शब्द समानार्थी व्याख्या
कोच पु. १. चार चाकी घोडागाडी; बग्गी; [इं.], २. आंबेहळदीचा कांदा, गड्डा. (को.), ३. आरामात ऐसपैस बसता येईल अशी, पाठीशी व खाली मऊ गादी असलेली कमी उंचीची खुर्ची, ऐषारामी बैठक, आसन; बसावयाचा पलंग. [इं.]
कोच स्त्री. १. खोक; एखाद्या अणकुचीदार पदार्थाने झालेली जखम; खोच. २. अणकुचीदार टोक. [हिं. कोचना], ३. पगडी, इरले इत्यादींचे टोक. पहा : कोका, कोकी
कोच न. जांब्या दगडात कातळावर उगवणारे व काट्याप्रमाणे टोचणारे बारीक गवत, वेल. [सं. कूर्च]
कोचकई स्त्री. मोठे व जून झालेले आवळे उकडून तयार करण्यात येणाऱ्या वड्या. [क. कोच्चु = तुकडे करणे, पूड, चूर्ण + काई = फळ]
कोचकाई स्त्री. मोठे व जून झालेले आवळे उकडून तयार करण्यात येणाऱ्या वड्या. [क. कोच्चु = तुकडे करणे, पूड, चूर्ण + काई = फळ]
कोचकणे स्त्री. टोचणे; डिवचणे : ‘आपल्या कल्पनेने निर्माण केलेल्या सोज्वळ कुटुंबवत्सल माणसाला त्याने कोचकले.’ - काजवा १४१.
कोचका   पु. कोपरा. (व.)
कोचकार्द   आवळकाठी.
कोचीकंदर न. १. अडगळीची जागा. घाणेरड्या गर्दीच्या जागेबद्दल योजतात. (को.) २. गळाठा; अडगळ. ३. अडचणीची, संकोचाची अवस्था, स्थिती, गर्दी, गोंधळ असणे.
कोचकी स्त्री. १. (वास्तु.) कोपरा; कोन (घरातील, खोलीचा इ.). २. दिखाऊ चांदई. ३. पहा : कोकी १, ४. पागोटे : ‘मुदुतर थिरमे त्या कोचक्या कोरदारा ।’ - सारूह ३·४०.
कोचकीदार स्त्री. कोचकी असलेले (पागोटे इ.).
कोचकील वि. अरुंद, कोंदट, चिंचोळी (जागा).
कोचट वि. संकुचित; कोंदट; अपुरी (खोली); अरुंद; लहान तोंडाचे (भांडे, वस्तू). [सं. कुचू]
कोचा वि. संकुचित; कोंदट; अपुरी (खोली); अरुंद; लहान तोंडाचे (भांडे, वस्तू). [सं. कुचू]
कोचणे उक्रि १. कुरतडणे; तोडणे (नखे, दात, चोच इत्यादींनी). (राजा.) २. जोराने दाबणे. (व.) ३. खिळ्यांनी बोचणे (बे.). ४. भाजी चिरणे. (बे.) [क. कोच्चु = कापणे]
कोचणे स्त्री. भोवऱ्याच्या खेळात आपला भोवरा दुसऱ्याच्या फिरत्या भोवऱ्यावर मारणे.
कोचमन पु. गाडीवान; गाडीहाक्या; सारथी; सूत : ‘कोचमीन (महाराजांचा) मराठे जातीचा ... होता.’ - विक्षिप्त २·११८ [इं.]
कोचमीन पु. गाडीवान; गाडीहाक्या; सारथी; सूत : ‘कोचमीन (महाराजांचा) मराठे जातीचा ... होता.’ - विक्षिप्त २·११८ [इं.]
कोचमिल पु. गाडीवान; गाडीहाक्या; सारथी; सूत : ‘कोचमीन (महाराजांचा) मराठे जातीचा ... होता.’ - विक्षिप्त २·११८ [इं.]
कोचमेल पु. गाडीवान; गाडीहाक्या; सारथी; सूत : ‘कोचमीन (महाराजांचा) मराठे जातीचा ... होता.’ - विक्षिप्त २·११८ [इं.]
कोचर स्त्री. आखूड शिंगाची म्हैस. (व.)
कोचवण स्त्री. जाच; तगादा; तसदी; टोचणी : ‘मजला देणेदाराची कोचवण किती आहे.’ - होकै २४.
कोचवणी स्त्री. काच; अडचण : ‘तुम्ही खर्चाचे कोचवणीत येऊन डेऱ्याचे दांडे होतीलना?’ - इसंहोकै १७.
कोचळा पु. न. पक्ष्याचे घरटे. (व. ना.) पहा : कोंचाळे
कोचाळे पु. न. पक्ष्याचे घरटे. (व. ना.) पहा : कोंचाळे