शब्द समानार्थी व्याख्या
कोट्यधीश कि. नवकोट नारायण; श्रीमंत; करोडपती. [सं.]
कोट्याधीश कि. नवकोट नारायण; श्रीमंत; करोडपती. [सं.]
कोट्यवधी वि. कोटीच्या मापाने मोजण्यासारखा; अपार; अगणित; अनंत. [सं.]
कोट्यावधी वि. कोटीच्या मापाने मोजण्यासारखा; अपार; अगणित; अनंत. [सं.]
कोट्यंश वि. अत्यंत अल्प.
कोट्यानकोटी वि. अगणित; अतोनात : ‘जळत हृदय माझें जन्म कोट्यानकोटी ।’ - रामदास करुणाष्टक [सं. कोटि + अनुकोटि]
कोठ पु. १. किल्ला. २. किल्ल्याचा तट. पहा : कोट. ३. पहा : कोठी [सं. कोष्ठ], ४. मोठी व वाटोळी चकंदळे पडणारी रक्तपिती. ५. गजकर्ण; नायटा. [सं. कुष्ठ]
कोठचा वि. १. कोठल्या गावचा, ठिकाणाचा. पहा : कुठचा. २. कोणता, कसचा.
कोठडी स्त्री. १. घरातील खोली; (विशेषतः) सामान ठेवण्याची कोठी; दालन : ‘हरिविजयग्रंथ भांडार । छत्तीस कोठड्यांचे परिकर ।’ - हरि ३६·२१६. २. कपाट; फडताळ. (व.) ३. तुरुंगाची कोठी. [सं. कोष्ठ]
कोठणे स्त्री. (प्र.) कोठून; कोणत्या ठिकाणाहून.
कोठदार वि. (चर्मकार.) विशिष्ट प्रकारचा मारवाडी जोडा. हा मारवाडी कुणबी घालतात.
कोठनीस पु. कोठावळा; कोठीवाला; कोठीवरील अधिकारी.
कोठपर्यंत क्रि. वि. कुठवर; कोणत्या ठिकाणापर्यंत; कोणत्या मुद्यापर्यंत; कोणत्या पल्ल्यापर्यंत; कोणत्या मजलेपर्यंत (स्थळ किंवा वेळ यासंबंधी).
कोठपर्यंत पावेतो क्रि. वि. कुठवर; कोणत्या ठिकाणापर्यंत; कोणत्या मुद्यापर्यंत; कोणत्या पल्ल्यापर्यंत; कोणत्या मजलेपर्यंत (स्थळ किंवा वेळ यासंबंधी).
कोठवर क्रि. वि. कुठवर; कोणत्या ठिकाणापर्यंत; कोणत्या मुद्यापर्यंत; कोणत्या पल्ल्यापर्यंत; कोणत्या मजलेपर्यंत (स्थळ किंवा वेळ यासंबंधी).
कोठपो पु. भाताची पेज गाळण्याचा लांबट, चौकोनी कोटंबा, भांडे
कोठपो   (कु.); काथवट. पहा : कोटंबा
कोठयॉ पु. कोठ्या; एक परदेशी गलबत. हे गुजराथेतील खारवी मुसलमान वापरतात. याच्या व दक्षिणी गलबताच्या बांधणीत फरक म्हणजे. याचे धाकटे शीड व कलमी लहान असतात. [सं. कोष्ठ]
कोठवा पु. कोठ्या; एक परदेशी गलबत. हे गुजराथेतील खारवी मुसलमान वापरतात. याच्या व दक्षिणी गलबताच्या बांधणीत फरक म्हणजे. याचे धाकटे शीड व कलमी लहान असतात. [सं. कोष्ठ]
कोठला पु. कोठी; खोली : ‘सानिये कोठला ठेविजे दीपु’ - विद ३.
कोठला वि. कुठला. पहा : कोठचा
कोठली स्त्री. पोटातील आतडे; आतड्यातील मळ : ‘बालपणिचिं कोठलीं । बाहिरी घाली ।’ - राज्ञा ६·२१६.
कोठलेले वि. बरेच दिवस साठ्यात पडून राहिले असल्यामुळे जुने झालेले (कापड). (कु.)
कोठवळा   पहा : कोठनीस : ‘दाटी पुढील दारीं मागिल दारीं आहे कोठिमध्यें कोठवळा ।’ - प्रला २६७.
कोठावळा   पहा : कोठनीस : ‘दाटी पुढील दारीं मागिल दारीं आहे कोठिमध्यें कोठवळा ।’ - प्रला २६७.