शब्द समानार्थी व्याख्या
केशवाहिनी स्त्री. (प्राणि.) केसासारखी सूक्ष्म नलिका. [सं.]
केशवीचुरा पु. केस विंचरणारा; शृंगार करणारा : ‘प्रदेष्टाः केशवीचुराः हातसाहाना’ - पंचो ८३·६.
केशसंवाहन न. केस धुऊनपुसून साफ करणे. [सं.]
केशाकर्षण न. (शाप.) अत्यंत बारीक छिद्राच्या नळीतून द्रव पदार्थांचे होणारे आकर्षण. [सं.]
केशाकार वाहिनी   (वै.) अगदी केसासारखी बारीक रक्तवाहिनी. स्नायु आणि ऊतींमध्ये रक्त व प्राणवायू यांचा पुरवठा करण्याचे कार्य या वाहिन्या करतात.
केशाकेशी   पहा : केशधरणी : ‘तुम्हीं ही शब्दांची केशाकेशी चालविली आहे.’ - नाकु २०३.
केशांत पु. घोड्याच्या कपाळावरचा भाग. - अश्वप १·६१.
केशिका वि. केसासारखी, अगदी बारीक (वेज) असलेली नळी; केसासारखी सूक्ष्म नळी (विशेषतः रक्तवाहिनी). [सं.]
केस   पहा : केश. (वा.) केस काढणे - श्मश्रू करणे; दाढी-मिशा काढणे. केस नखलणे - केसातून नखे (बोटे) फिरवून (फणीप्रमाणे) केंस व्यवस्थित करणे; जटा काढणे : ‘वेणी विंचरली केस नखलुन । अलंकार चढविले हिऱ्याचे कळस काप कुंचलुन ।’ - प्रला २२०. केसांच्या अंबाड्या होणे - केस पांढरे होणे; वृद्धावस्था येणे. केसात माती घालणे - अतिशय दुःख होणे. केसाने गळा कापणे - विश्वासघात करणे; गोडगोड बोलून फसवणे : ‘चांडाळांनों, हरामखोरांनो दगा करून आमचा सर्वांचा केसाने गळा कापलात ।’ - कांचनगड. केसाने चरण झाडणे - सेवा करण्याचा कळस करणे; अगदी हलकी सेवा करणे : ‘पाहिन क्षणभरी । चरण झाडीन केशीं ।’ - धावा, नवनीत पृ. ४४९. केसाला टका, धक्का लागू न देणे, न लावणे - उत्तम प्रकारे संरक्षण करणे; उपद्रव होऊ न देणे : ‘तुझिया टका न लागो साधुपिपीलिकचमूगुडा केशा ।’ - मोकर्ण ५०·३. केसालाही धक्का न लागणे, केस वाकडा न होणे. - जरासुद्धा नुकसान किंवा दुखापत न होणे.
केस स्त्री. १. रुग्ण, आजारी मनुष्य. २. मृत्यू; विशिष्ट रोगाने आलेले मरण. [इं.]
केस स्त्री. (कायदा) ज्याची चौकशी चालू आहे असे प्रकरण किंवा घटना. कज्जा; खटला (वा.) केस फाईल करणे - एखाद्या गोष्टीची चौकशी थांबवणे.
केसउ पु. पळस; वृक्षविशेष : ‘जैसा केसउ फुलला । तैसा अशुद्धें वोहळला ।’ - उह ६३१.
केसक न. किंशुक; पळसाचे फूल : ‘करतळें रंगें कालौनि केसके । रांविती सुगंधें उदकें ।’ - नरुस्व ८४५. [सं. किंशुक]
केसकरीण स्त्री. सकेशा विधवा.
केसटी स्त्री. १. घाणेरड्या, विसकटलेल्या केसांच्या झिपऱ्या. २. (तिरस्कारार्थी प्रयोग) केस. पहा : केशट्यो
केसटोपी स्त्री. ज्याच्यावर केस (फर) आहेत अशी चामड्याची टोपी.
केसणा क्रिवि. किती; केवढा; कसा; कशाप्रकारचा : ‘परमाणुची केसनी थोरीं ।’ - दाव २८८; ‘विरडियां पाड तो केसणा । तूं देखणा निजदृष्टी ।’ - एरुस्व १६·७५.
केसणी क्रिवि. किती; केवढा; कसा; कशाप्रकारचा : ‘परमाणुची केसनी थोरीं ।’ - दाव २८८; ‘विरडियां पाड तो केसणा । तूं देखणा निजदृष्टी ।’ - एरुस्व १६·७५.
केसना क्रिवि. किती; केवढा; कसा; कशाप्रकारचा : ‘परमाणुची केसनी थोरीं ।’ - दाव २८८; ‘विरडियां पाड तो केसणा । तूं देखणा निजदृष्टी ।’ - एरुस्व १६·७५.
केसनी क्रिवि. किती; केवढा; कसा; कशाप्रकारचा : ‘परमाणुची केसनी थोरीं ।’ - दाव २८८; ‘विरडियां पाड तो केसणा । तूं देखणा निजदृष्टी ।’ - एरुस्व १६·७५.
केसतूड   पहा : केसतोडा : ‘केसतूड होऊन मांडी विलक्षण ठसठसत रहावी तशी ती केंसानं गळा कापणारी बातमी.’ - उअ २१.
केसतोड पु. केस उपटला गेल्यामुळे होणारा फोड.
केसतोडा पु. केस उपटला गेल्यामुळे होणारा फोड.
केसधरणी स्त्री. केसांची झोंबाझोंबी : ‘तेथ जाली केशधरणी’ - शिव १०४५.
केसन अ. केवढे : ‘तीयेचे फळ मोक्षासमानः ते शक्ति केसंनी’ - मूप्र ६९२.