शब्द समानार्थी व्याख्या
कोटर कुऱ्हाड   (पुरा.) मध्ये पोकळी असलेली कुऱ्हाड. [सं.]
कोटरान न. निर्जन प्रदेश; भयाण रान. (ना.)
कोटव पु. एक लहान मासा. (को.)
कोटसा वि. कोठेसा; कोणत्या जागी.
कोटंबा पु. १. खंडोबाच्या वाघ्यांचे लाकडी चौकोनी भिक्षापात्र. खंडोबाचे भक्त ह्याची पूजा करतात : ‘हृदय कोटंबा सांगातें । घोळ वाजवूं अनुहातें ।’ - तुगा ४४४६. २. लाकडी डोणी; कोटंबी; काथवट (लांबट, चौकोनी व खोलगट); जनावरांना चूण, भूस वगैरे खाणे घालण्याचे लाकडी पात्र.
कोटुंबा पु. १. खंडोबाच्या वाघ्यांचे लाकडी चौकोनी भिक्षापात्र. खंडोबाचे भक्त ह्याची पूजा करतात : ‘हृदय कोटंबा सांगातें । घोळ वाजवूं अनुहातें ।’ - तुगा ४४४६. २. लाकडी डोणी; कोटंबी; काथवट (लांबट, चौकोनी व खोलगट); जनावरांना चूण, भूस वगैरे खाणे घालण्याचे लाकडी पात्र.
कोटंबी स्त्री. लहान कोटंबा, डोणी, काथवट.
कोटंबे न. कोळंबे; रहाटगाडग्याचे पाणी ज्या डोणग्यात पडते ते डोणगे.
कोटा पु. वाटून द्यायच्या पदार्थाचे प्रमाण. [इं.]
कोटार क्रिवि. भलतीकडे : ‘आरब व सिद्दी पुढे होऊन कोटार गेले.’ - ऐकोपुर.
कोटि वि. शंभर लक्ष; एक करोड; कोट; असंख्य : ‘जागजागीं आहेत वीर कोटी’ - र १०. [सं.] (वा.) कोटिध्वज लावणे, उभारणे - अफाट संपत्तीचा देखावा करणे; कोट्यधीश, नवकोट नारायण होणे.
कोटी संख्या वि. शंभर लक्ष; एक करोड; कोट; असंख्य : ‘जागजागीं आहेत वीर कोटी’ - र १०. [सं.] (वा.) कोटिध्वज लावणे, उभारणे - अफाट संपत्तीचा देखावा करणे; कोट्यधीश, नवकोट नारायण होणे.
कोटि स्त्री. १. (वन.) सजीवांच्या वर्गीकरणात प्राणी किंवा वनस्पती यापैकी कोणत्याही एका प्रकारातील जातीचा सर्वात मोठा संच दाखवणारी संज्ञा; विशिष्ट वर्ग : ‘रजोगुणाची कोटी । लोभिष्ट पोटी स्त्री पुत्रां ।’ - एभा १३·४५; भेद. २. जात. ३. दर्जा; प्रत. ४. (वादविवादात) निरुत्तर करण्यासारखे खुबीदार उत्तर; भाषणाची मोठ्या युक्तीने रचना; खुबीचे भाषण. ५. शब्दांत, वाक्यांत काही फरक करून किंवा एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द घेऊन, अर्थाच्या गमती करून अलंकारचमत्कार दाखविणे. हे एक भाषा कौशल्य समजले जाते. पहा : श्लेष : ‘अहो विद्वत्ताप्रचुर कोट्यांची गुंतवळें गेली दहापांच घशांत.’ - नाकु ३·३४. ६. काटकोन त्रिकोणाची उभी बाजू; लंब रेषा; कर्णाखेरीज एक बाजू. [सं.], ७. थोर योग्यता, दर्जा; श्रेष्ठपणा; शौर्य, सद्गुण, विद्या यांमध्ये अतिशय प्रवीण असलेल्यासाठी सन्मानदर्शक संज्ञा. [सं.], ८. धनुष्याचे टोक; चंद्रकलेची टोके. [सं.], ९. कल्पना; विचारसरणी : ‘परंतु ही कोटी इतिहासदृष्ट्या टिकेल असे आम्हांस वाटत नाही.’ - लोटिकेले ४·११६. [सं.], १०. पराकाष्ठा : कळस : उच्च शिखर. जसे : - पराकोटी. [सं.] (वा.) कोटि उभवणे, कोटी उभवणे - ध्वज उभारणे : ‘तरी यशाची उभऊनि कोटी ।’ - नव १९·१७७.
कोटी स्त्री. १. (वन.) सजीवांच्या वर्गीकरणात प्राणी किंवा वनस्पती यापैकी कोणत्याही एका प्रकारातील जातीचा सर्वात मोठा संच दाखवणारी संज्ञा; विशिष्ट वर्ग : ‘रजोगुणाची कोटी । लोभिष्ट पोटी स्त्री पुत्रां ।’ - एभा १३·४५; भेद. २. जात. ३. दर्जा; प्रत. ४. (वादविवादात) निरुत्तर करण्यासारखे खुबीदार उत्तर; भाषणाची मोठ्या युक्तीने रचना; खुबीचे भाषण. ५. शब्दांत, वाक्यांत काही फरक करून किंवा एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द घेऊन, अर्थाच्या गमती करून अलंकारचमत्कार दाखविणे. हे एक भाषा कौशल्य समजले जाते. पहा : श्लेष : ‘अहो विद्वत्ताप्रचुर कोट्यांची गुंतवळें गेली दहापांच घशांत.’ - नाकु ३·३४. ६. काटकोन त्रिकोणाची उभी बाजू; लंब रेषा; कर्णाखेरीज एक बाजू. [सं.], ७. थोर योग्यता, दर्जा; श्रेष्ठपणा; शौर्य, सद्गुण, विद्या यांमध्ये अतिशय प्रवीण असलेल्यासाठी सन्मानदर्शक संज्ञा. [सं.], ८. धनुष्याचे टोक; चंद्रकलेची टोके. [सं.], ९. कल्पना; विचारसरणी : ‘परंतु ही कोटी इतिहासदृष्ट्या टिकेल असे आम्हांस वाटत नाही.’ - लोटिकेले ४·११६. [सं.]
कोटी स्त्री. पराकाष्ठा : कळस : उच्च शिखर. जसे : - पराकोटी. [सं.] (वा.) कोटि, कोटी उभवणे - ध्वज उभारणे : ‘तरी यशाची उभऊनि कोटी ।’ - नव १९·१७७.
कोटिक्रम पु. १. युक्तिवाद; शक्कल; खुबीदार विवेचनपद्धती; तर्कवाद; श्लेषात्मक भाषण : ‘हाच कोटिक्रम स्वीकारलेला आहे.’ - गीर १५७. (क्रि. करणे) २. पेच. [सं.] (वा.) कोटिक्रम लढवणे - तोड काढणे; उपाय योजना करणे; मध्यमार्ग काढणे.
कोटिज्या स्त्री. (त्रिकोणमिती) कोभुजज्या. काटकोन त्रिकोणातील लघुकोनाच्या लगतची बाजू व कर्ण यांचे गुणोत्तर. कोटिज्या आणि भुजज्या यांच्या वर्गांची बेरीज १ भरते. [सं.]
कोटिभोज वि. कोट्याधीश : ‘धनेश्वर नामें कोणियेक ब्राह्मण । तो वस्तुवित्तेसि संपूर्ण । कोटिभोज पै ।’ - कथा २·१५·६
कोटिशः वि. कोट्यावधी. [सं.]
कोटिशा वि. कोट्यावधी. [सं.]
कोटिस्पर्शज्या स्त्री. (त्रिकोणमिती) कोटिज्या व भुजज्या यांचे गुणोत्तर; कोस्पर्शज्या. [सं.]
कोटी स्त्री. टोळी; जमाव; कोठा : ‘दोहींकडे राऊत व माणसाची कोटी व मध्ये समुद्रतटाकासही पाईची माणसे ठेवून खबरदार राहिलो.’ - पेद ३४·१५९.
कोटीर पु. डोक्यावरचा मुकुट : ‘मस्तकीं कोटीर झळकत ।’ - जै १४·५६. [सं. कोटिर, कोटर]
कोटी सहसंबंध   दर्जाप्रमाणे एकमेकांशी असलेला संबंध.
कोटे न. १. पक्ष्याचे घरटे; कोठे : ‘पोटाखाली अंडी घेऊन कोट्यात बसलेल्या व्हल्यांनी आपल्या गोल डोळ्यांची उघडझाप केली.’ - व्यंमाक ५४. २. रेशमी किड्यांचा कोशेटा. [सं. कोट्ट, कोट]