शब्द समानार्थी व्याख्या
कैमर्थ्य न. अनुपयुक्ततेचा, वैयर्थ्यतेचा, अनुचिततेचा दोष (वादविवादात, धंद्यात, कामात इ.) निरुपयोग. [सं. किं + अर्थ = उपयोग]
कैमुतिकन्याय पु. अर्थन्याय; एखादी दुष्कर गोष्ट करता येते तर सोपी गोष्ट होईलच होईल असा अर्थ असला म्हणजे त्याला म्हणतात. जसे : - कुऱ्हाडीने लाकूड तुटते, मग गवत सहजच तोडता येईल. [सं.]
कैरव न. स्त्री. चंद्रविकासी पांढरे कमळ : ‘सार्थक पार्थ करी ती कैरविणी तो सुधांशु गौरविती’ - नवनीत. [सं.]
कैरविणी न. स्त्री. चंद्रविकासी पांढरे कमळ : ‘सार्थक पार्थ करी ती कैरविणी तो सुधांशु गौरविती’ - नवनीत. [सं.]
कैरा वि. १. कैरेडोळ्या; मांजऱ्या; घाऱ्या डोळ्याचा (घोडा). कैराडोळा असणे हे अशुभचिन्ह आहे. २. ज्याचे बुबुळ घारे आहे असा (डोळा). ३. घाऱ्या, करड्या रंगाचा : ‘चितार भिंगारे खैरें । मोरें सेवरें आणि कैरें ।’ - हरि १·१९२ [हिं.]
खैरा वि. १. कैरेडोळ्या; मांजऱ्या; घाऱ्या डोळ्याचा (घोडा). कैराडोळा असणे हे अशुभचिन्ह आहे. २. ज्याचे बुबुळ घारे आहे असा (डोळा). ३. घाऱ्या, करड्या रंगाचा : ‘चितार भिंगारे खैरें । मोरें सेवरें आणि कैरें ।’ - हरि १·१९२ [हिं.]
कैरा वि. १. तिरळा; चकणा (डोळा) : ‘तारसें घुलें काणें कैरे’ - दास ३·६·४२. २. चकणा डोळा असलेला. [सं. केकर = तिरवा]
कैरी स्त्री. १. कच्चा आंबा; लहान आंबा; कुयरी. २. कपाशीचे हिरवे बोंड. (ना.) (वा.) कैरी पिकणे - (मुलगी) वयात येणे : ‘पुढे तिची कैरी पिकली.’ - वासू ३२. [तुल. का. काई = हिरवे, कच्चे + री]
कैल न. शेतातील धान्याचे मान, माप; वाटण्यापूर्वीची पिकाची मोजणी. पहा : कैली [फा.]
कैलास पु. कुबेर, शंकर यांचे निवासस्थान असलेला पर्वत. हा हिमालयात आहे. महादेवाचा लोक. (वा.) कैलास येणे, मिळणे, उतरणे, प्राप्त होणे - काही तरी मोठा लाभ होणे. कैलासाला डोके लागणे - आकाश ठेंगणे होणे; गर्वाने अतिशय फुगून जाणे. [सं.]
कैलासवासी वि. (मृत्यू पावलेल्या माणसाची कागदोपत्री विशेषतः तो शिवभक्त असल्यास - उल्लेख करताना योजतात.) परलोकवासी; मृत.
कैली वि. मापी आकार; खंडी, पायली, शेर इ. धान्ये वगैरे मोजण्याच्या प्रमाणदर्शक शब्दामागे हा शब्द लावतात : ‘तांदूळ कैली कोठीमापें पाच मण’ - मइसा १५·२२४. [फा. कैल् = माप]
कैली स्त्री. फुटक्या मडक्याचा तुकडा; खापर. (गो.) [का. केले = मडके]
कैली कोठी   वजनी मापाने मोजलेले; खंडी पायली, शेर इ. धान्ये मोजण्याचा परिमाणदर्शक शब्द.
कैली माप   मापाने मोजून घ्यायचे परिमाण.
कैली मापी   मापाने मोजून घ्यायचे परिमाण.
कैवजा क्रिवि. किती, अनेक प्रकारे : ‘येथें आलियानें रुक्नुद्दौला यास वस्वास येईल म्हणोन कैवजा लिहिले.’ - मईसा १·५३.
कैवर्त पु. १. कोळी; मासेमाऱ्या. २. भिस्ती; पाणक्या : ‘किरात कैवर्तक दुष्ट भारी ।’ - वामन (नवनीत) १३६. [सं.]
कैवर्तक पु. १. कोळी; मासेमाऱ्या. २. भिस्ती; पाणक्या : ‘किरात कैवर्तक दुष्ट भारी ।’ - वामन (नवनीत) १३६. [सं.]
कैवल्य न. १. सायुज्य मुक्ती; मोक्ष; जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य : ‘तें कैवल्य पर तत्त्वता । पातलें जगीं ।’ - ज्ञा ३·१५१. २. केवळपणा; एकटेपणा : ‘कैवल्य म्हणजे केवळपणा, एकटेपणा किंवा प्रकृतीशीं संयोग नसणें असा असून...’ - गीर १६२. [सं.] (वा.) कैवल्य वाटणे- कौतुक वाटणे. (व.)
कैवल्यदानी पु. (मोक्ष देणारा) ईश्वर; गुरू; ईश्वराचें एक अभिधान : ‘सुखानंद आनंद कैवल्यदानी ।’ - राम ३६.
कैवल्यनिधान न. १. मुक्तिसदन; मोक्ष : ‘मुमुक्षूस कैवल्यधाम ।’ - यथादी १·४६. २. मोक्षाचे स्थान जो परमेश्वर तो : ‘हुंबरती गाय तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ।’ - तुगा २४१. [सं.]
कैवल्यधाम न. १. मुक्तिसदन; मोक्ष : ‘मुमुक्षूस कैवल्यधाम ।’ - यथादी १·४६. २. मोक्षाचे स्थान जो परमेश्वर तो : ‘हुंबरती गाय तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ।’ - तुगा २४१. [सं.]
कैवल्यपद न. सायुज्य मुक्ती; कैवल्यधाम. [सं.] (वा.) कैवल्यपद येणे, प्राप्त होणे- अलभ्य लाभ होणे; फार चांगली गोष्ट मिळणे.
कैवल्यरस पु. मोक्षाचा आनंद. [सं.]