्टीचा माणूस. [सं.]
कूपकाटी क्रिवि. काट्याच्या झुडपात; कुंपणात; काट्यात वगैरे.
कूप क्रमलेख (भूशा.) विशेषतः तेलासाठी वेधन करून किंवा खनिजपदार्थांच्या साठ्यासाठी खोदलेल्या विहिरीमध्ये सापडणाऱ्या थरांची अथवा त्या थरांच्या भौतिक गुणधर्माची खोलीनुसार केलेली यादी. त्या अनुषंगाने काढलेला आलेख.
कूपनलिका स्त्री. जमिनीला छिद्र पाडून त्यात नळी बसवून भूगर्भातील यंत्राद्वारे वर खेचण्याची केलेली सोय; नलिकारूपी विहीर. [सं.]
कूपपटाशी स्त्री. (यंत्र) अर्ध गोलाकार धार असलेली पटाशी.
कूपमंडूक न्याय पु. विहिरीतील कासवाचे किंवा बेडकाचे जग म्हणजे त्या विहिरीतीलच संकुचित भाग, जागा. तिच्या बाहेर काय आहे याची त्याला मुळीच कल्पना नसते. त्याप्रमाणेच जो मनुष्य आपला गाव किंवा आपला देश सोडून कधी बाहेर गेला नाही त्याला आपलाच गाव किंवा देश चांगला असे वाटते व इतर गाव किंवा देश यांना तो तुच्छ लेखतो; संकुचित दृष्टी, व्यापक दृष्टिकोनाचा अभाव असणे : ‘असे प्रतिपादन करणे म्हणजे हिंदुधर्माच्या स्वरूपाबद्दल कूपमंडूक न्यायाने आपले अज्ञान प्रदर्शित करणे होय.’ - लोटिकेले ४·३८८. [सं.]
कूपमंडूकवृत्ति स्त्री. आपल्याला दिसते तेवढेच जग असे मानण्याची बुद्धी; दुसऱ्याचे अस्तित्व, गरजा, विचार, लक्षात न घेण्याची बुद्धी; अतिशय संकुचित वृत्ती. [सल.]
कूपमंडूकवृत्ती स्त्री. आपल्याला दिसते तेवढेच जग असे मानण्याची बुद्धी; दुसऱ्याचे अस्तित्व, गरजा, विचार, लक्षात न घेण्याची बुद्धी; अतिशय संकुचित वृत्ती. [सल.]
कूपयंत्रघटिका स्त्री. रहाटगाडगे. [सं.]
कूपयंत्रघटिका न्याय   रहाटगाडग्याच्या पोहऱ्यांची सदोदित पालटणारी स्थिती. रहाटगाडगी फिरू लागली म्हणजे रिकामे पोहरे घालून पाण्याने भरून येतात, त्यातील पाणी ओतले जाते व ती रिकामी होऊन पुन्हा खाली जातात आणि पुन्हा भरून वर येतात. अशीच माणसाची स्थिती (सुखातून दुःखात व दुःखातून सुखात) पालटली जाते. चक्रनेमिक्रम; उत्कर्षमागून अपकर्षाचा क्रम. [सं.]
कूपरी स्त्री. आळ; दोष; आरोप : ‘आपणयावरील साकारपणाची कूपरी ।’ - भाए ६१७.
कूपिका स्त्री. कूपी; बाटली; सुरई : ‘तिची वर्णिता रुपरेखा । ती सौंदर्याची कूपिका ।’ - कथा १·३·३७. [सं. कूप]
कूय स्त्री. हुकी; कोल्ह्याचे ओरडणे. कोल्ह्याची कुई. (गो.) [ध्व.]
कूर पु. रास; ढीग. (तंजा.) [सं. कूट]
कूर वि. तीक्ष्ण धार असलेले. (तंजा.) [सं. क्रूर]
कूर्च पु. १. घोड्याच्या खुराचा वरचा भाग. - अश्वप १·६३. २. दाढीचे केस : ‘भंवते इंद्रनीळ विरुढती सानट । तर ते कूर्च वरवंट । उपमीजते ।’ - ज्ञाप्र ४६५. ३. पैतृक कर्मांत पितरांना व देवांना उदक देण्यासाठी व इतर धार्मिक विधींत दर्भाची विशिष्ट आकाराची मुष्टी करतात तो विधी. ४. पहा : कूर्चा [सं.
कूर्च पु. गुच्छ; जुडगा. [सं.]
कूर्चा स्त्री. (शाप.) मृदू अस्थी; मृदू अस्थींचे वेष्टण : ‘हाडांच्या शेवटी कूर्चेचें म्हणजे अस्थींचे वेष्टण असते.’ - मराठी ६ वे पुस्तक (१८७५) २५४. [सं. कूर्च]
कूर्चिका स्त्री. घोड्याच्या कूर्चाचा मागील भाग. - अश्वप १·६२. [सं. कूर्च]
कूर्निश   पहा : कुरनिसात
कूर्परधर न. (यंत्र) यंत्रात ज्या दांड्यामुळे अनेक चात्या अथवा दांडे फिरतात ते बसविलेली पट्टी.
कूर्पास पु. बायकांच्या अंगातील चोळी; बंडी : ‘कूर्पासका आड दडोन धाकें ।’ - सारुह ७·१३५.
कूर्म पु. १. कासव : ‘कां कूर्म जियापरि । उवाइला अवेव पसरी ।’ - ज्ञा २·३०१. २. विष्णूच्या (दशावतारातील दुसरा अवतार : ‘शेष कूर्म वाऱ्हाव जाले ।’ - दास २०·८·२२. [सं.]
कूर्मक पु. १. कासव : ‘कां कूर्म जियापरि । उवाइला अवेव पसरी ।’ - ज्ञा २·३०१. २. विष्णूच्या (दशावतारातील दुसरा अवतार : ‘शेष कूर्म वाऱ्हाव जाले ।’ - दास २०·८·२२. [सं.]
कूर्म पु. १. पंच उपप्राणांपैकीं एक : ‘नाग कूर्म कृकल देवदत्त । पांचवा धनंजय जाण तेथ । यांची वस्ती शरीरांत । ऐक निश्चितू सांगेन ।’ - एभा १२·३२१. २. जांभईच्या वेळेच्या वायूच्या विशिष्ट स्थितीचे नाव : ‘आणि जांभई शिंक ढेकर । ऐसैसा होतसे व्यापर । नाग कूर्म कृकर । इत्यादि होय ॥’ - ज्ञा १८·२४·१. [सं.]