शब्द समानार्थी व्याख्या
केमशी स्त्री. बुरशी. पहा : केंडशी
केमसा पु. स्त्री. पुरुष अथवा स्त्रीला बायका देतात ती एक शिवी.
केमशी पु. स्त्री. पुरुष अथवा स्त्रीला बायका देतात ती एक शिवी.
केयूर न. १. दंडामधील कडे, वळे; बाजूबंद : ‘जैसा केयुरादिकीं कसु । सुवर्णाचा ॥’ - ज्ञा १३·१०६५. २. कंकण.
केर पु. न. १. कचरा; गवताच्या काड्या; धुरळा; शेण, माती, गवत, पाने इत्यादींचा वाईटसाईट अंश. २. गाळ; रेंदा; निरुपयोगी पदार्थ; अवशिष्ट भाग. ३. बारीक कण; गवतकाडी, कसपट, तुकडा इ. (साखरेतील, धान्यातील, कापसातील.) (को.) [क. किर, केर] (वा.) केर फिटणे - कचऱ्याप्रमाणे उडून जाणे; नाश होणे : ‘तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु ।’ - ज्ञा १३४. केर फेडणे - नाश करणे. केरवारा करणे - घरातील निरनिराळी कामे करणे. १. (ल.) धसफस करून काम बिघडवणे; नासणे; खराब करणे. २. तिरस्काराने नाकारणे. (उपदेश वगैरे.)
केर पु. अभ्र; ढग : ‘जैसा केरु फीटलेया अभाली । दीठि रिगे सूर्यमंडलीं । - राज्ञा १०·७४. २. संशय.
केर स्त्री. दोन डोंगरांमधील लांबट शेतजमीन; पावसाळी हंगामाची शेतजमीन. (गो.)
केर पु. मासळी. (गो.)
केर पु. मोठा, उंच रथ. उदा. म्हाळसेचा केर.
केरकचरा पु. केर व इतर निरुपयोगी वस्तूंना उद्देशून वापरण्याचा शब्द.
केरकतवार पु. अडगळ; गाळसाळ; केरकचरा. [केरचे द्वि.]
केरकारत पु. अडगळ; गाळसाळ; केरकचरा. [केरचे द्वि.]
केरकुध्वित पु. अडगळ; गाळसाळ; केरकचरा. [केरचे द्वि.]
केरकसपट न. केरकचरा; गवतकाडी; गाळसाळ.
केरकस्तान न. केरकचरा; गवतकाडी; गाळसाळ.
केरकार पु. झाडलोट करणारा.
केरकारू पु. झाडलोट करणारा.
केरकोंडा पु. केर व कोंडा; घराची झाडलोट करणे वगैरेसारखी हलकी नोकरी. (निर्वाहाचे साधन म्हणून केलेली.)
केरडोक न. छपरापासून लोंबणारे जाळे; कोळिष्टके; गवताच्या काड्या;
केरणे अक्रि. खाणे.
केरपट्टी स्त्री. केरनेणावळ; केर काढण्यासाठी जे झाडूवाले नेमतात त्यांचा खर्च भागवण्यासाठी बसवलेला कर.
केरपाणी न. झाडलोट, पाणी भरणे, सारवणे, सडासंमार्जन वगैरे बायकांची रोजची कामे.
केरपोतेरे न. झाडलोट, पाणी भरणे, सारवणे, सडासंमार्जन वगैरे बायकांची रोजची कामे.
केरली स्त्री. खगोलविद्या; नक्षत्रज्ञान.
केरपातेर न. केरकचरा.