शब्द समानार्थी व्याख्या
कृष्णताळू वि. ज्याची टाळू काळी आहे असा (घोडा). हे अशुभचिन्ह मानतात.
कृष्णटाळू वि. ज्याची टाळू काळी आहे असा (घोडा). हे अशुभचिन्ह मानतात.
कृष्णपक्ष पु. १. काळोख्या रात्रीचा पंधरवडा; वद्य पक्ष; ज्यामध्ये चंद्राच्या कला उत्तरोत्तर कमी होत जातात तो पक्ष. २. (ल.) उतरती कळा, वय; ऱ्हास. ३. ज्याच्याकडे दोष आहे असा पक्ष, बाजू : ‘आस्तिक व नास्तिक, शुक्लपक्ष व कृष्णपक्ष अशा जोडप्यांतील तंटे एक तर स्वल्पजीवि असतात....’ - आगर ३·२०२. [सं.]
कृष्णपक्ष   १. घट आणि वाढ; क्षय आणि वृद्धी. २. खोटेपणा व खरेपणा; वाईट आणि चांगले. [सं.]
शुक्लपक्ष   १. घट आणि वाढ; क्षय आणि वृद्धी. २. खोटेपणा व खरेपणा; वाईट आणि चांगले. [सं.]
कृष्णपक्षी वि. विदुर जातीचे लोक. (ना.)
कृष्णमणी पु. विवाहित स्त्रियांनी घालायचा काळ्या मण्यांचा गळेसर. [सं.]
कृष्णमूर्ति स्त्री. अतिशय काळा, काळाकुळकुळीत माणूस. [सं.]
कृष्णमूर्ती स्त्री. अतिशय काळा, काळाकुळकुळीत माणूस. [सं.]
कृष्णमृग पु. काळवीट : ‘शरभापुढें टिकेना सिंहहि मग काय कृष्णसार थिरे ।’ - मोद्रोण ११·६७. [सं.]
कृष्णसार पु. काळवीट : ‘शरभापुढें टिकेना सिंहहि मग काय कृष्णसार थिरे ।’ - मोद्रोण ११·६७. [सं.]
कृष्णमृत्तिका स्त्री. बंदुकीची दारू. [सं.]
कृष्णमेचु $1 काळा संगमर्मर; सिरसाळ पाषाण : ‘ऐसी कृष्णमेचुची उगवनी । सुदेवो देखताय नयनी ।’ - नरुस्व १०३. २. काळे रत्न : ‘तो उचश्रवेयाचिये जावळीचा : तैसा स्वेत वर्ण कृष्णमेचुचा -’ नरूस्व २७४०.
कृष्णरक्तउष्णता   (यंत्र.) अंदाजे ६००° सें. तापमानापर्यंत दिलेली उष्णता.
कृष्णवर्णधारी पेशी   (वै.) काळे किंवा गडद तपकिरी रंगद्रव्य असलेल्या पेशी. केस, त्वचा यांचा रंग या पेशींच्या कमी-जास्त प्रमाणावर अवलंबून असतो.
कृष्णविलास पु. स्त्री. १. श्रीकृष्णाच्या गोकुळातील क्रीडा, खोड्या, लीला, पुंडावा. २. (ल.) अर्वाच्य खोड्या, खेळ. ३. (ल.) व्यभिचार; सुरत विलास. [सं.]
कृष्णक्रीडा पु. स्त्री. १. श्रीकृष्णाच्या गोकुळातील क्रीडा, खोड्या, लीला, पुंडावा. २. (ल.) अर्वाच्य खोड्या, खेळ. ३. (ल.) व्यभिचार; सुरत विलास. [सं.]
कृष्णसट वि. मानेवरील केस काळे, आवाज मेघनगाऱ्याप्रमाणे गंभीर, श्वास कृष्णसर्पासारखा, गती उत्तम आणि धाडसी असा (घोडा). - अश्वप १·२३.
कृष्णागर पु. चंदनाचे एक प्रकारचे झाड : ‘कृष्णागर मलयागर परिमळ । देवदार वृक्ष तेथें ।’ - हरि २३·१००. [सं. कृष्ण + अगरु]
कृष्णागरु पु. चंदनाचे एक प्रकारचे झाड : ‘कृष्णागर मलयागर परिमळ । देवदार वृक्ष तेथें ।’ - हरि २३·१००. [सं. कृष्ण + अगरु]
कृष्णाची गाय   इंद्रगोप, पावसाळ्यात आढळणारा, लहान, तांबड्या रंगाचा, पुष्कळ पायांचा किडा. हे किडे समुदायाने राहतात.
कृष्णाजिन न. काळविटाचे किंवा सामान्यतः हरिणाचे कातडे; मृगाजिन : ‘नाहीं नाहीं चर्माआतु । कृष्णाजिन व्याघ्रांबर ।’ - तुगा ३४२. [सं.]
कृष्णार्पण न. १. कृष्णभक्तीने ब्राह्मणाला अगर देवळाला जमीन दान देणे. २. स्वत्व न ठेवता केलेले दान. (क्रि. करणे). [सं.]
कृष्णावर्त वि. शरीरावर एखाद्या ठिकाणी शंखाप्रमाणे भोवरा असलेला (घोडा). हे शुभचिन्ह मानतात. - अश्वप १·९१. [सं.]
कृष्णावळ पु. कांद्याला विनोदाने म्हणतात. कारण तो उभा चिरला म्हणजे शंखाकृती आणि आडवा चिरला म्हणजे चक्राकृती दिसतो आणि शंख, चक्र ही कृष्णाची आयुधे आहेत : ‘आगस्तीचें मूत्र गळा लावुनि म्हणती कृष्णावळ ।’ - तुगा २८२४. [सं. कृष्ण + वलय = कृष्णावळ]