शब्द समानार्थी व्याख्या
केरपुंजा पु. केराचा ढीग.
केरवळ्या (कोणाच्या) पुअव. कोणफळाचा केलेला एक खाद्यपदार्थ.
केरवा पु. चिनी मातीचे एक भांडे : ‘केरवा नांवाचे चिनी मातीचें पात्र आहे त्यांत एक मुंबईमण गुलाबपाणी असतें.’ -मुंव्या ११९. [फा. कहरुवा]
केरवा पु. तबल्याचा एक बोल. याच्या चार मात्रा असतात.
केरवा पु. केरवा नाच. पहा : कारवा
केरवा पु. १. बांगड्यांचा एक प्रकार. २. पिवळा दृष्टमणी; तृणमणी : ‘आंबर नावाचे एक खनिज आहे. केरवा मणी त्याचा केलेला असतो.’ - वनश्री १०७. [फा. कह्‌रुवा]
केरवारा पु. झाडलोट : ‘सर्व वाड्याचा केरवारा सणावारी झाला म्हणजे फार झाले.’ - भदि ५१.
केरवाऱ्यात $1 केरात, घाणीत. २. (ल.) केरवाऱ्यावर उडून गेलेला.
केरवाऱ्यात निशी $1 केरात, घाणीत. २. (ल.) केरवाऱ्यावर उडून गेलेला.
केरसुणी स्त्री. १. केर झाडण्यासाठी शिंदीच्या पातींची अगर नारळीच्या हिरांची केलेली झाडणी; वाढवण; सळाथी. २. ऐदी स्त्री; आळशी स्त्री.
केरसुणी वि. नेहमी बाजूला शेपटी वळवलेला (घोडा); पहा : उघडगांड्या
केरसोणी स्त्री. १. केर झाडण्यासाठी शिंदीच्या पातींची अगर नारळीच्या हिरांची केलेली झाडणी; वाढवण; सळाथी. २. ऐदी स्त्री; आळशी स्त्री.
केरसोणी वि. नेहमी बाजूला शेपटी वळवलेला (घोडा); पहा : उघडगांड्या
केरसुणीकार पु. झाडलोट करणारा नोकर : ‘तंव गोरंभकु नामें केरसुणीकारु ।’ - पंच १·२६.
केरसुणीकारु पु. झाडलोट करणारा नोकर : ‘तंव गोरंभकु नामें केरसुणीकारु ।’ - पंच १·२६.
केरा वि. १. तिरप्या नजरेचा; चकणा. २. वाकडा. [सं. केकर = तिरवा.]
केरावणे अक्रि. धान्य वगैरेमध्ये केरकचरा मिसळणे. (को.)
केरावारी वि. टाकाऊ; कवडी किमतीचा (माल).
केरासमान वि. टाकाऊ; कवडी किमतीचा (माल).
केरी स्त्री १. केर; काड्या (नांगराने उपटून निघालेल्या); केरकचरा (पाण्याच्या ओघाबरोबर आलेला, भरतीबरोबर आलेला.) २. जमीन भाजल्यावर राहिलेले कवळ वगैरे; शेतातील धस, खुंट; पिकाबरोबर वाढलेले तण, पाचोळा. ३. माडाच्या पात्यांची विणलेली पाटी. (को.)
केरी स्त्री. विहिरीतील एक प्रकारचा मासा.
केरोसीन न. घासलेट.
केल न. १. काठीचे दुबेळके, डोके, भाग. २. दुबेळे, दुबेळक्याचा काटा. ३. मोडलेल्या फांदीचा, झाडाच्या खोडावर राहिलेला भाग. ४. काठीला लावलेली आकडी.
केलटे न. माकडाचे पिल्लू; माकड. (को. गो.) [पो. केल्दन]
केळटे न. माकडाचे पिल्लू; माकड. (को. गो.) [पो. केल्दन]