शब्द समानार्थी व्याख्या
केवलसत्तावाद पु. ब्रह्मवाद.
केवलसाक्षी वि. (तत्त्व.) फक्त, नुसते पाहणारा (ईश्वर); शुद्ध साक्षी; निःशेषतः अलिप्त असलेला.
केवला पु. (गवंडी) भिंतीचा पुढील अगर मागील भाग, टोक; चांदईचा शेवट. (बे.)
केवला वि. एक ही संख्या (इसम, रुपया इ.). (नंद भाषा)
केवलान्वयी अनुमान (तत्त्व.) ज्या अनुमानातील साध्य सर्वव्यापी असल्यामुळे जेथे साध्य नाही असे ठिकाणच (विपक्ष) उपलब्ध नसते त्यास ‘केवलान्वयी’ अनुमान असे म्हणतात.
केवलेश्वरवादी वि. फक्त ईश्वराचे अस्तित्व मानून धर्म हा ईश्वरप्रणीत आहे हे मत न मानणारा.
केवल्यो बावल्यो स्त्री. चेष्टा; टिवल्याबावल्या. (कु.)
केवशीन क्रिवि. कोठून. (गो.)
केवळ   पहा : केवल
केवा पु. १. साठा; संग्रह; पुंजी; डबोले. २. रोख रक्कम; रोकड. (नंदभाषा कर.) [सं. क्री - क्रय]
केवा पु. महत्त्व; सामर्थ्य; प्रौढी; पाड (निषेधार्थी प्रयोग.). पहा : किंमत : ‘संतभजनी माझा सद्‌भावो । केवा कोण पाहा भक्तीचा ।’ - एभा ११·१५५३. [क. केव]
केवालु स्त्री. बारीक रेती : ‘रत्नकुटाचि केवालु मौआल’ - वह १७७.
केवि क्रिवि. कसे; कोणत्या रीतीने; कशासारखे; कोणत्या प्रकाराने : ‘तो केवि मार्गी इथें । क्षेमी होए ।’ - ऋ ७. [सं. कथम्]
केवी क्रिवि. कसे; कोणत्या रीतीने; कशासारखे; कोणत्या प्रकाराने : ‘तो केवि मार्गी इथें । क्षेमी होए ।’ - ऋ ७. [सं. कथम्]
केवी   पहा : केवा १, २ (को. गो.)
केवी पु. उपऱ्या शेतकरी; परगावचे कूळ.
केवूं क्रिवि. कसा; कशी. पहा : केवी : ‘प्राणेश्वरा त्यजूनी केवूं । वाचूं म्हणतसे ते नारी ।’ - गुच ३०·९०.
केव्हडा   पहा : केवढा
केव्हळा   प्रश्नार्थक अव्यय. केव्हा? केव्हाही; कधीही : ‘वाटा केव्हळी न वचति । क्रोधाचिये ।’ - ज्ञा ४·५९.
केव्हळि   प्रश्नार्थक अव्यय. केव्हा? केव्हाही; कधीही : ‘वाटा केव्हळी न वचति । क्रोधाचिये ।’ - ज्ञा ४·५९.
केव्हा क्रिवि. १. (प्रश्नार्थक) कोणत्या वेळी, कोणत्या प्रसंगी, समयाला. २. (जोराने उच्चारला असता) कोणत्याही वेळी; कधीही (निषेधार्थी प्रयोग.) ३. केव्हा केव्हा. ४. किती काल झाला असताना. केव्हा व कधी याच्यामध्ये भेद आहे. केव्हा याने नुकत्याच होऊन गेलेल्या काळाचा बोध होतो व कधी याने बऱ्याच पूर्वीच्या काळाचा बोध होतो.
केव्हा कधी केव्हाकेव्हा क्रिवि. कधीकधी; मधूनमधून; वेळेनुसार.
केव्हाकेव्हाना क्रिवि. कधीकधी; मधूनमधून; वेळेनुसार.
केव्हा नाही केव्हा क्रिवि. कधीकधी; मधूनमधून; वेळेनुसार.
केव्हातरी क्रिवि. कधीकधी; मधूनमधून; वेळेनुसार.