शब्द समानार्थी व्याख्या
केसरी डाळ   एक प्रकारचे केशरी रंगाचे द्विदल धान्य : ‘मध्य प्रदेशात ‘केसरी डाळ’ किंवा ‘लाखी डाळ’ खाण्याचा प्रघात असून-’ आआआ ४७.
केसारीण स्त्री. केसांच्या दोरीचा गळफास लावून माणसाला मारणारी स्त्री.
केसारीण   (अशा स्त्रिया असतात अशी दंतकथा आहे.)
केसाळ वि. अंगावर पुष्कळ केस असलेला.
केसाळा वि. अंगावर पुष्कळ केस असलेला.
केसाळू वि. अंगावर पुष्कळ केस असलेला.
केसाळी स्त्री. आगवळ; वेणी घालताना वेणीच्या टोकाला बांधतात ती. लहान दोरी पहा : केसरी, केसाळी
केसोळी स्त्री. आगवळ; वेणी घालताना वेणीच्या टोकाला बांधतात ती. लहान दोरी पहा : केसरी, केसाळी
केसाळीण स्त्री. सकेशा विधवा स्त्री. (तंजा.)
केसीन न. दुधातील एक प्रथीन. [इं.]
केसुरडी   पहा : केसटी
केसू न. पळसाचे फूल: ‘डोइये केसूवाची माळ बांधिली’ - नरुस्व २५२४.
केसोमासी क्रिवि. संपूर्णत; अंगप्रत्यंग. (व.)
केस्तांव न. भांडणतंटा. (गो.)
केहरवा पु. १. केरवा. पहा : कारवा. २. (ताल) याला चार मात्रा व दोन विभाग असतात.
केही क्रिवि. कोठे : ‘दुरी केंही न वचावें ।’ - ज्ञा ३·८९. [सं. क्व + हि]
केहेठी क्रिवि. कोठून : ‘तुम्ही केहेठीं आलेत?’ - लोक २·६१. (चि. राजा.)
केळ स्त्री. १. केळीचे झाड. हे पुष्कळ दिवस टिकणारे, कंदरूप आहे. ह्याला मोठी पाने येतात. ह्याच्या अनेक जाती आहेत. २. केळीचे फळ. ३. ब्राह्मणी पागोट्यावरील कपाळपट्टीवरचा भाग, बिनी. ४. स्त्रिया लुगड्याच्या निऱ्या पोटाजवळ खोवताना केळ्याच्या आकाराचा भाग करतात तो. [सं. कदली ] (वा.) केळे खाणे - साखर खाणे - (ल.) खोटे बोलणे, मूर्खासारखी बडबड करणे (वगैरेला औपरोधिक शब्द.)
केळ पु. पिंपळाच्या जातीचे एक झाड. (गो.)
केळ स्त्री. धातूचा किंवा मातीचा घडा; कळशी : ‘धट्ट्याकट्ट्या बाया डोक्यावर केळा घेऊन झऱ्याला पाण्याला निघालेल्या...’ - हपा १४.
केळी स्त्री. धातूचा किंवा मातीचा घडा; कळशी : ‘धट्ट्याकट्ट्या बाया डोक्यावर केळा घेऊन झऱ्याला पाण्याला निघालेल्या...’ - हपा १४.
केळखंड न. न भरणारे केळे; वांझ केळे. याची भाजी करतात.
केळचे क्रि. थट्टा करणे. (गो.)
केळडे   पहा : केलडे : ‘वाघ पडला बावी केळडे गांड दावी.’ - लोक २·७३.
केळफूल न. केळीच्या कोक्यापासून निघालेले फूल. हे कडू, तुरट, अग्निदीपक, उष्ण, वीर्य व कफनाशक आहे. याची भाजी करतात.