शब्द समानार्थी व्याख्या
केडोळ क्रिवि. एवढा वेळ; कितीतरी वेळ; फार वेळ. [सं. कियत्‌वेला]
केढवळ पु. पुष्कळ वेळ; किती वेळ; फार वेळ.
केढोळ पु. पुष्कळ वेळ; किती वेळ; फार वेळ.
केढवळचा वि. किती वेळचा; केव्हाचा; बऱ्याच वेळापासून.
केढोळचा वि. किती वेळचा; केव्हाचा; बऱ्याच वेळापासून.
केणा पु. स्त्री. केना नावाची शेतात उगवणारी भाजी. याची फुले निळी-जांभळी असतात. ह्याला कातरपाने येतात.
केणी पु. स्त्री. केना नावाची शेतात उगवणारी भाजी. याची फुले निळी-जांभळी असतात. ह्याला कातरपाने येतात.
केणाकुरडुची भाजी   केणा आणि कुंजरा या दोन हलक्या पालेभाज्या आहेत. त्यावरून भिकार अन्न. पहा : कळणाकोंडा : ‘घागरी मडक्यात कांही दाणे पहा, दळून त्याची भाकरी कर, केणी कुरडूची भाजी कर.’ -संपत शनिवारची कहाणी ३२.
केण्याकुंजऱ्याची भाजी   केणा आणि कुंजरा या दोन हलक्या पालेभाज्या आहेत. त्यावरून भिकार अन्न. पहा : कळणाकोंडा : ‘घागरी मडक्यात कांही दाणे पहा, दळून त्याची भाकरी कर, केणी कुरडूची भाजी कर.’ -संपत शनिवारची कहाणी ३२.
केणी पु. न. १. विक्रीचा माल; मालाचे गाठोडे : ‘तरी तैसी एथ कांहीं । सावियाची केणी नाहीं ।’ - ज्ञा ६·३४१. २. वस्तू; प्रकार. ३. बाजारात विकायला आलेल्या जिनसांवर (माल, वस्तूंवर) देशमुख-देशपांडे वगैरे वतनदारांचा कर. सरकारी कर. ४. व्यापारविषयक पदार्थ (विशेषतः धान्य, फळे, भाजी इ.) : ‘इया पाटणीं जें केणे उघटे ।’ - पाटणचा शीलालेख. ५. वर्तावळा, वर लावणे. ६. पैसा, डबोले. (मावळी).
केणे पु. न. १. विक्रीचा माल; मालाचे गाठोडे : ‘तरी तैसी एथ कांहीं । सावियाची केणी नाहीं ।’ - ज्ञा ६·३४१. २. वस्तू; प्रकार. ३. बाजारात विकायला आलेल्या जिनसांवर (माल, वस्तूंवर) देशमुख-देशपांडे वगैरे वतनदारांचा कर. सरकारी कर. ४. व्यापारविषयक पदार्थ (विशेषतः धान्य, फळे, भाजी इ.) : ‘इया पाटणीं जें केणे उघटे ।’ - पाटणचा शीलालेख. ५. वर्तावळा, वर लावणे. ६. पैसा, डबोले. (मावळी).
केणी स्त्री. कमतरता; अडचण : ‘उपायाची नाहि । केणि येथें ॥’ - राज्ञा ९·४६७.
केणे न. दुकान : ‘नातरि जालंधाच्या पाटणीं । जेवि केणें लावण्याचें’ - उगी ६२५.
केणे न. बासनाभोवती बांधायची सुताची किंवा रेशमाची दोरी; बंधन. पहा : केवणे : ‘तया ध्वनिताचें केणें सोडूनि ।’ - ज्ञा ६·२९२. (वा.) केण्याची समाधी घेणे - रेशमी दोरीचा गळफास लावून घेणे : ‘तेथेंच केण्याची समाधी पुंडलिकाच्या देवालयाच्या सन्निध घेऊन मृत्यु पावले.’ - चिटणीस बखर म रि ४·४२.
केण्या क्रिवि. कोठून; कोणत्या वाटेने, मार्गाने. (चि.)
केत पु. केतू; ध्वज.
केत पु. इच्छा; हौस : ‘श्वशुरप्रमुख सासू कृष्ण आराधि केते ।’ -मंराधा ७८.
केत पु. १. झाडाचा नार, गाभा. (राजा.) २. झाडातील जून लाकूड.
केतक न. १ केवडा; केवड्याचे कणीस. २. कणसाचे एक पान, पात. ३. डोक्यातील सोन्याचा एक दागिना. [सं.]
केतकट स्त्री. केतकीचे झाड; केवडा. (को.)
केतकट न. केतकीचे लाकूड.
केतकपान   पहा : केतक ३
केतकी स्त्री. केवड्याचे झाड. पहा : केतक [सं.]
केतकी वि. केतकीच्या पानासारख्या रंग.
केतकी स्त्री. एक प्रकारचा पक्षी; चांभारीण पक्षी. (को.)