शब्द समानार्थी व्याख्या
कोकाटी स्त्री. १. हस्तिदंताचा भोवरा. याला भोक असल्याने याचा गुंगुं असा आवाज होतो. पहा : कोकाट, २. एक पक्षी : ‘कोकाट्या नळावर भांडणाऱ्या बायकांसारखा कालवा करीत होत्या.’ - व्यंमाक ९०. पहा : कोकाट, ३. केळफुलांच्या पाऱ्यांवरील आच्छादन.
कोकाट्या वि. कोकाट करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; गोंगाट करणारा. [ध्व.]
कोकात्री पु. कोंबड्यासारखा तांबूस रंगाच्या एक पक्षी. मांसाहारी लोक याचे मांस खातात. (जुन्नरी). [ध्व.]
कोकादर स्त्री. पाणकोंबडी. (गो.) [ध्व.]
कोंकतारी स्त्री. पाणकोंबडी. (गो.) [ध्व.]
कोकापकड स्त्री. (मल्लखांब) मल्लखांबाला दोन्ही बाजूंनी तळहातांनी धरून मारायची उडी.
कोकाबेरी   नीलकमल.
कोकारणी स्त्री. कोंबड्याची आरव. (गो.) [ध्व.]
कोकारा पु. १. आरोळी; मोठ्याने मारलेली हाक. (राजा.), २. लहान मासा. (गो.)
कोकावणे अक्रि. १. सूं गुं इ. आवाज होणे (बाण, भोवरा इत्यादिकांचा). २. भुंकणे; केकाटणे (कुत्र्याचे). ३. केकावणे (केका) : ‘मोर कोकावती ते ।’ - अक रसकल्लोळ. ४. कोकलणे : ‘पोटात कावळे कोकावयास लागले.’ - पलको १३. [ध्व.]
कोकिल पु. स्त्री. मंजूळ शब्द करणारा एक पक्षी. ह्याचा आवाज फार मधुर असतो. मादी आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात उबवून घेते अशा समजुतीवरून याला संस्कृतात परभृत, अन्यभृत म्हणतात. कोकिल वसंत ऋतूतच फक्त गातो.
कोकिला पु. स्त्री. मंजूळ शब्द करणारा एक पक्षी. ह्याचा आवाज फार मधुर असतो. मादी आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात उबवून घेते अशा समजुतीवरून याला संस्कृतात परभृत, अन्यभृत म्हणतात. कोकिल वसंत ऋतूतच फक्त गातो.
कोकिळ पु. स्त्री. मंजूळ शब्द करणारा एक पक्षी. ह्याचा आवाज फार मधुर असतो. मादी आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात उबवून घेते अशा समजुतीवरून याला संस्कृतात परभृत, अन्यभृत म्हणतात. कोकिल वसंत ऋतूतच फक्त गातो.
कोकीळ पु. स्त्री. मंजूळ शब्द करणारा एक पक्षी. ह्याचा आवाज फार मधुर असतो. मादी आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात उबवून घेते अशा समजुतीवरून याला संस्कृतात परभृत, अन्यभृत म्हणतात. कोकिल वसंत ऋतूतच फक्त गातो.
कोकिलाव्रत न. अधिक आषाढात कोकिळेचा शब्द ऐकल्यानंतर जेवण्याचे बायकांचे एक व्रत.
कोकिलासन न. (मल्लखांब) मल्लखांबाच्या तोंडावर पुढे वाकून बसणे.
कोकिळ कोंबडा   स्काउटच्या मुलांचा एक खेळ.
कोकीदार वि. कोकी असलेले (इरले, पागोटे). पहा : कोका
कोकी स्त्री. डोळ्यातील फूल.
कोके न. दमा. (गो.) [ध्व.]
कोकेन न. गुंगी आणणारा मादक पदार्थ; बधिरीकरणासाठी वापरले जाणारे औषध.
कोको पु. (वन.) एक प्रकारचे झाड. ह्याच्या शेंगातील बियांपासून एक उत्तेजक स्वादिष्ट पेय बनवले जाते. [पोर्तु.]
कोगव स्त्री. कोकम : ‘देवळाचे दारी कोगवीवर कोगवां दाटली वो दाटली वो ।’ - एहोरा ३२.
कोगी स्त्री. खङ्‌गाचा एक प्रकार. [इं.]
कोगूळ स्त्री. कोकिळ. (कु. गो.)