शब्द समानार्थी व्याख्या
केसपट न. केर; बारीक कण. पहा : कसपट
केसपिक्या वि. म्हातारा : ‘हा केसपिक्या सयाजीरावांचा वडील भाऊ.’ - विवि ८·२·३०.
केसपुळी स्त्री. करट (गो.)
केसभर क्रिवि. थोडेसुद्धा : ‘मग एवढी जड पारडी उचललीं असतां खांदा केसभरहि इकडे की तिकडे कलत नाहीं.’ - नि.
केसर न. केशर.
केसर पु. १. फुलातील तंतू; पराग : ‘कां कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार । कुचुंबेल केसर । इया शंका ।’ - ज्ञा १३·२४८. २. आंब्याच्या कोयीला असणाऱ्या शिरा.
केसर न. १. भाताचे लोंगर, कणीस, लोंबी. २. मंजिरी, मोहोर (तुळस, आंबा इत्यादीचा)
केसर न. कसपट; केर; बारीक कण; केसपट.
केसर न. सिंहाची, घोड्याची आयाळ. - अश्वप १·६२.
केसरकी स्त्री. पुढील सालच्या पिकाकरिता नांगरून ठेवलेली जमीन. [सं. कृषि]
केसरणे अक्रि. मोहोर येणे.
केसरबोंडी स्त्री. न. केसर; एक प्रकारचे झाड. याच्या बोंडात केशरी रंगाचा गर व बिया असतात.
केसरी बोंड स्त्री. न. केसर; एक प्रकारचे झाड. याच्या बोंडात केशरी रंगाचा गर व बिया असतात.
केसरी बोंडी स्त्री. न. केसर; एक प्रकारचे झाड. याच्या बोंडात केशरी रंगाचा गर व बिया असतात.
केसरमंडल न. (वन.) परागकण बनवणाऱ्या एक किंवा अनेक अवयवांचा (केसरदलांचा) संच.
केसरहीन वि. (वन.) केसरदले नसलेले (फूल). उदा. पोपईची स्त्रीपुष्पे, सूर्यफुलाची किरणपुष्पके.
केसरिया   पहा : केशरा
केसरी स्त्री. १. पाचेचे झाड व त्याचे फूल. २. भाताचे लोंगर, घोस.
केसरी पु. सिंह.
केसरी वि. १. केशरी वस्त्रांनी आच्छादलेले; केशरी रंगाचा पोशाख घातलेला. पहा : केशरी, केशरा. २. रेषा असलेला (आंबा.).
केसऱ्या वि. १. केशरी वस्त्रांनी आच्छादलेले; केशरी रंगाचा पोशाख घातलेला. पहा : केशरी, केशरा. २. रेषा असलेला (आंबा.).
केसरी स्त्री. १. दृष्ट लागू नये म्हणून (अस्वलाच्या) केसांची केलेली दोरी. ही जनावरांच्या गळ्यात बांधतात. २. केसांची दोरी.
केसारी स्त्री. १. दृष्ट लागू नये म्हणून (अस्वलाच्या) केसांची केलेली दोरी. ही जनावरांच्या गळ्यात बांधतात. २. केसांची दोरी.
केसळी स्त्री. १. दृष्ट लागू नये म्हणून (अस्वलाच्या) केसांची केलेली दोरी. ही जनावरांच्या गळ्यात बांधतात. २. केसांची दोरी.
केसाळी स्त्री. १. दृष्ट लागू नये म्हणून (अस्वलाच्या) केसांची केलेली दोरी. ही जनावरांच्या गळ्यात बांधतात. २. केसांची दोरी.