शब्द समानार्थी व्याख्या
केव्हाच क्रिवि. १. अगदी त्याच क्षणी; लगेच (मागल्या काळाबद्दल, गत कृत्याकडे संबंध.) २. कधीच नाही या अर्थी उपयोग.
केव्हाचा वि. १. पुष्कळ काळपर्यंत; किती वेळचा (गेलेल्या, असलेल्या, बसलेल्या, वाट पाहणाऱ्या माणसाबद्दल योजतात.) २. (प्रश्नवाचक) केव्हापासून.
केव्हाना क्रिवि. अचानक; कल्पना नसताना : ‘मग एके दिवशी ती (म्हातारी) केव्हाना मरून गेली.’ - घरदार ८०.
केव्हापासून क्रिवि. १. (प्रश्नवाचक) किती वेळापासून. २. बऱ्याच वेळापासून.
केव्हाशीक क्रि. वि. १. केव्हाही (निषेधार्थी). २. केव्हाच. (कु.)
केव्हासक क्रि. वि. १. केव्हाही (निषेधार्थी). २. केव्हाच. (कु.)
केव्हासाक क्रि. वि. १. केव्हाही (निषेधार्थी). २. केव्हाच. (कु.)
केव्हासा क्रिवि. कोणत्या वेळेच्या सुमाराला. (व.)
केव्हेळी क्रिवि. केव्हातरी.
केश पु. केस; रोम; लव. [सं.] (वा.) केश काढणे - श्मश्रू करणे (विशेषतः विधवा स्त्रीची). केश देणे - विधवेने केशवपनास मान्यता देणे. पहा : गळा
केशकलाप पु. भरपूर केस. दाट सुंदर केस.
केशट्यो पु. झिपऱ्या (लघुत्वदर्शक). (गो.)
केशपाश पु. केसांच्या जटा; बांधलेले केस; पुष्कळ केस. [सं.]
केशजाल पु. केसांच्या जटा; बांधलेले केस; पुष्कळ केस. [सं.]
केशबंध पु. (नृत्य) (संयुक्त हस्त) पताकहस्त करून ठेवणे. [सं.]
केशभूषा स्त्री. केसांची वेगवेगळ्या प्रकारे रचना, सजावट करणे. केसांची शोभिवंत बांधणी करणे. [सं.]
केशर न. १. जाफरा, काश्मीर या भागात होणारे एक तंतुमय, सुगंधी, खाद्य पदार्थात वापरण्याचे द्रव्य. २. एक झाड. याचा रंगासाठी उपयोग करतात. पहा : कपिला [सं.]
केशरा पु. मरेन किंवा मारीन या पूर्वनिश्चयाचे चिन्ह म्हणून लढाऊ शिपाई जो केशरी रंगाचा पोशाख अंगावर घालत असत तो. विशेषतः रजपूत योद्धे केशरा घालीत. (क्रि. करणे, घेणे.) [सं. केशर]
केशरी वि. १. केशरासंबंधी; केशरयुक्त; केशरी रंगाने रंगवलेले; (केशरी बर्फी, केशरी पातळ इ.) केशरी वस्त्र परिधान केलेले २. केशरी पोशाख करून जिवावर उदार झालेला (योद्धा). (वा.) केशरी करणे - जोहार करणे. पूर्वी रजपुतात अखेरच्या संग्रामाकरिता निघायच्या वेळी स्त्रियांना अग्नीत लोटून, केशरी पोषाख करून बाहेर पडत यावरून : ‘त्यानें आपल्या बायकांची केशरी करून तानाजीशी लढण्यास आला.’ - मातीर्थ ४·४६१. केशरी वागे करणे - केशरी पोषाख करणे. हा पोषाख निर्वाणीच्या हल्ल्याच्या वेळी केला जात असे. केशरी पोषाख केल्यानंतर रजपूर वीर रणांगणातून परत फिरत नसत : ‘एक दिवस रजपुतांनी केशरी वागे करून लढाईचा प्रसंग घातला.’ - पेद १२·५.
केशरी स्त्री. १. केशराची उटी. २. केशरमिश्रित पक्वान्न, पदार्थ (केशरी भात, मिठाई इ.). ३. एक फुलझाड.
केशरी पु. सिंह. पहा : केसरी
केशऱ्या वि. रेषा असलेला (आंबा).
केशवकरणी स्त्री. पद्यातील एका जातिवृत्ताचे नाव. रामजोशाच्या ‘केशवकरणी अद्‌भुतलीला नारायण तो कसा । तयाचा सकल जनांवर ठसा ।’ या काव्यावरून हे नाव पडले. याच्या पहिल्या चरणात २७ व दुसऱ्या चरणात १६ मात्रा असतात. केव्हा केव्हा २१ मात्रांचा अंतरा असतो.
केशवपन न. केसांची श्मश्रू करणे; केस काढणे; हजामत (विशेषतः विधवांच्या बाबतीत योजतात.) : ‘विधवांनी केशवपन केलें नाहीं तर त्यानें या राजकीय प्रश्नाचा उलगडा होण्यास यत्किंचितही मदत होण्याचा संभव नाही.’ - लोटिकेले ४·१८६. [सं.]
केशवमाधव पु. १. विष्णूच्या चोवीस नावांपैकी पहिले व तिसरे नाव; कृष्णाची नावे. २. (ल.) बुरसलेल्या पदार्थातील बारीक किडे; अशुद्ध पाण्यातील किडे.