शब्द समानार्थी व्याख्या
कोकणे अक्रि. १. ओरडणे; भुंकणे (कुत्रा). २. आरवणे (कोंबडा); ओरडणे; किंचाळणे (पोपट, कावळा) : ‘कोंबडा कोंकतो, पैसा मागतो ।’ - भिकारी गाणे. [ध्व.]
कोकणे न. एका रानवेलीचे फळ.
कोकदम्या येणे अक्रि. श्रमामुळे बेजार होणे; कासावीस होणे; थकून जाणे; दमछाक होणे : ‘घोडी कोकदम्याला आली होती.’ - फकिरा १७४.
कोगदम्या येणे अक्रि. श्रमामुळे बेजार होणे; कासावीस होणे; थकून जाणे; दमछाक होणे : ‘घोडी कोकदम्याला आली होती.’ - फकिरा १७४.
कोकनद न. तांबडे कमळ : ‘नेणति हे परलोक, विलोक न कोकनदासम पाणिपदें ।’ - आविश्वा २२. [सं.]
कोकबाण पु. लढाईतील आगीच्या बाणाचा एक प्रकार. [कहकबाण]
कोकमार्ग पु. कोकशास्त्र पाळणारा एक पंथ.
कोकर न. माशांची एक जात; विशिष्ट मासळी. हे मासे दिवाळीच्या सुमाराला पकडतात.
कोकर स्त्री. गळून पडणाऱ्या कच्च्या लवंगा : ‘ह्या कच्च्या गळतीला कोकर म्हणतात.’ - के ४·४·३९.
कोकरचाल स्त्री. कोकरासारखी चाल, गती (घोड्याला योजतात.) पहा : कुकरचाल
कोकरा पु. करडू; मेंढीचे (नर जातीचे) पिलू.
कोकरू पु. करडू; मेंढीचे (नर जातीचे) पिलू.
कोकलणे अक्रि. १. ओरडणे; भोकाड पसरणे; उपाय फसल्यामुळे हाका मारीत बसणे. २. तक्रार करणे; एखाद्याच्या नावाने हाका मारणे.
कोकलणे उक्रि. तुडविणे; बदडणे; रडायला; कोको करायला लावणे. [ध्व. सं. को + कल्]
कोकशाळा स्त्री. नाटकशाळा : ‘कोकशाला नाटकशाला दासी यांचा घ्याल मुका ।’ - राला ८५.
कोकस्थान न. वैराण जंगली मुलूख; जेथे केवळ पारवे घुमतात असे स्थान : ‘डोंगर धामणा संमत हवेली त्याचे माथा जमीन वैराण, कोकस्थान आहे.’ - मासपमा १६०.
कोकंब पु. रातंबा; आमसोलाचे झाड. हे झाड कोकणात सर्वत्र आढळते.
कोकंबी पु. रातंबा; आमसोलाचे झाड. हे झाड कोकणात सर्वत्र आढळते.
कोकम पु. रातंबा; आमसोलाचे झाड. हे झाड कोकणात सर्वत्र आढळते.
कोकंबेल न. कोकंबाच्या बियांचे तेल. हे पोटातही घेतात व अंगाला बाहेरून चोळतात.
कोका पु. १. मोना; केळीच्या गाभ्यातून केळफुलासह बाहेर पडणारा कोंब; केळफूल; पोफळीचा मोहोर अथवा फुले ज्यातून बाहेर पडतात तो भाग. पोफळीच्या कोक्यांपासून कागद तयार करतात. [सं. कोक], २. कानफाटे गोसावी वाजवतात ती किनरी; लहान एकतारी. ३. बगळा; कंक. ४. एक प्रकारचा शिंपीतील प्राणी; कालव : ‘बळीने बघता बघता एक कोका घेतला.’ - शेलूक ९६. ५. एक झाड. याच्या एकंदर पन्नास जाती असून हिंदुस्थानात त्यांपैकी सहा आढळतात. ६. आतला भाग : ‘कानाच्या कोक्यात शिरलेल्या गोमाशा झाडू लागलं.’ - गागो १०३·२. [फा. कूका ] (वा.) कोका करणे, कोकी करणे- गुंडाळणे; एकत्र करणे : ‘कसंतरी कोका करून झोपलो.’ - उअं ८. ७. चवडा : ‘पायाचं कोकं पाण्यात ठेवताच तिला पाणी गार गार लागलं.’ - खळाळ ३. ८. कंदिलाची काच : ‘कुणाकडे कंदील होता पण त्याचा कोका फुटला होता.’ - जांदि १७.
कोका स्त्री. १. पागोट्याच्या वरील चोच (कोकी). पागोट्याच्या (पगडीच्या) कमळाच्या वर असलेला हा भाग कागदाचा करून त्यावर कापडी पट्ट्या शिवतात. २. पागोटे, इरले इत्यादीवरील वाकडे टोक, चोच, राघू, कोंब : ‘मी एक पुणेरी, लाल, ब्राह्मणी कोकीची, जरीच्या झिरमिळ्यांची पगडी विकत घेतो.’ - माआ २२४.
कोकी स्त्री. १. पागोट्याच्या वरील चोच (कोकी). पागोट्याच्या (पगडीच्या) कमळाच्या वर असलेला हा भाग कागदाचा करून त्यावर कापडी पट्ट्या शिवतात. २. पागोटे, इरले इत्यादीवरील वाकडे टोक, चोच, राघू, कोंब : ‘मी एक पुणेरी, लाल, ब्राह्मणी कोकीची, जरीच्या झिरमिळ्यांची पगडी विकत घेतो.’ - माआ २२४.
कोकी पु. १. आतला भाग : ‘कानाच्या कोक्यात शिरलेल्या गोमाशा झाडू लागलं.’ - गागो १०३·२. [फा. कूका ] (वा.) कोका, कोकी करणे- गुंडाळणे; एकत्र करणे : ‘कसंतरी कोका करून झोपलो.’ - उअं ८.
कोकाट पु. १. कोळीण पक्ष्याचा शब्द. २. (न.) कलकलाट; गोंगाट; गलका. [ध्व.]