शब्द समानार्थी व्याख्या
कैददगा पु. फसवणूक; फसवेगिरी : ‘मग यास का कैददगा म्हणावा तरी इंग्रज हठऊन तंग करून बडोद्यास घालविले.’ - मइसा १९·८४. [फा.]
कैदवार क्रिवि. शिस्तवार; हुकमानुसार; नम्रपणे; नियम पाळून शिस्तीने.
कैदवार वि. शिस्तबद्ध; नियमित; व्यवस्थित : ‘ब्राह्मणीराज्य कैदवार एकापेक्षां एक मसलती.’ - ऐपो २३१.
कैदा स्त्री. नियमबंदी; शिस्त.
कैदाशिणीचे कोडे   कधीही न सुटणारे कोडे.
कैदाशीण स्त्री. कैकाडीण; कजाग, नाठाळ, भांडखोर स्त्री.
कैदासीण स्त्री. कैकाडीण; कजाग, नाठाळ, भांडखोर स्त्री.
कैदी वि. १. बंदिवान; तुरुंगात असलेला. २. परतंत्र; ताब्यात असणारा. ३. कैदखोर; खट्याळ; खाष्ट; चिडखोर; तिरसट. (को.) [फा. कैद]
कैपख   पहा : कैपक्ष : ‘ऐसें कां कैंपखें । बोलिलासी ॥’ - ज्ञा १७·३५.
कैपत स्त्री. १. एक प्रकारचा पितळी दिवा. पहा : कैपंजी, २. दुष्ट, खट्याळपणाची योजना; गुप्त कट; खोडसाळपणाचा कट, मसलत, कारस्थान. (क्रि. करणे, रचणे, काढणे, चालवणे, मांडणे.) [फा. कैफियत]
कैपतखोर वि. दुष्ट प्रकारचे कारस्थान करणारा; कुभांडी; कपटी; कारस्थानी.
कैपती वि. दुष्ट प्रकारचे कारस्थान करणारा; कुभांडी; कपटी; कारस्थानी.
कैपती   पहा : कैपत : ‘यास जो कोणी हाली कैफती व कथला करील तो दिवाणीचा गुन्हेगार.’ - शिचसाखं २·२९४.
कैफती   पहा : कैपत : ‘यास जो कोणी हाली कैफती व कथला करील तो दिवाणीचा गुन्हेगार.’ - शिचसाखं २·२९४.
कैपक्ष पु. १. कैवार; पक्षपात : ‘म्हणती एकाचा कैपक्ष करीं ।’ - ज्ञा ९·१६८. २. बाजू; पक्ष : ‘विरक्तें वोढावा कैपक्ष । परमार्थाचा ।’ - दास २·९·१४. [सं.]
कैपक्षी वि. कैवारी : ‘कैपक्षी रघुनाथ माझा ।’ - दावि ५३.
कैपंजी स्त्री. हाताने धरायची पणती. पहा : कयपंजी (गो.) [क. कै = हात + पंजी = पणती]
कैफ पु. १. धुंदी; उन्माद; गुंगी; नशा : ‘इंग्रजी विद्येच्या अव्वल कैफात आमच्या विद्वानांनी सुधारणेच्या नव्या दिशा काढल्या.’ - लोटिकेले ४·१८३. २. मादक अंमली पदार्थ, द्रव्य (भांग, गांजा इ.) ३. मादक गुण; झिंग आणण्याची शक्ती, प्रमाण. (क्रि. करणे, चढणे.). ४. व्यंग; खोड. [फा.]
कैफत स्त्री. १. कलह; तंटा; भांडण : ‘दरम्यानें रंभाजी नाईकवाडी कैफती करितो.’ - पेद ३१·१७. २. तक्रार; अडथळा. [फा. कफालत]
कैफियत स्त्री. १. वर्णन; हकीगत; करिणा; लेखी जबानी; खटल्याचा तपशील. २. काम; खटला; उद्योग; व्यवहार; मुकदमा. ३. (कायदा) दावा लावल्यावर विरुद्ध पक्षाच्या दाव्याबद्दल जे लेखी म्हणणे कोर्टात दाखल करतात ते. ४. खरा दस्तऐवज, लेख; अधिकारपत्र; लेखी हुकूम. [फा. कैफीयत]
कैफत स्त्री. १. वर्णन; हकीगत; करिणा; लेखी जबानी; खटल्याचा तपशील. २. काम; खटला; उद्योग; व्यवहार; मुकदमा. ३. (कायदा) दावा लावल्यावर विरुद्ध पक्षाच्या दाव्याबद्दल जे लेखी म्हणणे कोर्टात दाखल करतात ते. ४. खरा दस्तऐवज, लेख; अधिकारपत्र; लेखी हुकूम. [फा. कैफीयत]
कैफेत स्त्री. १. वर्णन; हकीगत; करिणा; लेखी जबानी; खटल्याचा तपशील. २. काम; खटला; उद्योग; व्यवहार; मुकदमा. ३. (कायदा) दावा लावल्यावर विरुद्ध पक्षाच्या दाव्याबद्दल जे लेखी म्हणणे कोर्टात दाखल करतात ते. ४. खरा दस्तऐवज, लेख; अधिकारपत्र; लेखी हुकूम. [फा. कैफीयत]
कैफयेत स्त्री. १. वर्णन; हकीगत; करिणा; लेखी जबानी; खटल्याचा तपशील. २. काम; खटला; उद्योग; व्यवहार; मुकदमा. ३. (कायदा) दावा लावल्यावर विरुद्ध पक्षाच्या दाव्याबद्दल जे लेखी म्हणणे कोर्टात दाखल करतात ते. ४. खरा दस्तऐवज, लेख; अधिकारपत्र; लेखी हुकूम. [फा. कैफीयत]
कैफी वि. १. मादक पदार्थांचे सेवन करणारा (माणूस); गांजेकस; दारूबाज. २. गुंगी आणणारे; मादक (पेय). [फा.]
कैफीन स्त्री. (वै.) त्वचेला उत्तेजन देणारे औषध.