शब्द समानार्थी व्याख्या
कैकाडीण स्त्री. १. कैकाड्याची, कैकाडी जातीची स्त्री : ‘प्रथमचि मी तव दादा कैकाडीण झालें ।’ - भज ४०. २. कैदाशीण; भांडखोर स्त्री. ३. (प्रेमाने) गबाळ, केस पिंजारलेल्या मुलीला म्हणतात.
कैकायी   पहा : कैकाडीण : ‘कैकायी कैकायी दुरील माझा देश ।’ - भज ४०.
कैकाई   पहा : कैकाडीण : ‘कैकायी कैकायी दुरील माझा देश ।’ - भज ४०.
कैकाळ   पहा : कळिकाळ : ‘कैकाळाचें धाक नाहीं अवघीं विघ्नें नीवारी ।’ - ऐपो. ३५०.
कैकेय पु. इराणी लोक.
कैकेयी स्त्री. १. दशरथ राजाची पत्नी : ‘कैकेयी आनंदली थोर ।’ - रावि ३·९५. २. (ल.) शिरजोर, दुष्ट, कजाग, हट्टी स्त्री. [सं. केकय]
कैके स्त्री. १. दशरथ राजाची पत्नी : ‘कैकेयी आनंदली थोर ।’ - रावि ३·९५. २. (ल.) शिरजोर, दुष्ट, कजाग, हट्टी स्त्री. [सं. केकय]
कैच अ. कोठील? कोठून : ‘तैसे हृदय प्रसन्न होये । तर दुःख कैचें के आहे ।’ - ज्ञा २·३४०.
कैचण न. काडी कचरा; पाचोळा (विस्तव पेटवण्याकरिता); केरकचरा. पहा : किलचण (व. ना.)
कैची स्त्री. १. कातर. २. (वास्तु.) आधार देण्यासाठी एकमेकांना तिरपे दोन वासे जोडून केलेली रचना. ३. तुळया इ. घरावर चढविण्याकरिता दोन वाशांना दोरी बांधून केलेली कातरीसारखी रचना. ४. जास्त वजनाचे पदार्थ तोलण्याच्या काट्यासाठी लाकडाच्या तीन दांड्यांची केलेली तिकटी. ५. घराच्या आढ्याच्या खांबाचे लाकूड. ६. पेचप्रसंग : ‘अशी ही कैची हाय.’ - रैत १३२. [का.] (वा.) कैचीत धरणे, पकडणे - पेचात धरणे; अडचणीत गाठणे. कैंचीत सापडणे - सर्व बाजूंनी अडचणीत येणे; काय करावे ते न कळणे; एक नीट करायला जाता दुसरे बिघडणे : ‘ताराबाई विलक्षण कैचीत सापडली होती.’ - अजून १५. ७. दारू भरलेल्या बाणांची जुडी; दारूच्या बाणांचा समुदाय : ‘पन्नास हजार फौज सातशे कैची बाण ।’ - ऐपो २५५. ८. थैली : ‘समागमे शंभर उंट. बाणांच्या कैच्या’ - भाब ९.
कैची गुणाकार   (ग.) (अपूर्णांकाचे समीकरण सोडवताना) एका अपूर्णांकाच्या छेदाने दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाला गुणण्याची क्रिया.
कैछा पु. हलवायाचे उपकरण. पहा : करछा
कैतक स्त्री. फार जाड व लांब नळी असलेल्या बंदुकीचा एक प्रकार.
कैदक स्त्री. फार जाड व लांब नळी असलेल्या बंदुकीचा एक प्रकार.
कैतव न. कपट; लुच्चेगिरी; लबाडी : ‘त्याचे कसें कैतव साहसी गे । - सारुह ७·१२५. [सं.]
कैतान क्रिवि. जोराने : ‘ढोलं वाजत कैतान मध्यान रातीला.’ - एहोरा २·१३५.
कैताले न. ताडाच्या झाडावर चढताना हातात धरण्याकरिता घेतात ती दोरी. हिला एका बाजूला लाकडी मूठ व टोकाला पितळी कडी असते.
कैताळ न. करताळ; झांज.
कैद स्त्री. १. बंदी; नियंत्रण; बंधन; तुरुंगवास. २. शिस्त; कदर; अंमल; ताबा. ३. मर्यादा; नियंत्रण (सरकारचे धार्मिक, सामाजिक चालीरीतीचे). ४. निर्भत्सणे; धमकावणे; एकसारखे दोष पाहणे. (क्रि. करणे.) (को.)
कैद वि. बंदिस्त; कैदेत पडलेला (चोर). [फा.]
कैदकानू स्त्री. १. सरकारी कायदे, हुकूम यांना संज्ञा. २. बंदोबस्त; अंमल : ‘दिल्ली म्हणजे बादशाही तख्ताची जागा. तेथील अमर्यादा करून फौज दरवर्षी पाठवून कैदकानू तुम्ही आपली वसविली.’ -पाब १५०. [फा.]
कैदकाळ वि. निष्ठुर. (व.)
कैदकाळू वि. निष्ठुर. (व.)
कैदखाना पु. बंदिशाळा; तुरुंग; कारागृह. [फा.]
कैदखोर वि. तिरसट; टोचून बोलणारा; काचात ठेवणारा; कमालीचा शिस्तप्रिय; नियम वगैरे कडकपणाने लागू करणारा. (को.) [फा.]